चॉकलेट ब्राउनी बनवण्याची सोपी रेसिपी

Chocolate Brownie Recipe

वेगवेगळया रेसीपी बनवण्यात भारतीय गृहीणींचा कोणी हात धरू शकत नाही. खरतर करून खाऊ घालणे ही आपली संस्कृती आणि पंरपरा! त्यानुसार आपल्या इथल्या स्त्रिया काहीही नवीन करायला शिकल्या की लगेच ते बनवुन बघायला त्यांना फार आवडते, आणि मग तो पदार्थ बनवायचा आणि घरच्यांना खाऊ घालुन त्यांच्या प्रतिक्रीया घ्यायला त्यांना फार आवडतं.

आज आपण चव चाखणार आहोत ब्राउन ची. ब्राउनी लहानांपासुन मोठयांपर्यंत सर्वांनाच आवडते. गोड पदार्थांत ब्राउनी खुप पसंत केल्या जाते तर चला बघुया ब्राउनी कसे बनवायचे.

चॉकलेट ब्राउनी बनवण्याची सोपी पद्धत – Delicious Chocolate Brownie Recipe in Marathi

Chocolate Brownie Recipe

चॉकलेट ब्राउनी बनवण्याकरता सामग्री – Ingredients of Chocolate Brownie

  • चुरा केलेली ब्राउनी
  • चॉकलेट सॉस १०० मि.ली.
  • मैदा ९० ग्रॅम
  • साखर १०० ग्रॅम
  • कोको पावडर ३० ग्रॅम
  • अर्धा लिटर कंडेस्ड मिल्क
  • बटर ५० ग्रॅम
  • आईसिंग शुगर ५० ग्रॅम
  • अर्धा टिस्पुन बेकिंग पावडर
  • अर्धा टिस्पुन बेकिंग सोडा

<liटिस्पुन चॉकलेट कलर

 • ५० ग्रॅम अक्रोट
 • अर्धा टिस्पुन वेनीला इसेन्स
 • दुध ८० मि.ली.
 • २ टिस्पुन बदाम पेस्ट

 

चॉकलेट ब्राउनी बनविण्याची विधी –  Chocolate Brownie Recipe

मैदा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळुन घ्या बेकिंग डिश वर तुपाचा हात फिरवा बटर ला फेटुन सॉफ्ट करा त्यानंतर साखर टाकुन फेटा.

कंडेस्ड मिल्क टाकुन ४ ते ५ मिनीटे फेंटा. दुध आणि मैदाचे मिश्रण टाकुन फेटा त्यात बदामाची पेस्ट टाका. वरून इसेन्स आणि कापलेले अक्रोट टाका. ओव्हन ला १० मिनीटांपर्यंत २५० डिग्री सें वर प्री हीट करा.

त्यानंतर १८० डिग्री सें. वर ३५ ते ४० मिनीट पर्यंत केक ला बेक करा. १० मिनीटांनंतर ओव्हन मधुन काढुन घ्या आणि कट करा. ब्राउनी वर ब्राउनी चा चुरा आणि चॉकलेट सॉस टाका.

तर हि होती आपली ब्राउनी बनविण्याची विधी आपल्याला आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करा. आणि जुळलेले रहा माझीमराठी सोबत.

धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here