जाणुया भारतीय चलन “रुपया” चा रोचक इतिहास

Indian Currency

“दाम करी काम वेड्या दाम करी काम”

हि ओळ एका गीतातील असून आपणा सर्वांच्याच परिचयाची आहे. खरंतर या ओळीशी साधर्म्य असणारच जीवन आज आपण सगळे व्यतीत करतो आहोत.

पैसा हा प्रत्येकाकरता देव झाला आहे, या पैश्यासाठी माणूस आज नात्यांना देखील किमत देईनासा झालाय कारण पैशांशिवाय आपल्या मुलभूत गरजा (अन्न, वस्त्र, आणि निवारा) भागविणे शक्य नाही.

आयुष्याने आपल्या समोर निर्माण केलेल्या गरजांकरीता पदोपदी पैश्यांची गरज पडते, आणि या रुपयाला पहाता आपल्या मनात याला घेऊन एक कुतूहल जागृत होतं की हा रुपया चलनात कसा आणि कधी आला असेल?

याचा इतिहास काय असेल? या कुतूहलाला शमविण्याचा प्रयत्न या लेखातून करूया.

जाणुया भारतीय चलन “रुपया” चा रोचक इतिहास – Indian Currency History in Marathi

Indian Currency History

रुपया या शब्दाचा अर्थ – Rupees Meaning in Marathi

रुपया हा शब्द “रुप्यकम” मधून निर्माण झालाय. रुप्यकम म्हणजे चांदीचे नाणे.

रुपयाचा इतिहास …Information about Coins in Marathi

रुपयाचा इतिहास पहायचा झाला तर सर्वप्रथम रुपया या शब्दाचा वापर शेरशाह सुरींनी आपल्या शासनकाळात केल्याचं आपल्याला आढळत. परंतु मौर्य समाजा पूर्वीच पैसा भारतात आल्याचे देखील मानल्या जाते.

असं म्हणतात कि मौर्य समाज भारतात येण्यापुर्वीच पैसा भारतात आला होता  परंतु स्थायी रुपात तो पाहायला मिळाला नव्हता. पण पुढे जसजसे शासक बदलत गेले तसतसे त्याचे स्वरूप आणि त्याची उपयोगिता सुद्धा बदलत गेली.

पण आत्ताच्या इतिहासातील संशोधनानुसार ज्यावेळी शेर शाह सुरीने हुमायु ला हरुवून साम्राज्य सांभाळले तेंव्हा त्यात अनेक बदल देखील केलेत, त्या बदलांमध्ये त्या काळातील मुद्रेचा देखील समावेश होता.

शेरशाह सुरीच्या काळात आला रुपया:

1540-1545 या शेरशाह सुरीच्या शासन काळात रुपया हा शब्दप्रयोग सर्वप्रथम करण्यात आला होता.

परंतु शेरशाह सुरींनी जो रुपया चालनात आणला ते चांदीचे नाणे होते. त्याचे वजन 178 ग्रेन (11.534) इतके होते. या व्यतिरिक्त शेरशाह सुरींनी आपल्या कार्यकाळात चांदीच्या नाण्याव्यतिरिक्त तांब्याचे आणि सोन्याचे नाणे देखील चलनात आणले.

तांब्याच्या नाण्याला दाम असे म्हंटले गेले तर सोन्याच्या नाण्याला मोहर असे म्हणण्याचा प्रघात होता. त्या काळी चांदी, तांबे आणि सोन्याच्या नाण्यांचे चलन होते, त्यांना एका निर्धारित मूल्यांच्या आधारावर बाजारात चालविण्यात आले होते.

अश्या रीतीने शेरशाह सुरींच्या शासन काळात चालविण्यात आलेला रुपया आज देखील चलनात आहे.

ब्रिटीश सत्तेच्या काळात देखील रुपया होता चलनात – Indian Currency in Circulation

भारतात जेंव्हा ब्रिटीशांचे राज्य होते त्या दरम्यान देखील रुपयाचे चलन होते. या सुमारास त्याचे वजन 11.66 ग्राम होते आणि यात वजनाच्या 91.7 टक्के शुद्ध चांदी होती.

ब्रिटीश सरकारने आपल्या निर्धारित मूल्यांच्या आधारावर चांदीच्या नाण्यांचे मूल्य निर्धारित केले होते.

जुन्या काळात जितकी किंमत सोन्याच्या नाण्यांची होती तेवढीच किंमत चांदीच्या नाण्याला देखील होती.

अर्थव्यवस्था बळकट होण्याचे कारण ठरले सुवर्ण मूल्य:

19 व्या शतकात सर्वात बळकट अर्थव्यवस्था सोन्याच्या मूल्यावर आधारीत होती. त्यावेळी चांदीपासून बनलेल्या रुपयाच्या मूल्यात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली.

संयुक्त राज्य अमेरिका आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांदीचे स्त्रोत आढळून आल्याने चांदीचे दर फार कोसळलेले पाहायला मिळाले.

या सुमारास भारतात चांदीच्या नाण्यांचे जास्त चलन असल्याने भारताला याचा मोठा फटका सहन करावा लागला. त्या काळाला रूपया घसरल्याने मंदीचा काळ मानण्यात आले.

जेंव्हा 100 पैश्यांइतका झाला 1 रुपया – 1 Rupee Coin Value

आपण ऐकले असेल एक रुपया 100 पैश्यांच्या बरोबरीचा असतो ते, परंतु पूर्वीच्या काळी असे नव्हते. पूर्वी एक रुपयाला सोळा आणे किंवा चौसष्ट पैश्यांमध्ये वाटण्यात आले होते, म्हणजेच रुपया हा सोळा आणे अगर चौसष्ट पैश्यांच्या बरोबरीचा होता.

1957 साली एक रुपयाला 100 पैश्यांमध्ये वाटण्यात आले, त्यानंतर रुपया 100 पैश्यांच्या बरोबरीचा झाला.

शिवाय भारतात पैश्याला नवा पैसा म्हणून देखील ओळखले जाऊ लागले. आपल्याला माहितीच असेल कि भारतात, भारतीय रिजर्व बँकेद्वारे मुद्रा चलनात आणल्या जाते.

रिजर्व बँक ऑफ इंडियाद्वारे चलनात आणली जाते मुद्रा – Currency Issue in India

रुपयांच्या छपाई पासून तर बँकांपर्यंत पोहोचविण्याची आणि पैश्यांचा हिशोब ठेवण्याची संपूर्ण जवाबदारी हि भारतीय रिजर्व बँक ऑफ इंडियावर असते. याचाच अर्थ तुमच्या खिशातील एक-एक पैश्याचा हिशोब रिजर्व बँक ऑफ इंडिया ठेवते.

1935 साली ब्रिटीश सरकारने रुपया चलनात आणण्याचा अधिकार रिजर्व बँक ऑफ इंडिया ला दिला होता, त्यानंतर 1938 साली पहिल्यांदा रिजर्व बँकेद्वारे 5 रुपयांची नोट चलनात आणण्यात आली.

यानंतर फेब्रुवारी-जुन 1938 ला 10 रुपये, 100 रुपये, 1,000 रुपये आणि 10 हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली.

भारतातील नोटांची पहिली प्रिंटींग प्रेस नाशिक येथे 1928 साली स्थापन होण्यापूर्वी सर्व कागदी नोटा बँक ऑफ इंग्लंड येथून छापल्या जात होत्या.

स्वतंत्र भारत आणि कागदी नोटा:

भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर देखील इंग्रजांनी चलनात आणलेल्या मुद्राच भारतात सुरु राहिल्या. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच भारतीय रुपयाचा इतिहास – History of Indian Currency सुरु होतो.

1949 साली जेंव्हा भारताची पहिली नोट चलनात आली तेंव्हा तिचे स्वरूप अगदी भिन्न होते, पहिली नोट ही एक रुपयाची होती, या नोटेवर सारनाथ च्या सिंहाची अशोक स्तंभाची प्रतिकृती छापण्यात आली होती. पुढे नोटांचे स्वरूप वारंवार बदलत गेले, RBI ने भारतातील वेगवेगळ्या इमारतींची छायाचित्र दर्शविणाऱ्या अनेक नोटा चलनात आणल्या.

यात गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India), बृह्देश्वर मंदिर (Brihadisvara Temple) चे छायाचित्र देखील छापण्यात आले. इतकेच नव्हे तर 1953 साली भारत सरकारने जी नोट छापली त्यावर हिंदी भाषेत लिहिण्यात आले.

1947 साली डॉलर च्या तुलनेत 1 रुपयाची किंमत किती होती – 1 USD to INR in 1947

प्रत्येक भारतीयाला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी 1947 ला 1 डॉलर ची किंमत किती होती? तर ज्या सुमारास 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी 1 रुपया हा 1 डॉलर च्या बरोबरीचा होता.

कागदी नोटांवर महात्मा गांधींचे छायाचित्र छापण्यास सुरुवात – Why Mahatma Gandhi Photo on Indian Currency in Marathi

1996 नंतर ज्या नोटा छापण्यात आल्या त्यात महात्मा गांधीचा फोटो छापण्यात आला. त्या आधी नोटांवर अशोक स्तंभाची प्रतिकृती छापली जात  होती.

भारतीय नोटांवर महात्मा गांधीजींचा जो फोटो छापण्यात येतो, तो त्या वेळी काढण्यात आला होता जेंव्हा गांधीजी तेंव्हाचे बर्मा आणि ब्रिटीश सेक्रेटरी म्हणून कार्यरत फ्रेडरिक पेथिक लॉरेन्स सोबत कोलकाता येथील व्हाईसरॉय हाउस मध्ये भेटण्याकरीता गेले होते.

त्यानंतर खोट्या नोटांना चलनात येण्यापासून रोखण्याकरता त्यात अनेक सीक्यूरीटी फीचर्स टाकण्यात आले. शिवाय दृष्टीबाधित दिव्यांगांच्या सुविधेकरता आजच्या नोटांमध्ये अनेक फीचर्स टाकले गेले आहेत. त्यामुळे नुसत्या स्पर्शाने देखील समजते नोट खरी आहे की खोटी.

वर्तमानात 5, 10, 20, 50, 100, 500, आणि आणि 2000 च्या कागदी नोटा चलनात आहेत.

