Heart Attack Symptoms in Marathi
हृदयविकार ही व्याधी आजकाल सामान्य आजारासारखीच सगळीकडे ऐकायला येते.
या आजाराला तर आता वयोमर्यादा देखील राहीलेली दिसत नाही अगदी 25 ते 30 या तरूण वयोगटात देखील हृदयविकार बळावलेला आपल्याला पहायला मिळतो, याचे कारण बघता आपली सध्याची जीवनशैली हेच मुख्य कारण निदर्शनास येतं.
आपण नेहमी टि व्ही मधे बघतो की हृदयविकाराचा झटका जेव्हां येतो तेव्हां छातीत दुखु लागतं.
सगळे हृदयविकाराचे झटके अचानक येत नाहीत, एका अभ्यासात असे माहीत झाले की हृदयविकारात 100 पैकी 80 रूग्णांना छातीत वेदना जाणवत नाहीत.
हृदयविकाराची लक्षणं – Heart Attack Symptoms in Marathi
हृदयविकाराची लक्षण वेगवेगळी असतात. काहींना हृदयविकार येण्याआधी काही लक्षण देखील दिसतात, तुम्हाला दिसणारी लक्षणं दुस.यापेक्षा वेगळी देखील असु शकतात. परंतु हृदयविकाराच्या लक्षणांना माहीत करणं खुप आवश्यक आहे.
चला तर हृदयविकाराच्या लक्षणांना माहीत करून घेउया.
- हृदयविकारातील सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे, अस्वस्थ वाटणे. ही लक्षणं महीला आणि पुरूषांमधे देखील दिसतात.
- हृदयविकार हळु हळु येतो आणि येण्याआधी तुम्हाला थोडे दुखु लागते किंवा अस्वस्थ वाटु लागते. ही लक्षणं तुम्हाला अचानक देखील दिसु शकतात किंवा हळुहळु देखील येउ शकतात. ही लक्षण तुम्हाला कित्येक तास देखील त्रास देउ शकतात.
- शरीराच्या वरच्या भागात दुखु लागते, खांदे, मागचा भाग, मान किंवा पोटात देखील दुखु लागते.
- ज्यांना जास्त प्रमाणात शुगर ची समस्या जाणवते त्यांना हृदयविकाराचा झटका कधीही येउ शकतो त्यांची लक्षण दिसतीलच असे आवश्यक नाही.
- श्वास कमी होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे हे देखील तुमचे महत्वाचे लक्षण असु शकते. श्वास घेण्यास त्रास तुम्हाला छातीत दुखण्या आधी सुरू होउ शकतो. काही शारीरिक श्रम करण्याआधी तुम्हाला श्वास घेण्यास त्रास उद्भवु शकतो.
- स्त्रियांमधील लक्षणात श्वास घेण्यास त्रास होणे, उलटी होणे, थकवा जाणवणे, मागच्या भागात दुखु लागणे, खांदे दुखणे. ही लक्षणं प्रामुख्याने दिसतात.
काही लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्यापुर्वी काहीच लक्षणं दिसत नाहीत.
असा हृदयविकार जो अचानक किंवा लक्षणांशिवाय येतो अश्या हृदयविकाराला सायलेंट हार्ट अॅटॅक असे म्हणतात.
जेव्हां छातीत होणा.या वेदना तीव्र व्हायला लागतील तर समजुन जा की ही हृदयविकाराची लक्षणं आहेत.
जेव्हां ही तुम्हाला छातीत वेदना जाणवतील तर आपल्या डॉक्टर कडुन तपासणी जरूर करून घ्या.
हृदयविकाराची आणखीन काही लक्षणं:
खाली दिलेल्या हृदयविकाराच्या आणखीन काही लक्षणांना लक्षात घ्या.
- थंडीच्या ऋतुत देखील खुप घाम येणे
- काही कारणा शिवायही थकवा जाणवणे. जर आपण महिला आहात तर तुम्हाला कित्येक दिवस सतत थकवा जाणवु शकतो.
- पोटात दुखणे किंवा उलटया होणे.
- डोक्यात अचानक जास्त दुखु लागणे.
हृदयविकार असणा.या सगळया रूग्णांमधे ही सगळी लक्षण असतीलच असे नाही. म्हणुन हृदयविकार असणा.या प्रत्येक रूग्णाची लक्षणं वेगवेगळी असतात.
जेव्हांही तुम्हाला असे वाटेल की तुम्हाला हृदयविकाराची लक्षण दिसतायेत तर लगेच कुणालातरी आवाज द्या. मदतीकरता 911 वर कॉल करा.
- हृदयविकार होताच ताबडतोब अॅक्शन घेतल्यास तुमचा जीव वाचु शकतो.
- रूग्णवाहिकेत जाणे तुमच्याकरता सगळयात फायदेशीर उपाय आहे. त्यात तातडीने मेडीकल सव्र्हिस उपलब्ध असते त्यामुळे तुम्हाला फायदा होउ शकतो. आणि जे रूग्ण अॅम्ब्युलन्स ने हॉस्पीटल ला पोहोचतात त्यांच्यावर लगेच उपचार केले जातात.
911 वर कॉल केल्यास तुम्हाला पुष्कळ मदत मिळु शकते. इमरजन्सी असल्यास ते तुम्हाला सल्ला देखील देउ शकतात.
Read More:
लक्ष्य दया: Heart Attack Symptoms तुम्हाला आवडले असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्