सौंदर्यवाढविण्यासाठीचे घरगुती सोपे उपाय

Look Younger

तरूण राहायला , तरूण दिसायला कुणाला आवडत नाही ? प्रत्येकाला आवडतं.आणि सतत आपली धडपड आपण तरूण दिसावं याकरता सुरू असते, आपण याकरता बराच खर्च देखील करत असतो, कधी याचा फायदा होतो तर कधी पैसे निरर्थक वाया जातात . . .
वाढत्या वयाबरोबर प्रत्येकजण आपल्या त्वचेला घेउन गोंधळलेल्या अवस्थेत असतो,त्वचेवर सुरकुत्या दिसायला लागतात आणि त्वचेवर वार्धक्याची चाहुल जाणवायला लागते .

पण आता चिंता सोडा कारण आम्ही आपल्याला सौंदर्यवाढीकरता तसच उत्तम त्वचेकरता काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे आपण आपल्या वार्धक्याला दुर ठेवु शकता.आणि विशेष म्हणजे या उपायात लागणा-या वस्तु आपल्याला बाहेर जावुन आणायची आवश्यकता पडणार नाही तर घरातल्या घरात या वस्तु सहज उपलब्ध होतील .

सौंदर्यवाढविण्यासाठीचे घरगुती सोपे उपाय – How to Look Younger Naturally

how to look younger naturally

तरुण दिसायचे रहस्य – Secret Of Looking Young

चला तर मग जाणून घेऊया सौंदर्यवाढविण्यासाठी तसेच उत्तम त्वचेकरता घरगुती उपाय.

1) अंडयाचा पॅक – Egg Pack

अंडयाची पेस्ट 1 चमचा वाटीत घ्या त्यात अर्धा चमचा दुधाची साय, अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. मिश्रणाला चांगले हलवुन घ्या एकजीव झाल्यानंतर चेहे-याला लावा, कमीत कमी 20 मिनीटे राहुद्या, नंतर थंड पाण्याने चेहेरा धुवून घ्या. आठवडयातुन किमान तीन ते चार वेळा हा उपाय अमलांत आणा.

2) गाजर पॅक – Carrot Pack

अर्धा इंच गाजर कापुन घ्या आणि अर्धा बटाटा घेउन दोघांना चांगले उकळुन घ्या, त्यानंतर दोन्हींना चांगले एकत्र करा त्यात चिमुटभर बेकिंग सोडा आणि हळद टाकुन एकजीव मिश्रण तयार झाल्यानंतर चेहे-याला लावा. 2 मिनीटानंतर कोमट पाण्याने चेहेरा धुवुन टाका. या पॅक चा उपयोग केल्यास चेहे-यावरच्या सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा मुलायम होते.

3) गुलाबजल पॅक – Rose Water

1 थेंब ग्लिसरीन सोबत 2 चमचे गुलाब जल एकत्र करावे आणि त्यात 2 चमचे लिंबाचा रस घाला.

मिश्रण बनवुन घेतल्यानंतर कापसाच्या सहाय्याने चेहरा आणि मानेला लावावा. एखादया क्रिम प्रमाणे दिवसभर चेहे-याला लावुन ठेवा.

घरी बनवलेल्या क्रिमप्रमाणे याचा उपयोग करा. हा पॅक आपल्या सुरकुतलेल्या त्वचेला दुर करून मउ मुलायम आणि आकर्षक त्वचा मिळवुन देण्यास सहाय्यक ठरेल.

4) नारळाच्या दुधाचा पॅक – Coconut Milk Pack

नारळातुन दुध काढून चेहे-यावर लावावे 20 मिनीटानंतर चेहेरा थंड पाण्याने धुवुन घ्यावा .

5) केळाचे पॅक – Banana Pack

पिकलेल्या केळाचे 5 ते 6 तुकडे घ्यावे हे तुकडे गरम पाण्यात किसुन घ्यावे.

घट्टसर पेस्ट बनवुन चेहरा आणि मानेला लावावी, 10 मिनीटानंतर चेहेरा गरम पाण्याने धुवुन घ्यावा .
या सर्व पॅकचा उपयोग केल्यास आपण आपल्या चेहे-यात चमत्कारीक बदल अनुभवाल.

नक्की करून पाहा हे उपाय आणि आपला अनुभव आंमच्याशी शेअर करा. आणि आशा करतो कि तुम्हाला या लेखाचा त्वचेची काळजी घेण्यासाठी मदत झाली असेल, आणि असेच लेख बघण्यासाठी आमच्या majhimarathi.com ला अवश्य भेट दया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here