भारतीय मुद्रान्संबंधी काही विशेष गोष्टी- Facts about Indian Currency

 • 1861 साली कागदी मुद्रा कायद्या अंतर्गत केवळ शासनालाच मुद्रा चलनात आणण्याचा अधिकार होता. त्या अंतर्गत ब्रिटीश सरकार कागदी मुद्रा चलनात आणत असे.
 • आपल्याला हे वाचून आश्चर्य वाटेल, 1928 साली नासिक येथे नोटांचे मुद्रणालय सुरु होण्यापूर्वी सगळ्या नोटा बँक ऑफ इंग्लंड द्वारे छापल्या जात असत. अवघ्या 4 वर्षांमध्ये सगळ्या भारतीय नोटा येथेच छापल्या जाऊ लागल्या होत्या.
 • यानंतर 1935 साली भारतीय धनाच्या नियोजनाची संपूर्ण जवाबदारी नव्याने तयार झालेल्या रिजर्व बँक ऑफ इंडियावर सोपविण्यात आली.
 • 1944 साली भारतीय रिजर्व बँकेने नकली नोटांवर रोख लावण्याकरता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नोटांमध्ये संरक्षण धागे आणि वॉटरमार्क चा उपयोग केला.
 • 1949 साली स्वतंत्र भारतात पहिली नोट ही एक रुपयाची छापण्यात आली. त्यावर सारनाथ येथील सिंह असलेली अशोक स्तंभाची प्रतिकृती छापण्यात आली. पुढे हे चिन्ह भारताचे राष्ट्रीय चिन्ह ठरले.
 • आज भारतीय मुद्रांमध्ये सलग घसरण नोंदवली जात आहे. 1917 चा एक तो ही काळ होतां जेंव्हा 1 रुपया, 13 $ डॉलर च्या बरोबरीचा असायचा. हळूहळू भारतावरचे कर्ज वाढू लागले तेंव्हा भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी कर्ज फेडण्याकरता रुपयाची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला. तेंव्हापासून रुपयाच्या तुलनेत अन्य देशांतील मुद्रा जास्त मजबूत आहेत.
 • भारतीय नोटांविषयी आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे भारतीय नोटेवर त्याची किंमत 15 भाषांमध्ये लिहिण्यात आली आहे.
 • भारतीय नोटेच्या मजबुती विषयी सांगायचे झाल्यास हि नोट साधारण कागदापासून नव्हे तर कॉटन पासून बनविण्यात येते.
 • स्वातंत्र्यानंतर नाणी तांब्याच्या धातूंपासून बनविल्या जात होती, पुढे 1964 मध्ये अॅल्युमिनियम पासून आणि 1988 मध्ये स्टेनलेस स्टील पासून नाणी बनविल्या जाउ लागली.
 • दृष्टीबाधित दिव्यांग असोत किंवा ज्यांना नोटांवरचा आकडा समजण्यास त्रास होतो अश्यांकरता रिजर्व बँक ऑफ इंडियाने 1960 साली वेगवेगळ्या रंगांमध्ये नोटा छापण्यास सुरुवात केली जेणेकरून रंगांच्या वेगळेपणावरून या लोकांना नोटा ओळखता येतील.
 • 1980 नंतर नोटांवर कला, संस्कृती, आणि ज्ञान-विज्ञाना संबंधित चित्र व्यापक स्वरुपात छापल्या जाउ लागले. त्यापूर्वी काही राष्ट्रीय स्मारकांची चित्र देखील छापण्यात आली होती.
 • 2011 साली नोटांवर रुपयाचे नवे चिन्ह (”) अंकित केल्या जाऊ लागले.
 • नुकत्याच छापण्यात आलेल्या भारतीय नोटांवर ‘स्वच्छ भारत’ अभियानाचे चिन्हं आहे. 500 च्या नोटेवर लाल किल्ला छापण्यात आला असून आणि 2000 च्या गुलाबी नोटेवर मंगलयाना चे चित्र छापण्यात आले आहे.

किती रुपये छापायचे हे कोण ठरवतं? – How much Money is Printed each Year in India

दहाची नोट, वीसची नोट, शंभराची नोट, या सगळ्यांचे मूल्य असते. जे वाढतं-कमी होतं.

कधी किती रुपये छापायचे याचा निर्णय रिजर्व बँक ऑफ इंडिया घेतं. याला “चलन नियोजन” (Currency Management) असं म्हंटल्या जातं.

कुठल्या मूल्यात किती नोटा छापायच्या हे देशातील विकास दरावर आणि मुद्रास्थितीच्या दरावर ठरविण्यात येतं. किती नोटा फाटल्या, तुटल्या आणि खराब झाल्या आहेत, राखीव साठ्याची किती आवश्यकता आहे, हे देखील विचारात घेतल्या जातं.

नोटा कुठे छापल्या जातात? – Where Indian Currency Printed

नोटांच्या छपाई करता संपूर्ण देशात चार बँक नोट प्रेस, चार टाकसाळ, आणि एक पेपर मिल आहे.

नोटांची प्रेस मध्यप्रदेशातील देवास, महाराष्ट्रातील नाशिक, सालबोनी आणि मैसूर येथे आहे.

दोन हजाराच्या नोटेची छपाई मैसूर येथे केली जाते, मध्यप्रदेशातील देवास इथल्या नोटांच्या प्रेस मध्ये दर वर्षाला तब्बल 265 करोड पेक्षा अधिक नोटांची छपाई करण्यात येते.

नोटांच्या छपाईकरता कुठल्या शाईचा वापर होतो?

भारतात नोटांच्या छपाईकरता ज्या शाईचा उपयोग करण्यात येतो ती शाई देवास येथेच तयार करण्यात येते. नोटांच्या छपाईकरता ज्या कागदाचा वापर करण्यात येतो तो कागद होशंगाबाद येथील सिक्यूरिटी पेपर मिलमध्ये तयार होतो.

