जुलाबाकरता घरगुती उपाय

Loose Motion Treatment at Home in Marathi

जुलाब! यालाच आपण डायरीयाच्या नावाने देखील ओळखतो, याचा अनुभव ब.याच जणांनी घेतलेला असेल. हा त्रास तीव्र आणि जीर्ण असु शकतो.

सारखे सारखे लॅटरीन ला जावे लागणे हे डायरीया चे मुख्य लक्षण आहे.

या लक्षणाशिवाय पोटाला मुरडा मारणे, पोटात दुखणे, ताप, सुज, आणि अशक्तपणा असे लक्षण दिसतात.

या त्रासामुळे तुमच्या गुदव्दारात खाज, आग होणे, दुखणे, या सारख्या समस्या उद्भवु शकतात.

जुलाबाची बरीच कारणं असु शकतात ज्यात व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, पॅरासिटिक अॅटॅक, फुड पाॅयझन, आणि साइड इफेक्ट चा समावेश आहे.

Loose Motion Treatment at Home

जुलाबाकरता घरगुती उपाय – Loose Motion Treatment at Home in Marathi

जुलाब कधी कधी गंभीर आजाराचे संकेत देखील असु शकतात.

सोबतच यामुळे डिहायड्रेशन आणि अशक्तपणा सारख्या समस्या उद्भवतात, हे तुमच्या स्वास्थ्याकरता धोकादायक ठरू शकतं.

जुलाबाच्या समस्येला कमी करण्याचे तसच त्यापासुन सुटका मिळण्याकरता काही घरगुती उपाय इथे आम्ही सांगणार आहोत.

ईथे खाली जुलाबापासुन सुटका मिळवण्याचे काही उपाय सांगितले आहेत.

1) अॅपल व्हिनेगर

जुलाबापासुन सुटका होण्याकरता अॅपल व्हिनेगर खुप उपयोगी आहे, हे नैसर्गिक अॅंटीबायटिक असुन डायरियापासुन देखील बचाव करण्यात सहायक आहे. यात असलेले तत्व आपल्या शरीरात डायरिया उत्पन्न करणा.या बॅक्टेरियाला नष्ट करतात. या सोबतच पोटातील pH लेव्हल देखील नियंत्रीत करण्यास सक्षम आहे.

1 ते 2 चमचे फिल्टर न केलेल्या अॅपल व्हिनेगर ला एक ग्लास गरम पाण्यात टाका.

आता त्यात थोडे मध टाका आणि हलवा.

जोपर्यंत तुम्हाला बरे वाटत नाही तोपर्यंत दिवसातुन 2 ते 3 वेळा याचे सेवन करा.

2) दही

दही बॅक्टेरियाच्या प्रो बायोटिक चा उत्तम स्त्रोत आहे जो स्वस्थ बॅक्टेरिया सारखाच असतो, जो अगदी सहज तुमच्या पाचन तंत्रात आढळुन येतो.

दहयातील चांगले बॅक्टेरिया तुमच्या पोटाच्या आतडयांमध्ये गेल्याने डायरियाशी लढण्याकरता सहायक ठरतात.

3) केळ

कच्चे आणि पिकलेले केळ दोनही डायरियामध्ये खुप लाभदायक आहेत. यात आढळणारे फायबर आपल्या शरीरात आतडयांमधे असणारे तरल पदार्थ शोषुन घेतात, ज्यामुळे आपल्या शरीराला खुप मदत मिळते आणि आपले शरीर मळाला सहजतेने जमा करू शकते.

केळात मुबलक प्रमाणात पोटॅशियम असल्याने डायरिया असतांना आपलं शरीर जे इलेक्ट्रोलाईट गमावुन बसतं ते पुन्हा केळाने निर्माण होतं.

तसच वारंवार होणा.या जुलाबापासुन देखील आराम मिळतो आणि डायरियामधे वारंवार होत असलेल्या उलटयांपासुन देखील आराम मिळतो.

डायरिया ने त्रस्त रूग्णांकरता केळाचे सेवन फार उपयुक्त मानले गेले आहे. जेव्हां तुम्हाला जुलाब होत असतील तेव्हां प्रत्येक तासाला एक पिकलेले केळ तुम्ही खायला हवे. पिकलेल्या केळासोबत तुम्ही दही देखील दिवसातुन 2 ते 3 वेळेला खाउ शकाल.

केळाचा आणखीन एक उपाय म्हणजे कच्च्या केळाला उकळुन त्याला स्मॅश करावे, त्यात थोडासा लिंबाचा रस आणि चिमुटभर मिठ टाकुन जेवणाआधी खावे.

4) अद्रक (आले)

जुलाबाकरता अद्रक एक उत्तम औषध आणि उपाय आहे. आलं तुमच्या पोटातील हाडांना मजबुत करतं आणि जुलाबाला पुर्णपणे थांबवण्यातही सहायक आहे.

पाचनक्रिये ला विकसीत करणा.या एंजाईम ला देखील वाढवतं.

अद्रक डायरिया पसरवणा.या बॅक्टेरियाला कमी करतं आणि त्यांना शरीरातुन बाहेर देखील काढतं.

बारीक पेस्ट केलेल्या आल्याला दिड कप पाण्यात उकळुन घ्यावे.

उकळल्यानंतर झाकुन ठेवावे आणि 5 ते 10 मिनीटं थंड होउ द्यावे. थंड झाल्यानंतर या काढयाला दिवसातुन 2 ते 3 वेळा प्यावे.

एक छोटा चमचा वाळलेल्या आल्याची पावडर, जीरे पुड, दालचीनी पावडर, आणि मधाला मिक्स करून मिश्रण बनवावे आणि दिवसातुन 2 ते 3 वेळा याचे सेवन करावे.

नोट: हाय ब्लडप्रेशर ची ज्यांना समस्या आहे त्यांनी जास्त मात्रेत अद्रक चे सेवन करू नये.

5) हळद

घरगुती मसाल्यांमध्ये हळद एक प्रभावशाली औषधी आहे. याच्यात असलेले अॅंटीबायटिक गुणधर्म हानिकारक बॅक्टेरिया शी लढण्यास सक्षम आहेत तसच हळद तुमच्या शरीरतंत्राला योग्य रितीने चालवण्यातही साहायक आहे.

आतडयातील सिंड्रोम ला विकसीत करण्याची देखील क्षमता हळदीत आहे. डायरिया हा आजार हानिकारक आंतडयातील सिंड्रोम चेच एक लक्षण आहे.

अर्धा चमचा हळदीला एक ग्लास गरम पाण्यात टाका, चांगले मिक्स करा आणि लगेच प्या. कारण ही हळद लगेच तळाला जाउन बसते, याला दिवसातुन 2 ते 3 वेळा पिण्याचा प्रयत्न करा.

1 चमचा हळदीला 1 चमचा अॅपल साॅस किंवा दहयात मिसळुन सुध्दा तुम्ही सेवन करू शकता.

दिवसातुन 2 ते 3 वेळा या मिश्रणाला घ्यावं.

6) दालचिनी

दालचिनी जुलाब झाले असतांना एक प्रभावी औषध म्हणुन कार्य करते.

यात शक्तिशाली अ‍ॅंटीबॅक्टेरियल आणि अ‍ॅंटीव्हायरल तत्व आढळतात जे नुकसान पाहोचविणा.या आॅर्गन ला नष्ट करतात आणि आपल्या पाचन तंत्राला मजबुत करतात.

1 चमचा दालचिनी पावडर आणि अर्धा चमचा ताज्या अद्रक ला एक कप गरम पाण्यात मिसळा त्यानंतर झाकुन 30 मिनीटे ठेवा. या पेयाला दिवसातुन 2 ते 3 वेळा प्यावे.

अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि 1 चमचा मधाला एक ग्लास गरम पाण्यात मिसळा.

चांगल्या रितीने मिक्स झाल्यानंतर दिवसातुन कमीत कमी 3 वेळा याचे सेवन करावे.

आपण दालचिनी पावडर ला केळावर शिंपडुन देखील खाउ शकतात.

या घरगुती उपायांच्या मदतीने जुलाबापासुन तुम्ही आराम मिळवु शकता.

बहुदा जुलाब 2 ते 3 दिवसापर्यंत राहातात, पण जर आठवडयापेक्षा जास्त हा त्रास होउ लागला तर निश्चितच तुम्ही तुमच्या डाॅक्टरांशी संपर्क साधायला हवा.

लक्ष्य दया: Loose Motion Treatment at Home in Marathi जुलाबाकरता घरगुती उपाय तुम्हाला आवडले असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका.

आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here