Home / Beauty / मॅनीक्योर आणि पेडीक्योर – Manicure Pedicure at Home

मॅनीक्योर आणि पेडीक्योर – Manicure Pedicure at Home

Manicure Pedicure at Home in Marathi

प्रत्येकाला सुंदर हात पाय असावेत असे वाटते. तुम्ही तुमच्या हातापायांची योग्यरितीने काळजी घेउन त्यांना सुंदर बनवु शकता याकरता तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही किंवा एखाद्या ब्युटी पार्लर ला देखील जाण्याची आवश्यकता नाही.

तुम्ही घरबसल्या स्वतः पेडीक्योर (पायाकरता) आणि मॅनीक्योर (हातां करता) करू शकता. विशिष्ट अंतराने पेडीक्योर (Pedicure) आणि मॅनीक्योर (Manicure) केल्याने तुमचा रक्तप्रवाह व्यवस्थित राहातो. मृत त्वचा निघुन जाते आणि तुमचा मेंदु आणि शरीर स्वस्थ आणि तंदुरूस्त राहाते.

खाली दिलेल्या उपायांमुळे तुम्ही अगदी सहज घरच्या घरी पेडीक्योर आणि मॅनीक्योर करू शकता. पेडीक्योर आणि मॅनीक्योर दोन्ही करण्याची पध्दत एकसारखी आहे. चला तर वाट कसली बघताय? घरबसल्या पेडीक्योर आणि मॅनीक्योर करण्याची विधी माहित करून घेउया.

मॅनीक्योर आणि पेडीक्योर – Manicure Pedicure at Home

Manicure Pedicure at Home

मॅनीक्योर आणि पेडीक्योर बनवण्याची सामग्री

 • एक प्लास्टिक टब
 • बेबी शाम्पु
 • मीठ 1 चमचा
 • लिंबु 1
 • डेटाॅल 2 ते 3 थेंब
 • गुलाबाची पानं थोडीशी (optional)
 • नेल पाॅलिश रिमुवर
 • काॅटन वुल
 • नेल कटर
 • नेल फाइल (हे नेल कटर सोबतच येतं)
 • नेल ब्रश
 • उपत्वचा क्रीम (Cuticle cream)
 • उपत्वचा चिमटा
 • नमी प्रदायक क्रीम
 • आधार परदा (Basecoat)
 • नेल पाॅलिश
 • टाॅप परदा (optional)

मेनीक्योर पॅडीक्योर की विधी

पाण्याने आणि साबणाने आपल्या हातांना आणि पायांना चांगल्या त.हेने स्वच्छ करा. काॅटन आणि नेल रिमुवर च्या मदतीने आधीपासुन नखांना असलेले नेलपाॅलिश काढुन टाका.

आता एका प्लास्टिक टब मधे थोडे गरम पाणी घ्या त्यात बेबी शाम्पु चे काही थेंब, 1 चमचा मीठ, आणि 1 लिंबाचा रस टाका. आता त्यात 10 ते 15 मिनीटांपर्यंत आपल्या हातांना आणि पायांना बुडवुन ठेवा. त्यांना हलके स्क्रब करा आणि आपल्या नखांना स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. नेल ब्रश च्या मदतीने तुम्ही तुमच्या नखांना सहज साफ करू शकता.

पायांकरता: पाय घासण्याचा दगडाने (Pumic Stone) आपल्या पायांना रगडा. (विशेष करून आपल्या खालच्या पायांवर जो गोल असतो त्याला चांगले घासा) नंतर आपल्या पायांना आणि हाताला मऊ कापडाने पुसुन घ्या.

नेल कटर च्या मदतीने आपली नखं काढुन घ्या आणि नेल ब्रश च्या सहाय्याने नखांमधे अडकलेली माती काढा (जेव्हां नखं मऊ होतील तेव्हाच साफ करा)
हातांची नखं: आपल्या नखांना चांगल्या त.हेने कापा आणि शेवटपर्यंत स्वच्छ करा आणि मनासारखा आकार द्या.

पायांच्या नखांकरता: पायांची नखं आधी धुवुन घ्या आणि नंतर नेल कटर च्या मदतीने योग्य आकारात कापा. नंतर नेल फाइल च्या सहाय्याने फाइल करा.

आता प्रत्येक नखाच्या सुरूवातीच्या भागावर उपत्वचा क्रिम लावा आणि लावल्यावर त्याने आपल्या नखांची हलक्या हातांनी मसाज करा. आता आॅरेंज छडी च्या साहाय्याने क्रीम ला हटवा आणि नखांना योग्य प्रकारे कापले आहे की नाही हे पाहुन घ्या. आपण उपत्वचा क्रीम च्या ऐवेजी जैतुन तेलाचा देखील वापर करू शकता.

नखं कापतांना डेड स्कीन ला देखील काढा. पण मी आपल्याला हा सल्ला देईल की आपण या स्टेप ला करू नका कारण हे काम एखादा प्रोफेशनलच योग्य त.हेने करू शकतो.

आता हात पायांना चांगले धुवुन घ्या. आता हात आणि पायांना टर्कीश मऊ टाॅवेल ने स्वच्छ करा. (पुसतांना हातांच्या आणि पायांच्या बोटांना चांगले पुसन घ्या)
आता त्वचा मऊ करणारी क्रीम आणि लोशन च्या साहाय्याने आपल्या हाता पायांची चांगल्या पध्दतीने मसाज करा. काॅटन वुल च्या साहाय्याने आपल्या नखांची स्वच्छता करा आणि नंतर त्यांना उपत्वचा क्रीम ने साफ करा.

आता नखांना नेल पाॅलीश लावण्याची वेळ आली आहे. नेल पाॅलीश लावण्यापुर्वी त्याचा बेस कोट (बेस लिक्विड) लावा आणि त्याला वाळु द्या. आता तुमच्या ईच्छेनुसार नेलपाॅलीश चा डबलकोट तुम्ही लाउ शकता. आता शेवटी हलक्या हाताने नेल पाॅलीश लावणे तुम्ही थांबवु शकता. यामुळे तुमच्या नखांवर लावलेली नेल पाॅलीश दिर्घकाळपर्यंत टिकेल.

पायाकरता: पायांच्या बोटांच्या मधे काॅटन टाकुन तुम्ही त्यांना विशीष्ट अंतरावर ठेउ शकता. आता अगदी सहज तुम्ही पायाच्या बोटांना नेल पाॅलीश लावु शकता.
शेवटी आॅरेंज छडी ला काॅटन वुल ने गुंडाळा आणि वुल वर हलकासा नेल रिमुवर लावुन जिथे जिथे अतिरीक्त नेल पाॅलिश लागलेली आहे तिथुन ती हलक्या हातांनी काढुन टाका. असेच तुम्ही एकदम परफेक्ट पध्दतीने नेल पाॅलीश देखील लावु शकता.

जर तुम्ही तुमच्या नखांना नेल पाॅलीश लावुन पेंट करू ईच्छीत नसाल तर तुम्ही तुमच्या नखांवर नेल बफर (प्रतिरोधक) चा एक कोट लावुन त्यांना मोकळे सुध्दा सोडु शकता.

अश्या त.हेने या स्टेप चे अनुकरण करून तुम्ही घरबसल्या मेनीक्योर आणि पॅडीक्योर करू शकता.

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी  Manicure Pedicure at Home असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा मॅनीक्योर आणि पेडीक्योर – Manicure Pedicure at Home तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे Facebook page लाइक करायला सुधा.

नोट: मॅनीक्योर आणि पेडीक्योर – Manicure Pedicure at Home या लेखात दिलेल्या घरगुती उपायाबद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Check Also

Nail Care Tips

नखांचे सौंदर्य वाढवण्याचे उपाय | Nail Care Tips

आपल्या आरोग्याबद्दल आपण म्हणावं तितकं जागरूक नसतो. रोजच्या आपल्या कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *