Hot and Sour Soup
आपल्याकडे चायनीज पदार्थ खुप चवीने खाल्ल्या जातात आणि सुप म्हणाल तर लहानांपासुन तर मोठयांपर्यंत आवडीने पितात, या चायनिज रेसिपी बनवल्या कश्या जातात हे बहुतेकांना माहीत नाही पण आज आम्ही तुमचा हा प्रॉब्लेम दुर करणार आहोत आणि बनवणार आहोत हॉट अँड सॉर सुप. त्याकरता लागणारी सामग्री आणि विधी अशी आहे.
वेज हॉट एण्ड सॉर सूप रेसिपी – Hot and Sour Soup Recipe in Marathi
हॉट अँड सॉर सुप बनविण्याकरता सामग्री –
- ६ टेबलस्पुन पनीर
- ३ ते ४ कप बारीक कापलेली पत्ताकोबी
- ३ टेबलस्पुन बारीक कापलेला गाजर
- १० मशरूम, १ टीस्पुन कापलेली हिरवी मीरची
- २ टिस्पुन चिली ऑईल मार्केट मध्ये उपलब्ध
- ३ टेबलस्पुन गार्लिक चिली सॉस
- ३ टेबलस्पुन विनेगर
- १२ टिस्पुन डार्क सोया सॉस
- १ टिस्पुन मीठ
- ३ चिमुट अजिनोमोटो
- २ चिमुट काळीमीर्च पावडर
- थोडासा कॉर्नफ्लॉवर चा घोळ
- ३ टेबलस्पुन बारीक कापलेली कोथींबीर
हॉट अँड सॉर सुपबनविण्याची विधी – Hot and Sour Soup Recipe
४ कप पाणी उकळुन घ्या. कॉर्नफ्लॉवर चा घोळ आणि कोथींबीर सोडुन बाकी सर्व सामग्री उकळत्या पाण्यात टाकुन ३ ते ४ मिनीटे शिजवा. कॉर्नफ्लॉवर चा घोळ टाकुन थोडयावेळ आणखीन शिजवा. शेवटी कोथींबीरीने सजवुन गरम गरम सर्व करा.
तर तयार आहे आपले हॉट अँड सॉर सुप आपल्याला हि रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद!