Home / Beauty / पायांच्या भेगांकरता घरगुती उपाय – Home Remedies For Cracked Heels

पायांच्या भेगांकरता घरगुती उपाय – Home Remedies For Cracked Heels

Home Remedies For Cracked Heels in Marathi

पायाला पडणा-या भेगा या स्वतःकडे दुर्लक्ष करण्याचा दुष्परीणाम असतो. ब-याच महिलांना पायाला भेगा पडण्याची समस्या असते. आपल्या पायाला पुरेसे तेल आणि पुरेसे पाणी न मिळाल्याने पाय कोरडे पडतात आणि त्यानंतर चीरा अर्थात भेगा पडायला सुरूवात होते. माॅश्चराइजेशन ची कमतरता, धुळ, माती मुळे पायाचे कायम स्वच्छ नसणे आणि काही शारिरीक समस्या यामुळे आपल्या पायाची टाच कोरडी पडुन भेगा पडतात.

पायाच्या भेगांपासुन सुटका मिळवण्याकरता काही घरगुती उपाय इथे देत आहोत ज्याचा उपयोग करून आपण पायांच्या भेगांपासुन सुटका मिळवु शकतो.

Home Remedies For Cracked Heels

पायांच्या भेगांकरता घरगुती उपाय – Home Remedies For Cracked Heels in Marathi

1) लिंबु, मीठ, ग्लिसरीन, गुलाबजल यापासुन बनवलेले फुट मास्क:

सामग्री:

 • गरम पाणी
 • 1 चमचा मीठ
 • अर्धा कप लिंबाचा रस
 • 2 चमचे ग्लिसरीन
 • 2 छोटे चमचे गुलाबजल
 • फुट स्क्रबर

कृती:

 • गरम पाण्याने भरलेले एक भांडे घ्या त्यात मीठ, लिंबाच्या रसाचे 8 ते 10 थेंब, 1 चमचा ग्लिसरीन आणि 1 चमचा गुलाबजल टाका आता या पाण्यात कमीत कमी 15 ते 20 मिनीटे आपले पाय बुडवुन बसा.
 • आता फुट स्क्रबर च्या मदतीने आपल्या टाचा आणि पायांना स्क्रब करा.
 • 1 चमचा ग्लिसरीन, 1 चमचा गुलाबजल आणि 1 चमचा लिंबाच्या रसाचे एक मिश्रण तयार करा आता या मिश्रणाला आपल्या भेगांना लावा, हे लावुन तुम्ही मोजे देखील घालु शकता हे मिश्रण रात्रभर पायाला लावुन असुदया.
 • सकाळी थंड पाण्याने आपले पाय स्वच्छ करून घ्या.
 • हा प्रयोग करतांना एक काळजी अशी घ्यायची की लिंबाच्या रसाने तुमची त्वचा कोरडी होउ शकते तेव्हां हा प्रयोग करण्याआधी छोटीशी स्कीन टेस्ट करून बघा.

2) व्हेजिटेबल आॅईल मुळे पायांच्या भेगांपासुन सुटका:

सामग्री:

 • 2 चमचे व्हेजीटेबल आॅईल

याचा उपयोग असा करावा:

 • पायांना स्वच्छ धुवुन घ्या चांगल्या टाॅवेलने पुसुन पाय कोरडे करा आता व्हेजीटेबल आॅईलला पायांना पडलेल्या भेगांमध्ये भरा.
 • तेल लावल्यानंतर मोजे घालुन घ्या आणि ते तेल पायांना रात्रभर तसेच राहुदया.
 • सकाळी पायु धुवुन घ्या.

3) पायाच्या भेगांकरता मध:

सामग्री:

 • 1 कप मध
 • गरम पाणी

उपयोग असा करा:

 • एक कप मध अर्धा बादली गरम पाण्यात टाका
 • आपल्या पायांना 15 ते 20 मिनीटे त्या पाण्यात बुडवुन ठेवा.
 • आता पायांना हलक्या हाताने साफ करत राहा आणि मग टाॅवेलने स्वच्छ पुसुन घ्या.

4) पायांच्या भेगांकरता तांदळाचे पीठ:

सामग्री:

 • 2 ते 3 चमचे तांदुळ
 • 1 छोटा चमचा मध
 • 3 ते 4 थेंब साइडर विनेगर

याचा उपयोग असा करावा:

 • सर्वात आधी 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ घेउन त्यात मध आणि अॅप्पल साइडर व्हिनेगर चे काही थेंब टाकुन घट्ट पेस्ट बनवा.
 • जर तुमचे पाय जास्त फाटलेले आणि कोरडे आहेत तर तुम्ही या मिश्रणात एक चमचा आॅलीव्ह (जैतुन) आॅईल आणि गोड बदामाचे तेल देखील टाकु शकता.
 • आता पायांना गरम पाण्यात कमीत कमी 10 मिनीटं भिजवुन ठेवा आणि त्यानंतर या पेस्ट ने हलक्या हातांनी आपल्या पायांना स्क्रब करा यामुळे पायावरची डेड स्कीन निघुन जाईल.

