Corona Virus: Don’t be Afraid to be Careful
चिनच्या वुहान शहरापासून ज्या विषाणूने संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे,
हजारो लोकांचा जीव घेतला आहे, आणि लाखो लोकांना जगात ज्या विषाणूची लागण झाली आहे,
पृथ्वीवरील प्रगत राष्ट्रही त्यावर कोणतीही लस काढू शकले नाहीत, असा कोरोना विषाणू (Coronavirus) .
तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की कोरोना विषाणू माश्यांद्वारे संक्रमित होतो का?
कोरोना वायरस: घाबरू नका काळजी घ्या – Corona Virus: Don’t be Afraid to be Careful
तर चला मग जाणून घेऊया.
अमिताभ बच्चन यांच्या एका व्हिडीओ नंतर लोकांमध्ये एकच खळबळ उडाली होती, त्यांनी त्या व्हिडिओ मध्ये सांगितले होते की कोरोनाच्या संक्रमनातुन बरे झालेल्या व्यक्तीच्या मनात कोरोना ची भीती असतेच, पुढे ते म्हणाले होते की, संक्रमित व्यक्तीच्या अंगावरील माशी जर उडून आपल्या अंगावर आली तर कोरोनाची लागण होऊ शकते,
त्यांच्या ह्या सांगण्याने लोकांमध्ये खळबळ निर्माण झाली होती.
त्या गोष्टीचे खंडन करताना भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाने (ICMR) सांगितले की माशांच्या द्वारे या विषाणूचे संक्रमण होत नाही.
संक्रमित व्यक्तीच्या शिंकेतून, खोकल्यातून निघालेल्या लहान कणांमुळे या विषाणूचा प्रसार होतो, सोबतच त्या व्यक्तीने वापरलेल्या वस्तूंच्या संपर्कात आल्याने सुद्धा या विषाणूची संक्रमण होण्याची शक्यता अधिक असते.
तर घाबरायचे कोणतेही कारण नाही, कोरोनाला हरविण्यासाठी फक्त आपण घरी राहून सरकार ने सांगितलेल्या नियमांचे पालन करा.
आशा करतो हा लेख आपल्याला आवडला असेल आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करण्यास विसरू नका. अश्याच नवीन लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!