जाणून घ्या MASTER कार्ड, VISA कार्ड आणि RU PAY कार्ड मधील फरक

Difference Between Visa and Mastercard and Rupay

आजच्या या आधुनिक काळात असे काहीच लोक असतील ज्यांना ATM विषयी माहिती नसेल, जवळ जवळ प्रत्येकाला त्याविषयी माहिती आहेच. तसेच कोणत्यातरी बँकेत प्रत्येक नागरिकाचे खाते सुद्धा आहेच. जुन्या काळात चोर-दरोडेखोर यांच्या पासून पैसे चोरी जाण्याची भीती होती.

तेव्हा कोणी जमिनीत आपल्या पैश्याला पेटीमध्ये गाढून ठेवत असत, तर कोणी स्वतःच्या घराच्या आतमध्ये लपून ठेवत असत. म्हणून आपण बरेचदा ऐकतो कि, कोणाला तरी जमिनीत धन मिळाले. वैगैरे वैगैरे.

पण आजच्या या आधुनिक युगात कोणत्याही प्रकारची भीती नसल्यामुळे आपण आपले पैसे सुरक्षित बँकेमध्ये ठेवू शकतो. आणि हवे तेव्हा ते पैसे आपण काढू सुद्धा शकतो. असे काही नाही कि फक्त बँकेतूनच आपण पैसे काढू शकतो. तर आपण आपल्या जवळ असलेल्या ATM  द्वारे सुद्धा आपले पैसे हवे तेव्हा काढू शकतो.

आपण कधी लक्ष देऊन बघितले असेल तर आपल्या लक्षात येईल कि ATM कार्ड वर “Ru Pay”,“Visa Card”, तसेच “MasterCard” यापैकी काहीतरी लिहिलेले राहते, मग ते कार्ड तुम्ही कुठल्याही बँकेतून घेतलेले असो ,आपण कधी विचार केला का? याचा अर्थ काय असेल बर!

जाणून घ्या MASTER कार्ड,VISA कार्ड आणि RU PAY कार्ड मधील फरक – Difference Between Visa and Mastercard and Rupay

Difference Between Visa and Mastercard and Rupay

तर आजच्या लेखात आपण जाणून घेऊया कि, या सर्वांमध्ये नेमका फरक काय आहे?

आपल्याला माहितच असेल कि २० मार्च २०१२ ला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने RuPay कार्ड ला लॉन्च केले होते.

आपल्या देशातील पैसा हा आपल्याच देशात राहावा यासाठी या कार्ड ला लॉन्च केलेले आहे. “RuPay” हे भारताचे ATM क्षेत्रातील घरघुती नेटवर्क आहे. जसे अमेरिकेचे VisaCard, MasterCard, हे घरघुती नेटवर्क आहेत.

चला तर सर्वात पहिले जाणून घेऊया ATM काय आहे? – What is ATM?

अगोदरच्या काळात पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये भली मोठी रांग लाऊन पैसे काढावे लागत असत. त्यामुळे बऱ्याच समस्यांना सामोरे सुद्धा जावे लागत होते.

या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन बँक मध्ये ATM मशीन्स बसविल्या गेल्या. तसेच बँकेने पैसे काढण्यासाठी क्रेडीट कार्ड आणि डेबिट कार्ड द्यायला सुरुवात केली.

बँकेमधून क्रेडीट आणि डेबिट कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला बँकेमध्ये एक निवेदन द्यावे लागेल. त्यानंतर काही दिवसात बँक आपल्याला त्या कार्ड्स उपलब्ध करून देईल.

आजकाल जवळ जवळ सर्वजन पैसे काढण्यासाठी ATM चाच वापर करतात.

प्लास्टिक मनी म्हणजे काय ? – What is Plastic Money?

 जेव्हा आपण कॅश पैशांच्या जागी कोणत्याही व्यवहारासाठी ATM कार्ड चा वापर करतो, तेव्हा त्या ATM च्या वापरलाच प्लास्टिक मनी म्हणून ओळखल्या जाते.

ATM द्वारे केल्या गेलेल्या व्यवहाराला कॅशलेस व्यवहार सुद्धा म्हटल्या जात.

त्यामध्ये VISA CARD, RU PAY CARD, तसेच MASTER CARD यांचा समावेश असतो.

