मासिक पाळीतील वेदनांना कमी करण्यासाठी काही घरघुती उपाय

Masik Pali Upay

यौवनावस्थेत प्रवेश केला की महिलांमध्ये मासीक पाळीचे चक्र नियमीत होते. यावेळी शरीरातुन रक्तस्त्राव होतो त्यावेळी अनेकदा दुखणे येते, त्याचा त्रास व्हायला लागतो. मासीक धर्माचे चक्र एक शारीरीक प्रक्रिया आहे.

मासीक धर्म येणे म्हणजे स्त्री प्रजननासाठी परिपक्व आहे तसेच ती गर्भधारणाही करू शकते. मासिक पाळीत स्त्रवणारे रक्त गर्भातील अस्तरांतुन गर्भाशयाच्या बाहेरील आवरणातुन योनीत प्रवेश करून त्या बाहेर पडते त्यावेळी बरेचदा वेदना होतात ज्या असहाय्य असू शकतात.

मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय – How to Get Rid of Period Pain Home Remedies in Marathi

How to Get Rid of Period Pain Home Remedies

मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी उपाय – Remedies For Menstrual Pain In Marathi

स्त्री जेव्हां गर्भावस्थेत नसते तेव्हां मासिक पाळी एका महिन्याच्या अंतरात येते मासिक पाळीचे नियीमत वेळेवर येणे हे दर्शवतो की स्त्री प्रजनना योग्य आहे. यावेळी महिलांना काही वेदनाही होतात या वेदनांना काही घरगुती उपायांनी आपण कमी करू शकतो.

चला तर माहिती करून घेउया, काही सोपे उपाय ज्यांना वापरून आपण मासिक पाळीत येणाऱ्या वेदना कमी करू शकतो.

१) हिट पॅक – Hit pack

शरीराच्या उतार उदरावरील भागात मासिक पाळीच्या वेळी हीट पॅक लावल्याने स्त्रवणारे तरल चांगल्याप्रकारे व वेदनारहीत स्वरूपात बाहेर पडते. शिवाय कमरेच्या हाडांची मालीशही होते. एका बॉटलमध्ये गरम पाणी घेउन त्यावर नरम कपडा गुंडाळावा व आपल्या खालील उदरावर काही वेळ ठेवून आराम करावा, दिवसातुन २-३ वेळा ही प्रक्रिया करावी.

दुसरा उपाय हा आहे की गरम पाण्यात नरम कपडा भिजवुन त्यातील अतिरिक्त पाणी काढुन घ्यावे व तो ओटी पोटावर ठेवावा. थंड होईपर्यंत आराम करावा. काही वेळाने परत हीच प्रक्रिया परत करावी. लक्षात ठेवा की पाणी फार जास्त गरम नसावे.

२) गर्भ शावर किंवा स्नान – Take Bath

मसिक पाळीत गरम पाण्याचे शावर घेतल्यास किंवा स्नान केल्याने मासिक पाळीतील वेदना कमी होतात. यामुळे तुमच्या शरीराचे तापमान वाढते व शरीर अधिक मोकळे होते त्यामुळे गर्भाशयाचे व्दार खुलल्या जाते त्यामुळे रक्तस्त्राव वाढतो. ही प्रक्रिया त्यांच्यासाठी उपयुक्त आहे ज्यांना पाळीत कमी तरल स्त्रवतो.

३) उदरीय मालीश/ मसाज – Bdominal massage

आपल्या ओटीपोटाची मालीश गरम केलेल्या तेलाने केल्यास पाळीत होणारी वेदना कमी करता येते. मालीश झोपुन उभे राहुन किंवा चालता चालता करता येते. शक्यतो एरंडीच्या तेलाने मालीश करावी. हलक्या हाताने ५ ते १० मिनीटांपर्यंत मालीश करावी. जोपर्यंत मासीक पाळी संपत नाही तोवर मालीश करत राहावी.

४) जीवनसत्व “क” युक्त पदार्थ खावेत – Eat  Foods  Containing  Vitamin “C”

मसिक पाळीत खानपानाचे विशेष लक्ष ठेवावे. आहारात तेलकट व मसालेदार पदार्थ खाण्यास टाळावेत. शक्यतोवर जीवनसत्व युक्त पदार्थ व फळे खावीत, जसे शिमला मिरची, टोमॅटो, लिंबु, संत्री, मोसंबी, पपई, हिरव्या भाज्या. यासोबतच आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेही आहार घेवू शकता.

५) तरल पदार्थ – Takes  Liquids

शक्यतोवर मासिक पाळीत जीवनसत्व “C”A” लोहयुक्त फळे व भाज्यांचे ज्युस प्यावेत तसेच भाज्यांचे सुप प्यावेत. त्यासोबतच मासिक पाळीच्या दिवसात ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. सोबतच ग्रीन टी, ताजी रसाळ फळे व भाज्यांचे सलाद व ज्युस घ्यावेत. जेवढे जास्त तरल पदार्थ खाण्यात येतील तेवढा फायदा होईल. मासिक पाळीत कॉफी, सोडा, अल्कोहोल युक्त मदय प्राशन करू नये.

६) व्यायाम – Exercise

मसिक पाळीत जास्तीत जास्त व्यायामाचा सराव करावा. सकाळी चालणे, योगप्रकारांचा सराव, प्राणायाम, व अॅरोबिक्सचे प्रकार. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बाहेर जाण्यास वेळ नसल्यास घरीच व्यायाम करावा. घरातील कामे उभी राहुन करावीत जास्त बैठे काम करू नये. व्यायामामुळे मानसिक बळ मिळते जे मासिक पाळीचे नैराश्य दुर करण्यास मदत करते. सोबतच स्विमिंग करणेही फार लाभदायक मानले जाते.

७) हळद – Turmeric

हळद आपणांस मासिक पाळीच्या काळात हिट आणि फिट ठेवण्यास मदत करते. मासिक पाळीतील वेदना, घाणवास व पोट दुखणे हळदीच्या सेवनाने बसते. गुळासोबत हळद मिसळुन त्याचे गोळे सकाळी घेतल्यास फायदा होतो. हळद आपल्या शरीरातील उर्जेस वाढवते त्यामुळे तरल स्त्राव नियमीत होतो.

एक ग्लासभर दुधात १ चमचा हळद मिसळुन घेतल्यास फायदा होतो. पाण्यात हळद, तेजपान, तुळशीची पाने व गुळ टाकुन त्यांचा काढा घेतल्यास मासिकपाळीतील वेदना कमी होतात.

काही आवश्यक टिप्स् – Some Important Tips 

  1. रोज ८ ते १० ग्लास पाणी नक्की प्यावे.
  2. गरम उर्जेदार फळे व पालेभाज्या खाव्यात.
  3. किमान दिवसातुन दोनदा गरम पाण्याने आंघोळ करावी.
  4. जास्त वजन उचलु नये.

तर आपण या लेखात पाहिले मासिक पाळीतील वेदनांना कमी करण्याचे काही घरघुती उपाय आशा करतो या लेखातून आपल्याला नवीन काही शिकायला मिळाले असेल,अश्याच नवनवीन माहितीपर लेखांसाठी माझी मराठीशी जुळलेले रहा.

धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top