Kapalbhati Pranayam
बाबा रामदेव यांच्या योगसाधनांमध्ये अनेक प्राणायामांचा समावेश आहे. यांचा लाभ आपण घेवू शकतो. त्यांच्या प्राणायामांच्या नियमित अभ्यासाने आपण आपले शरीर निरोगी ठेवू शकतो.
हा प्राणायाम एक श्वासासंबंधी प्राणायाम मानला जातो. कपाल म्हणजे मस्तक भाती म्हणजे चमक. कपालभातीमूळे चेहऱ्यावर चमक येते व शरीर निरोगी बनते.
कपालभाती प्राणायाम कसे करावे -Kapalbhati Pranayam in Marathi
कपालभाती प्राणायाम – Kapalbhati Pranayam
या प्राणायामात सामान्य स्थितीत बसुन सामान्य स्वरूपात श्वास घेतला जातो व श्वास सोडला जातो, श्वास सोडतांना आपल्या पोटाच्या आतडयांना संकुचित करावे लागते. ही क्रिया योगाभ्यासातील मध्यम क्रिया मानली जाते.
आज ही क्रिया विश्वभरात सर्वत्र केली जाते, विविध योग शिबीरात किंवा जे योगाचे जाणते आहेत ते यास नक्कीच करतात. कपालभाती ही एक श्वास घेण्याची संतुलीत पध्दती आहे. याच्या सरावामुळे शरीरातील सर्व नकारात्मक तत्व निघुन जातात.
शरीर आणि मन सकारात्मकतेने भरून जाते. याच्या सरावाने संपुर्ण दिवस चांगला जातो. याच्यामुळेच शरीर व मन शुध्द होते. रोगाविरूध्द शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण केली जाते. जगभरात प्राणायामाच्या सरावात याचा सर्वात जास्त सराव केला जातो.
कपालभाती प्राणायाम करण्याचे लाभ –Benefits Of Kapalbhati Pranayam
- अनेक लोक यास शरीरास आराम देण्यासाठीही करतात.
- काही लोक आपले वजन कमी करण्यासाठीही याचा अभ्यास करतात.
- याच्या नियमीत सरावाने श्वसन तंत्र सुरळीत होते.
- फुफ्फुसाचे संक्रमणही यामुळे कमी होते तसेच एलर्जीक तत्व शरीराबाहेर टाकले जातात.
- याच्या सरावामुळे डायाफाम लवचीक बनते त्याची कार्यदक्षता ही वाढविली जाते.
- शरीरातील खालच्या अंगांना रक्ताचा पुरवठा नियमीत केला जातो.
- फफ्फुसाचे कार्य सुरळीत चालते तसेच त्यातील संक्रमणही दुर होते.
- शरीरात जास्त प्रमाणात आॅक्सीजन पुरवला जातो त्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढविली जाते.
- या प्राणायामामुळे कूंडलिनी जागृत होतात तसेच मन एकाग्र होते.
कपालभातीचा प्रभाव – Kapalbhati Pranayam Effect
- कपालभाती शरीर आणि बुध्दीची मजबुती वाढवते सर्वच प्रकारच्या आजारींना हा प्राणायाम करता येत नाही. ह्नदयरोगींनी याचा सराव करू नये. हरनिया, श्वसनप्रणाली आणि सर्दीच्या आजारात हा प्राणायाम करायचा नसतो. उच्चरक्तदाब व मधुमेह आहे त्यांनी हयास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा.
- या प्राणायामाच्या जास्त सरावामुळे उच्चरक्तदाब, हृदयाचे रोग, हर्निया सारखे आजार होवू शकतात.
- यात श्वास जलद गतीने घेउ व सोडु नये त्यामुळे चक्कर येवु शकते.
- डोक्यातील सर्व विचार काढुन टाकावेत त्यामुळे याचा फायदा होतो. मनात विचार राहील्याने श्वासांवर नियंत्रण करता येत नाही.
कपालभाती कसे करावे – How To Do Kapalbhati Pranayam
- दोन्ही पायांना आराम मिळेल अशा स्थितीत बसावे.
- एक लांब श्वास घेवून श्वास सोडावा, श्वास घेण्यावर महत्व न देता श्वास सोडण्यावर ध्यान केंद्रित करावे.
- श्वास घेतांना पोटातील आतडी फुगली पाहिजे व श्वास सोडतांना आतडी संकुचीत झाली पाहीजे.
- यास एकावेळी १० ते १५ वेळा नक्कीच करावे.
कृपया या काही गोष्टींची काळजी घ्यावी – Please Take Care of / Don’t do These Things
- या प्राणायामास एखाद्या विशेषज्ञाच्या देखरेखीखाली करावे. हळूहळू सरावाचा वेळ वाढवत न्यावा.
- उच्च रक्तदाबाच्या रोग्यांनी याचा सराव शक्यतो करू नये.
- यास शक्यतो सकाळीच करावे. रात्रीस करू नये.
- चक्कर येणे किंवा थकल्यासारखे वाटत असल्यास याचा सराव करू नये.
तर आज आपण पाहिले कपालभाती प्राणायामाचे काही फायदे व करण्याची विधी, लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रपरिवारात शेयर करायला विसरू नका. आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी माझीमराठी शी जुळलेले रहा.
धन्यवाद!