RU PAY कार्ड काय आहे? –  What is RU PAY Card?

२० मार्च २०१२ ला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने “RUPAY”  कार्ड ला लॉन्च केले होते.

हे भारताचे ATM  क्षेत्रातील घरघुती नेटवर्क आहे. ज्यामध्ये पेमेंट साठी लागणारे कमिशन हे MASTER CARD, आणि VISA CARD यांच्या पेक्षा कमी आहे.

तसेच याचा वापर हा भारतात मोठ्या प्रमाणावर होत आहे.

RU  PAY कार्ड हे भारताने प्रगती कडे टाकलेले एक पाउलच आहे. तसे हि या कार्ड ला भारताने बरेच देशामध्ये लाँच केलेले आहे.

MASTER CARD, VISA CARD काय आहे? – What is MASTER CARD, VISA CARD

 MASTER CARD,VISA CARD ह्या दोन्हीही अमेरिकी कंपन्या आहेत, ज्या क्रेडीट कार्ड च्या क्षेत्रात काम करतात ह्यांचा व्यवसाय पूर्ण जगभर व्यापला आहे.

तसेच यांच्या प्रतिस्पर्धेत भारताने सुद्धा आपले पाउल या क्षेत्रात टाकले, तेही RU PAY कार्ड च्या माध्यमातून.

MASTER CARD, VISA CARD, ह्यांचे पेमेंटसाठी लागणारे कमिशन हे जास्त आहे.

तरीही ह्या कंपन्या पूर्ण जगभर २०० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहेत.

आता आपण जाणून घेऊ RU PAY कार्ड व MASTER CARD, VISA CARD यांमध्ये काय फरक आहे – Difference Between Visa and Master card and Ru pay

  1. RU PAY Card  हे भारतीय डेबिट कार्ड आहे. आणि MASTER CARD आणि VISA CARD हे आंतरराष्ट्रीय प्रणालीचे डेबिट कार्ड आहेत.
  2. RU PAY Card चा वापर आपण आंतराष्ट्रीय स्थरावर करू शकत नाही जसा MASTER CARD आणि VISA कार्ड चा करू शकतो.
  3. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पाहिले असता RU PAY कार्ड सुरक्षित आहे, MASTER  कार्ड आणि VISA कार्ड च्या तुलनेत.
  4. कारण याचा वापर आणि संचालन हे फक्त भारतामध्येच आहे.
  5. RU PAY कार्ड ला वापरण्यासाठी आपल्याला काही सीमा आहेत.
  6. कारण ते फक्त डेबिट कार्ड प्रदान करते, पण MASTER कार्ड आणि VISA कार्ड डेबिट तसेच क्रेडीट कार्ड प्रदान करते.
  7. बँकांना MASTER कार्ड आणि VISA कार्ड यांच्या नेटवर्क मध्ये शामिल होण्यासाठी प्रत्येक तीन महिन्याला त्यांना शुल्क भरावा लागतो.
  8. पण तेच RU PAY कार्ड च्या नेटवर्क मध्ये शामिल होण्यासाठी बँकांना कुठल्याही प्रकारचा शुल्क देण्याचे काम नाही.

तर आता तुम्हाला कळले असेलच कि MASTER कार्ड,VISA कार्ड आणि RU PAY कार्ड या मध्ये काय फरक आहे.

अस म्हटल्या जात RU PAY कार्ड हे स्वस्त यासाठी आहे कारण ते फक्त आपल्या भारता पर्यंत मर्यादित आहे.

तुलनेच्या दृष्टीकोनातून पाहिले असता, MASTER कार्ड,VISA कार्ड हे संपूर्ण जगात वापरले जाते त्यामुळे त्यांचे चार्जेस हे जास्त आहेत.

तर आजच्या लेखात आपण पाहिले कि MASTER कार्ड,VISA कार्ड आणि RU PAY यामध्ये कश्या प्रकारे फरक असतो.

तर आशा करतो आपल्याला या लेखातून नवीन काहीतरी शिकायला मिळाले असेल.

आपल्याला या लेखातून काही नवीन शिकायला मिळाले असेल तर आपल्या मित्रांना हा लेख शेयर करायाला विसरू नका.

अवश्य भेट दया majhimarathi.com ला .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top