How To Get Rid Of Cockroach
काॅकरोच जगातील सर्वसाधारण किटकांपैकी एक किटक आहे. खादयपदार्थांच्या ओढीने आणि पाण्याच्या शोधार्थ तुमच्या घराकडे ते आकर्षीत होतात.
लहान रूपातील हे झुरळ दिसायला कुरूप आणि आपल्या स्वास्थ्याकरता हानिकारक असतात. झुरळ स्वतःसोबत बरेच जीवजंतु आणि बॅक्टेरिया घेउन फिरत असतात, असे जंतु जे ब-याच रोगांना आमंत्रण देतात.

झुरळांपासून सुटका हवी आहे मग करून पहा हे उपाय – How To Get Rid Of Cockroach
झुरळ आपल्या आजुबाजुची जागा देखील दुषीत करतात आणि घरातील उत्पादनांना नुकसान पोहोचवतात ज्याचा लोकांवर हानिकारक प्रभाव पडतो. घरात असणा-या वस्तु जसे पुस्तकं, कपडे, इलेक्ट्राॅनिक उपकरणं, वायर अश्या ब-याच वस्तुंना हे झुरळं हानी पोहोचवतात. आणि घरात जेव्हां हे मोठया प्रमाणात असतात तेव्हा घरात एकप्रकारचा उग्र वास देखील येतो.
आपल्याला माहीतीच आहे की झुरळ खुप लवकर प्रजोत्पादन अर्थात पुर्ननिर्मीती करतात आणि म्हणुन या सगळयापासुन वाचण्याकरता काही प्रभावशाली उपाय अमलात आणुन झुरळांना आपल्याला घराबाहेर काढायला हवं. कारण जेव्हा हे कमी प्रमाणात घरात असतील तेव्हा यांना बाहेर काढणं सोप राहातं.
एकदा का काॅकरोच ने तुमच्या घरात स्वतःचं घर बनवलं तर मग त्यांना घरातुन बाहेर काढणं कठीण होउन बसतं. आणि म्हणुन त्यांना घरात प्रवेश करण्यापुर्वीच त्यावर चांगली उपाययोजना करायला हवी. याच्याकरता तुम्ही किटकनाशकं किंवा तत्सम गोष्टीचा उपयोग अमलात आणु शकता.
बाजारात झुरळ पळवण्याकरता बरेच उत्पादनं उपलब्ध आहेत ज्याचा उपयोग करून आपण सहज झुरळांना बाहेर काढु शकतो पण असे उत्पादनं कधी कधी आपल्या आरोग्याला धोक्याचे ठरू शकतात.
पण काही नैसर्गिक उपाय असे आहेत जे आपल्याला हानी न पोहोचवता झुरळांपासुन आपली सुटका करू शकतात.
झुरळांपासुन मुक्ती मिळवण्याचे काही घरगुती उपाय खाली दिले आहेत.
- कडुनिंब
कडुनिंब सर्व प्रभावशाली वृक्षांमधील एक गुणकारी वृक्ष आहे ज्यात किटकांना मारण्याची आणि दुर ठेवण्याची क्षमता आहे. कडुनिंबाचे तेल वा पावडर किटकांना नियंत्रीत करण्याचा एक चांगला बायोलाॅजिकल पर्याय ठरू शकतो. यात जास्त मात्रेत वोलेटाईल तत्व असतात जे किटक नियंत्रणात महत्वाची भुमिका बजावतात. हे खुप स्वस्त देखील असतं जे तुम्ही बाजारातुन आणुन किंवा घरी तयार करून उपयोगात आणु शकतात. बाजारात मिळणा-या किटक नियंत्रण उपयांपेक्षा तुम्ही याचा उपयोग करू शकता.
वापरण्याची पध्दत
1 चमचा कडुनिंबाच्या तेलाला साधारण आकाराच्या स्प्रे बाॅटल मध्ये टाका आणि त्यात पाणी भरा रात्री झोपायच्या अगोदर झुरळ असलेल्या ठिकाणी हा स्प्रे मारा, आवश्यकता भासल्यास दुस-या जागांवर देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता.
दुसरा प्रकार म्हणजे झोपायला जाण्यापुर्वी कडुनिंबाच्या पावडरला प्रभावीत जागी शिंपडुन दया.
- बोरेक्स आणि साखर
वाढत्या झुरळावंर बोरेक्स हा चांगला पर्याय आहे हा काॅकरोच ला घरात येण्यापासुन देखील रोखतो. बोरेक्स किटकांना हाइडेªट करतो आणि त्यांच्या पाचनतंत्राला नुकसान पोहोचवतो त्यामुळे लगेच किटक मरण पावतात. बोरेक्स चा प्रभाव वाढवण्याकरता तुम्ही याचा उपयोग साखरेसोबत देखील करू शकता कारण साखरेला काॅकरोच आकर्षीत होतात.
वापरण्याची पध्दत
- समान मात्रेत बोरेक्स आणि साखर घेउन एकत्र करा.
- रात्री या मिश्रणाला झुरळ येण्याच्या जागी ठेवा ( हे करत असतांना एकतर ग्लोझ घाला किंवा प्रयोग केल्यानंतर लगेच हात साबणाने धुवुन टाका )
- सकाळी तुम्हाला मेलेले काॅकरोच दिसतील जे तुम्हाला दुर फेकावे लागतील.
- हा प्रयोग लागोपाठ काही दिवसांपर्यंत करत राहा.
- बोरेक्स च्या ऐवेजी तुम्ही बोरिक एसिड किंवा बेकिंग सोडा देखील उपयोगात आणु शकता.
नोट: जर तुमच्या घरात लहान मुल असेल तर सहसा हे उपाय करू नका.
- पुदीना
पुदीना देखील झुरळांकरता प्रतिरोधक म्हणुन कार्य करतो. पुदिन्यात असणारे गुणधर्म लपुन बसलेल्या किटकांना शोधुन मारू शकत.
पुदीन्याच्या तेलात प्रभावशाली गुण असतात जे किटकांना मारण्यात उपयोगी पडतात.
वापरण्याची पध्दत
पुदीन्याच्या ताज्या पानांना पातळ पिशवीत टाका आणि अश्या जागी ही पिशवी ठेवा जीथे झुरळ दिसतात. वरच्यावर 2 ते 3 दिवसानंतर ही पानं बदलत राहा.
पुदीन्याची काही पानं पाण्यात उकळुन, पाणी थंड झाल्यावर हे पाणी झुरळ येत असलेल्या आणि स्वयंपाकघरातल्या घाण असलेल्या जागी शिपंडा.
- काॅफी चा वास
झुरळ घरातील कोणत्याही कोप-यात लपले का असेनात, काॅफी च्या वासाने ते बाहेर येतात. काॅकरोच पासुन सुटका मिळवण्याचा हा देखील एक जालीम उपाय आहे.
वापरण्याची पध्दत
पाण्याच्या जार मध्ये पाणी घ्या
काॅफी थोडीशी पेपर वर घेउन त्या जार मध्ये टाका.
झुरळ येत असलेल्या जागी हा जार ठेउन दया, याचा सुगंध झुरळाला मिळताच झुरळं या जारकडे आकर्षीत होतात आणि जार मध्ये येतात नंतर त्यांना बाहेर निघणं अशक्य होतं.
काही दिवस हा प्रयोग तुम्ही नियमीत देखील करू शकता.
या सर्व उपायांना अमलात आणुन तुम्ही काॅकरोच पासुन मुक्ती मिळवु शकता.
लक्ष्य दया: How To Get Rid Of Cockroach In Marathi दातांचे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काही उपाय तुम्हाला आवडले असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्