जाणून घ्या काजू अंजिर बर्फी बनविण्याची रेसिपी

Kaju Anjeer Barfi Recipe

आपल्या भारत देशात धार्मीक लोक मोठया प्रमाणात बघायला मिळतात. आणि उपवास करणारे देखील बरेच आहेत, म्हणुन या सगळयांकरता आम्ही घेऊन आलो आहोत थोडी वेगळी आणि गोड काजु अंजीर बर्फी बनविण्याची विधी. ही विधी पाहुन तुम्ही जरूर बनवा आणि देवाला प्रसन्न करा.

काजु अंजीर बर्फी बनविण्याची विधी – Kaju Anjeer Barfi Recipe in Marathi

Kaju Anjeer Barfi

Kaju अंजीर बर्फी बनवण्याकरता लागणारी सामग्री – Ingredients of kaju Anjeer barfi

काजु लेयर करीता – kaju Layer 

  •  दिड कप काजु पावडर
  •  ३ कप आइसिंग शुगर
  •  ईलायची पावडर
  •  १०.१५ इंचीचे प्लास्टिक पेपर

अंजीर लेयर करता – Anjeer Layer

  •  अर्धा कप आइसिंग शुगर
  •  १ कप काजु पावडर बारीक केलेली
  •  अर्धा कप काजु खरबडीत बारीक केलेले
  •  ५० ग्राम अंजीर
  • चॉकलेट पावडर
  •  फुड कलर
  •  सिल्वर वर्क
  • १ टीस्पुन तुप

काजु अंजीर बर्फी बनविण्याची विधी – Kaju Anjeer Barfi Recipe

अंजीराचे बारीक बारीक तुकडे करून थोडयाश्या पाण्यात ४ तासापर्यंत भिजु दया,आणि नंतर बारीक करून पेस्ट करून घ्या.

आता एका मोठया कढईत अंजीराची पेस्ट, काजु पावडर, चॉकलेट पावडर आणि आईसिंग शुगर एकत्र करून मंद आचेवर तोपर्यंत परता जोपर्यंत हे सर्व मिश्रण घट्ट होत नाही. जेव्हां हे मिश्रण घट्ट होईल तेव्हां गॅस वरून काढुन घ्या.

थंड झाल्यानंतर याचा छोटा गोळा करून प्लास्टीकच्या दोन ट्रांसपरंट पेपर च्या मधे ठेवूनलांब आणि चौकोनी आकारात लाटुन घ्या, अंजीर लेयर तयार आहे.

काजु लेयर ची विधी – kaju Layer Recipe

आता आईसिंग शुगर चा पातळ पाक तयार करून घ्या. त्यात काजु आणि इलायची पावडर मिसळा. थंड झाल्यावर याचा छोटा गोळा बनवुन प्लास्टिक च्या ट्रांसपरंट पेपर च्या मधे ठेवून लांब आणि चौकोनी आकारात लाटुन घ्या. काजु लेयर तयार आहे. आता काजु लेयर च्या वर अंजीर लेयर ठेवा. जेव्हा ते थोडे कडक होईल तेव्हां सिल्वरवर्क लावून चौकोनी आकारात कापुन सगळ्यांशी शेयर करा.

तर हि होती आणखी एक बर्फी जी आपण घरी बनवू शकतो, तर अश्याच नवनवीन रेसिपींसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top