केसांची काळजी कशी घ्याल

Hair Care Tips

आजकाल केसांची समस्या प्रत्येकाकरता डोकेदुखी बनली आहे. चला तर मग आज आपण जाणुन घेउया की केसांच्या समस्येला दुर कसे ठेवता येईल आणि त्यांचे पोषण कसे केले जाउ शकते. केस करतांना, हेयर स्टाईल करतांना, केस प्रदुषीत होतांना, त्यांच्यावर केमीकल चा वापर करतांना तुमच्या केसांना आरामाची गरज असते.

आणि इथे आम्ही तुम्हाला सांगतो आहोत तुमचे केस प्रदुषीत होण्यापासुन कसे वाचु शकतात. इथे केसांना भरपुर पोषण देण्यासोबत त्यांना शुष्क होण्यापासुन आणि प्रदुषणापासुन वाचण्याचे सोपे 5 उपाय दिले आहेत.

Hair Care Tips in Marathi

केसांची काळजी कशी घ्याल – Hair Care Tips in Marathi

1. चांगल्या शॅम्पुचा वापर करा:

जर तुम्ही रोज स्प्रे, जेल आणि क्रिम चा उपयोग करत असाल तर कधी कधी तुमच्या केसांना स्वच्छ ठेवण्याकरता चांगल्या शॅम्पु ने स्वच्छ करणे आवश्यक आहे. शॅम्पु च्या मदतीने तुम्ही तुमच्या केसात लपलेले किटाणु आणि मळाला बाहेर काढु शकता आणि आपल्या केसांना चमकदार आणि स्वच्छ बनवु शकता. आठवडयातुन एकदा असे करायलाच हवे, जर तुम्ही केसांच्या समस्येपासुन वाचु ईच्छिता तर असं करायलाच हवं.

2. आठवडयातुन एकदा निसर्गाच्या सान्निध्यात नक्की जा:

नेहमी कलरिंग करणे, केसांना हेयर ड्रायर ने गरम करणे यामुळे तुमच्या केसांमधले पोषण तत्व हरवु शकतात, आणि म्हणुन तुमच्या केसांना पोषक तत्वांची गरज पडते. तुम्ही तुमच्या केसांना एक छोटासा ब्रेक ( काही दिवस हेयर ड्रायर, कलरिंग न करणे ) का नाही देत ? काही काळ आपल्या केसांना हेयर ड्रायर पासुन दुर ठेवा, ज्याप्रकारे रात्री पुर्ण झोप झाल्यानंतर आपण सकाळी अगदी फ्रेश उठतो त्याचप्रकारे तुमच्या केसांना देखील आरामाची आणि पोषणाची आवश्यकता असते.

3. डीप कंडीशनिंग ट्रीटमेंट:

तुमचे केस आधी जसे होते तसेच परत मिळवण्याचा हा सगळयात चांगला उपाय आहे. या ट्रिटमेंट मध्ये तुमच्या केसांना आवश्यक पोषकतत्व प्रदान केले जातात आणि त्यांना चांगल्या त-हेने स्वच्छ केले जाते. या ट्रिटमेंट मध्ये केसांची आतुन स्वच्छता केली जाते जी खुप आवश्यक आहे. यामुळे केस गळण्याची समस्या, कोंडयाची समस्या आणि ब-याच समस्यांपासुन तुमची सुटका होउ शकते. असे केल्यास तुमच्या केसांना नैसर्गिक चमक प्राप्त होईल.

4. मोठया दातांच्या कंगव्याचा वापर करा:

कमजोर केसांविषयी जेव्हां तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ब्रशमुळे आणि छोटया दातांच्या कंगव्यामुळे तुमच्या केसांना नुकसान पोहोचु शकते, इतकच नाही तर ते गळु शकतात. अंघोळीनंतर आरामात आपल्या केसांना मोठया दातांच्या कंगव्यानी विंचरा. यामुळे तुमचे केस स्वस्थ, मजबुत आणि दाट राहातील.

5. सारखे केसांना धुवु नका . . . केसांना धुणे कमी करा:

तुम्ही यावर विश्वास ठेवा अगर ठेवु नका पण तुमच्या केसांना रोज धुण्याची गरज नाही. रोज रोज केस धुतल्याने तुमच्या केसांना पोषकतत्व मिळत नाहीत आणि यामुळे ते कोरडे शुष्क बनतात आणि गळु लागतात. तुम्ही तुमच्या केसांना थोडा ब्रेक का नाही देत ? 2 ते 3 दिवसाआड केस का धुत नाही? 2 ते 3 दिवसाआड केस धुतल्याने तुमचे केस स्वस्थ राहातील आणि चमकदार होतील.

तुमच्या केसांना पाहुन तुम्हालाच आश्चर्य वाटेल की तुमचे केस इतके मउ चमकदार आणि सुंदर कसे झाले. असे केल्याने तुम्हाला तुमचे केस जास्त तेलकट वाटणार नाहीत आणि तुम्ही ते चांगल्या त-हेने सेट करू शकाल.

मजबुत केसांकरता या 5 उपायांना तुम्ही नक्की करून पाहा. यामुळे तुम्ही तुमच्या केसांची चांगली काळजी घेउ शकाल. केस हे सौंदर्यात फार महत्वाचा भाग आहेत आणि म्हणुन आपल्या सौंदर्यासोबत आपण आपल्या केसांची देखील तेवढीच काळजी घ्यायला हवी. आणि त्यांची काळजी घेतांना होईल तेवढे प्रयत्न करायला हवे.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ Hair Care Tips in Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here