होळीच्या निमित्त घरीच बनवा हि स्वादिष्ट डिश….गुजीया

Gujiya Recipe

होळी, रंगपंचमी, धुळवड, कितीतरी नावं लाभलेला हा रंगाचा सण फाल्गुन महिन्यात जरी येत असला तरी संपुर्ण वर्षभर याची वाट पाहणारे देखील कमी नाहीत. मराठी महिन्यातील शेवटच्या महीन्यात येणारा हा सण सर्व वयोगटातल्या लोकांना हवाहवासा वाटणारा असा आहे.

प्रांतानुसार या सणाला साजरे करण्याची वेगवेगळी प्रथा, वेगवेगळे पदार्थ जरी असले तरी आनंद मात्र एकसारखाच.

होळी हा रंगांचा सण आहे. असं म्हणतात होळी या सणापासुन वातावरणात नव्या ऋतुला सुरूवात होते. होळी हा विविध रंगांचा सण आहे ज्यात मुख्यतः लाल, गुलाबी, पिवळा, केशरी आणि हिरव्या रंगांचा समावेश होतो. या दिवशी लोग एकमेकांवर रंगाची उधळण करतात. हा सण लोकांना श्रीकृष्णानं गोपीकांसोबत खेळल्या गेलेल्या रासलिलेची आठवण करून देणारा आहे.

भारतात वेगवेगळया समुदायाचे लोक विविध पक्वान्न बनवुन या सणाचा आनंद घेतांना आपल्याला दिसतात, चला तर मग आम्ही आज तुम्हाला खास होळी ला बनवण्यात येणा-या पक्वान्ना ला कसे बनवायचे याची विधी सांगणार आहोत.

तसं पाहता उत्तर भारतात होळी ला विशेषतः गुजिया बनवतात, जो एक गोड समोसा असतो ज्यात खवा, नारळ, ड्रायफ्रुट ला साखरेच्या पाकासोबत भरून बनवण्यात येते.

महाराष्ट्रीयन लोक या दिवशी विशेष करून पुरणपोळी बनवतात.

आज आपण घरी बनवली जाणारी मावा गुजीया कशी बनवायची हे शिकुया.या पदार्थाला तुम्ही बरेच दिवस घरात ठेवु शकता.

चला तर मावा गुजीया बनविण्याची सोपी पध्दत पाहुया.

मावा गुजिया रेसिपी – Mawa Gujiya Recipe in Marathi

Gujiya Recipe in Marathi

मावा गुजिया बनविण्याकरता लागणारी सामग्री – Ingredients of Mawa Guajia

  • २ कप मैदा.
  • २५० ग्रॅम खवा.
  • १ कप साखर.
  • १ चमचा इलायची पावडर.
  • १० ते १२ बदाम.
  • १० ते १२ किशमीश.
  • १ चम्मच खोबऱ्याचे खीस.
  • ३०० ग्रॅम तळण्याकरता तुप किंवा तेल.

खवा गुजिया बनविण्याची विधी – Mawa Guajia Recipe

खव्याला भांडयात घेउन हलका भुरा रंग येईपर्यंत तळा. लालसर भुरा रंग आल्यावर भांडयातुन काढुन बाजुला ठेवा. साखरेला मिक्सरमधे बारीक करून घ्या. बदामाचे बारीक तुकडे करून घ्या. आता साखर, बदाम, किसमीस आणि इलायची पावडरला चांगल्या तऱ्हेने मिक्स करून घ्या.

खवा थंड झाल्यावर त्यात साखर टाकुन चांगल्या तऱ्हेने मिक्स करा.मैदयात ५ चमचे तुप टाका आणि बोटांच्या सहाय्याने मैदयाला चांगले रगडा, त्यानंतर मैदयात पाणी टाकुन मउ गोळा तयार करून घ्या.मळुन झाल्यानंतर त्याला नरम कापडात अर्धा तास झाकुन ठेवा.

आता त्या कणकेचे १० छोटे छोटे गोळे बनवुन घ्या आणि त्याच्या छोटया छोटया पुऱ्या लाटुन घ्या.

जर तुम्ही गुजिया कटर चा उपयोग करत असाल तर पुरी कटर मध्ये ठेवा आणि कटर बंद करा. यामुळे गुजिया पुर्णपणे बंद होईल. हळुच गुजीया बाहेर काढा आणि एका प्लेटला तेल लावुन त्यात हळुच गुजिया ठेवुन दया.

बाकी गोळयांच्या देखील अश्याच गुजिया बनवुन घ्या.

जर तुम्ही गुजिया कटर चा उपयोग करत नसाल तर या विधी चा उपयोग करा – Karanji Recipe in Marathi

आपल्या बोटांना हलकेसे पाणी लावुन पुरीच्या किनाऱ्याला ते लावावे आणि १ चमचा खवा घेउन त्याला पुरीच्या मध्यभागी भरून पुरी ला अर्धे फोल्ड करा.

(चंद्राच्या आकारात) आणि किनार्यांना एकमेकांसोबत जोडा.

लक्षात ठेवा की दोन्ही किनारे एकमेकांना चांगले जोडलेले असावेत.उरलेल्या गोळयांना अश्याच पध्दतीने बनवा.

आता मंद आचेवर एका कढईत तुप गरम करा आणि गुजिया मंद आचेवर तळा.

गुजियाला हलका सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजुने तळुन घ्या.

एका वेळी ५ किंवा ६ पेक्षा जास्त गुजीया कढईत टाकण्याचा प्रयत्न करू नका.

गुजिया आता तुपाच्या वर येउ लागल्या की त्यांना पलटवत राहा.

दर ३ ते ४ मिनीटांनी पलटवत रहा जोपर्यंत त्यांचा रंग सोनेरी होत नाही.

रंग आल्यावर त्या गुजियांना बाहेर काढुन घ्या, तयार आहेत तुमच्या स्वादिष्ट गुजिया.

याला तुम्ही होळी च्या पर्वावर विशेष पक्वान्न म्हणुन बनवु शकता.

होळी च्या शुभकामनांसोबत गुजिया खाऊन तुम्ही होळी च्या रंगामध्ये आणखीन रंग भरू शकता.

तर मंडळी आज आपण बघितले गुजीया बनविण्याची एक प्रकारची रेसिपी, आशा करतो हि रेसिपी वाचल्यानंतर आपण अवश्य एकदा हि डिश घरी बनवाल.

अश्याच नवनवीन रेसिपी आणि लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top