कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ने उघडला जनतेसाठी खजाना.

Latest News 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या २४ तारखेला मोदींजींच्या संबोधना नंतर रात्री १२ वाजतापासून संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला आहे, या लॉकडाऊन मध्ये जनतेच्या मूलभूत गरजा लक्षात घेता.

आज दुपारी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले.

 नरेंद्र मोदी सरकारने केली आर्थिक मदतीची घोषणा – Narendra Modi Government Announced Economic Package 

Coronavirus Relief Package India

देशातील कोणत्याही व्यक्तीला घाबरण्याचे काहीही कारण नाही, सरकार जनतेच्या मदतीसाठी सज्ज आहे, पुढे बोलताना त्यांनी काही घोषणा दिल्या त्या पुढीलप्रमाणे,

) कोरोनाच्या लढाईसाठी केंद्र सरकार ने जारी केले १ लाख ७० हजार करोड चे पॅकेज.

) देशातील २० करोड जन धन खाते असणाऱ्या महिलांच्या खात्यात प्रत्येकी ५०० रुपये मिळणार.

) प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत ३ महिन्यापर्यंत गॅस सिलेंडर मोफत मिळणार.

) एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात प्रधानमंत्री किसान योजनेची पहिली किस्त २००० रुपये ८.७ करोड शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ.

) मनरेगाच्या मजुरांसाठी वेतन वाढवून २०२ रुपये प्रति दिवस मदत मिळणार.

) देशातील गरिबांसाठी ५ किलो गहू किंवा तांदूळ सोबतच १ किलो डाळ देण्याची घोषणा.

) वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचा विमा देण्याची घोषणा.

सरकारने जनतेचे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यासाठी हे सर्व निर्णय घेण्यात आले आहेत, ताज्या बातम्यांसाठी जुळून राहा माझीमराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here