कश्या छापल्या जातात नोटा? – How to Print Indian Currency?

नोटा छापण्याकरता लागणारा कागद होशंगाबाद सिक्यूरिटी पेपर मिलमधून येतो किंवा विदेशातून मागविण्यात येतो.

त्या कागदांच्या शीट ला सायमंटन नावाच्या खास मशीन मध्ये टाकण्यात येतं, त्यानंतर ‘इंटरव्यू’ नावाच्या आणखीन एका मशीन मधून त्या कागदाला रंगविण्यात येतं, त्या कागदांच्या शीटवर नोटा छापल्या जातात.

त्या नंतर चांगल्या आणि खराब नोटांची विभागणी होते, खराब नोटा काढून वेगळ्या ठेवल्या जातात, एका शीटवर जवळपास 32 ते 48 नोटा असतात.

नोटांवर नंबर कसे टाकले जातात?

कागदावर छापल्या गेलेल्या नोटांवर नंबर टाकण्यात येतात, त्यानंतर कागदाच्या शीट मधून नोटांना कापल्यानंतर एकेका नोटेला तपासल्या जातं. त्यानंतर नोटांना पॅकिंग करून त्या नोटांच्या बंडलांना खास सुरक्षित ट्रेनने भारतीय रिजर्व बँकेत पाठविण्यात येतं.

या संपूर्ण प्रक्रियेकरीता सुरक्षेची विशेष काळजी घेतल्या जाते. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडण्यात येते.

आपल्यापर्यंत नोटा कश्या पोहोचतात?

रिजर्व बँकेचे देशभरात एकंदर 18 इश्यू ऑफिस आहेत, येथून नोटांना बँकेत पाठविण्यात येतं.

अहमदाबाद, बंगलोर, बेलापूर, भोपाल, भुवनेश्वर, चेन्नई, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, मुंबई, नागपूर, नई दिल्ली, पटना, आणि तिरूवनंतपूरम, येथे हे इश्यू ऑफिस आहेत.

या व्यतिरिक्त एक सब ऑफिस लखनौ येथे देखील आहे. प्रिंटींग प्रेस मध्ये छापण्यात आलेल्या नोटा सर्वप्रथम या ऑफीसेस मधे पोहोचतात, आणि येथून त्यांना कमर्शिअल बँक शाखांमध्ये पाठविण्यात येतं.

फाटलेल्या नोटा देखील व्यर्थ जात नाहीत… का?

जेंव्हा नवीन नोटा तयार केल्या जातात त्याच वेळी त्या नोटांचा वापरातील अवधी देखील निर्धारित केल्या जातो. म्हणजेच या नोटा चलनात किती काळापर्यंत चांगल्या राहू शकतील हे ठरवण्यात आलं असत.

आणि म्हणूनच ठरविण्यात आलेला कालावधी संपल्यानंतर व सतत चलनात राहिल्यामुळे नोटा खराब झाल्यानंतर रिजर्व बँक या नोटांना परत घेतं.

‘रुपया’ हा शब्द भारताव्यतिरिक्त इतर देशांशी देखील जोडला गेला आहे:

भारतीय मुद्रेला रुपया असं म्हणण्यात येतं. पण रुपया हा शब्द केवळ भारतीय मुद्रेलाच जोडला गेलाय असे नाही.

भारताशिवाय सुद्धा पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, मॉरीशस आणि सेशल्स येथील मुद्रेला (Currency) रुपया असं म्हणतात.

याशिवाय इंडोनेशिया येथील मुद्रेला पण रुपया असे म्हंटले जाते, आणि मालदीव येथील मुद्रेला थोडेसे वेगळे रुफियाह या नावाने ओळखल्या जाते.

तर मंडळी असा हा रुपया…आहे नं मूल्यवान? आपण याला कमाविण्याकरता आपलं अमूल्य आयुष्य खर्ची घालतो याचा अर्थ हा रुपया मूल्यवान असणारच.

हा लेख आवडल्यास आपला अभिप्राय देण्यास विसरू नका, कारण आपला अभिप्राय हा आमच्याकरता मौल्यवान आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here