5) पायाच्या भेगांकरता जैतुन तेल:

सामग्री:

 • 1 चमचा जैतुन चे तेल

याचा उपयोग असा करावा:

 • कापसाच्या सहाय्याने आपल्या पायांच्या भेगांना जैतुनचे तेल लावा आणि 10 ते 15 मिनीटं आपल्या पायांना हलक्या हाताने मसाज करा.
 • लावल्यानंतर जाड काॅटनचे मोजे घालुन घ्या आणि एक तासाने पायांना धुवुन घ्या.

6) पायाच्या भेगांरता नारळाचे तेल (खोबरेल तेल):

सामग्री:

 • 2 चमचे नारळाचे तेल
 • मोजे

याचा उपयोग असा करावा:

 • हळुहळु पायांना तेल लावा.
 • लावल्यानंतर मोजे घालुन घ्या आणि पलंगावर झोपा. रात्रभर पाय तसेच राहुदया आणि सकाळी पाय धुवुन घ्या.

7) पायाच्या भेगांकरता बेकिंग सोडा:

सामग्री:

 • 3 चमचे बेकिंग सोडा
 • गरम पाणी
 • एक बादली
 • मेणबत्ती

याचा उपयोग असा करा:

 • अर्धा बादली गरम पाणी घ्या त्यात बेकिंग सोडा टाका. सोडा चांगला मिसळुन घ्या.
 • आपल्या पायांना 10 ते 15 मिनीटं त्यात बुडवुन ठेवा.
 • पायांना आता मेणबत्तीच्या मेणाने हलक्या हातांनी मसाज करा.
 • आता पायांना चांगल्या पाण्याने धुवुन घ्या.

8) पायाच्या भेगांकरता अॅलोव्हेरा (कोरफड):

सामग्री:

 • अॅलोव्हेरा जेल
 • कोमट पाणी
 • पाय बुडवण्याकरता भांडे
 • मोजे

याचा उपयोग असा करावा:

 • काही वेळापर्यंत आपल्या पायांना गरम पाण्यात बुडवुन ठेवा.
 • पाय वाळल्यानंतर आपल्या पायांना अॅलोव्हेरा जेल लावा.
 • लावल्यानंतर लगेच मोजे घालुन घ्या आणि रात्रभर तसेच राहुदया.

9) पायाच्या भेगांकरता केळ:

सामग्री:

 • 1 पिकलेले केळ
 • अर्धा अवोकाडो

याचा उपयोग असा करा:

 • एक पिकलेले केळ आणि अर्धे अवोकाडो याला चांगले मिक्स करा.
 • या घट्ट मिश्रणाला आपल्या पायाला आणि भेगांना लावा.
 • 10 ते 15 मिनीटे याला लावलेल्या अवस्थेतच राहुदया आणि नंतर गरम पाण्याने पायु धुवुन घ्या.

पायांना भेगांपासुन वाचवण्याचे तसे तर बरेचसे उपाय आहेत पण सगळयात चांगला उपाय म्हणजे आपण आपल्या पायांची काळजी घेत त्यांना माॅश्चराइज ठेवा आणि धुळ माती पायांना लागणार नाही असे बघा. वेळोवेळी पायांना नैसर्गिक तेलाने मसाज करा, पायांना गरम पाण्यात बुडवुन ठेवा, आणि त्वचेसंबधी गंभीर समस्या उद्भवल्यास डाक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

तर आता तुम्हाला पायांच्या भेगांपासुन मुक्ती कशी मिळवायची याचे बरेच उपाय सापडले आहेत तर मग वाट कसली बघताय? यामधुन कोणताही एक उपाय करून पायांच्या भेगांपासुन मुक्ती मिळवा.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी  Home Remedies For Cracked Heels असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा पायांच्या भेगांकरता घरगुती उपाय – Home Remedies For Cracked Heels तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा.

नोट: पायांच्या भेगांकरता घरगुती उपाय – Home Remedies For Cracked Heels या लेखात दिलेल्या घरगुती उपायाबद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

Nail Care Tips

नखांचे सौंदर्य वाढवण्याचे उपाय | Nail Care Tips

आपल्या आरोग्याबद्दल आपण म्हणावं तितकं जागरूक नसतो. रोजच्या आपल्या कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *