Marathi Mhani
आपल्या घरातील म्हातारे लोक बऱ्याच वेळा बोलताना किंवा काही उदाहरण देण्या करिता मराठी म्हणींचा वापर करत असतात. मराठी म्हणींच महत्व आजही तेवढंच आहे जेवढ आधी होत. मराठी म्हणी जरी लहान असल्या तरी त्यांचे फार खोल अर्थ दडलेला असतो. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी मराठीतील अशाच प्रसिद्ध मराठी म्हणी (Marathi Mhani) घेऊन आलो. चला तर पाहूया…
मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ – Marathi Mhani
Marathi Mhani List
- बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर
- आयत्या बिळात नागोबा
- चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
- अति तेथे माती
- नाचता येईना अंगण वाकडे
- आपल्याच पोळीवर तूप ओढणे
- छत्तीसचा आकडा
- आंधळे दळते कुत्रं पीठ खाते
- तेरड्याचा रंग तीन दिवस
- आधी पोटोबा मग विठ्ठोबा
- आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे
- अति शहाणा त्याचा बैल रिकामा
- आधी शिदोरी मग जेजूरी
- दुष्काळात तेरावा महिना
- असतील शिते तर जमतील भुते
- नव्याचे नऊ दिवस
- आचार भ्रष्टी सदा कष्टी
- वासरात लंगडी गाय शहाणी
- आपला तो बाब्या दुसर्याचं ते कारटं
- रात्र थोडी सोंगे फार
- अगं अगं म्हशी मला कोठे नेशी
- पी हळद हो गोरी
- आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते
- नाकाचा बाल
- अचाट खाणे मसणात जाणे
- आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना
- आलीया भोगाशी असावे सादर
- आवळा देऊन कोहळा काढणे
- कामापुरता मामा
- आपलेच दात आपलेच ओठ
- आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
- उचलली जीभ लावली टाळ्याला
- आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली
- अळी मिळी गुप चिळी
- इच्छा तेथे मार्ग
- आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला
- इकडे आड तिकडे विहीर
- उठता लाथ बसता बुकी
- काखेत कळसा नि गावाला वळसा
- उडत्या पाखरची पिसे मोजणे
- उधारीचे पोते सव्वाहात रिते
- उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
- उथळ पाण्याला खळखळाट फार
- कोरड्याबरोबर ओले ही जळते
- अहो रूपम अहो ध्वनी
- उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये
- एक ना घड भारभर चिंध्या
- एका माळेचे मणी
- ऐकावे जनाचे करावे मनाचे
- उंटावरून शेळ्या हाकणे
- एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत
- मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
- उंटावरचा शहाणा
- काळ आला होता. पण वेळ आली नव्हती
- आपला हात जगन्नाथ
- कानामगून आली आणि तिखट झाली
- नाव मोठे लक्षण खोटे
- करावे तसे भरावे
- एका हाताने टाळी वाजत नाही
- हपापाचा माल गपापा
- कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी
- कुर्हाडीचा दांडा गोतास काळ
- काठी मारल्याने पानी दुभंगत नाही
- कडू कारले तुपात तळले
- कुडी तशी पुडी
- कधी तुपाशी तर कधी उपाशी
- कावळा बसायला अन फांदी तुटायला
- उंदराला मांजर साक्ष
- कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
- कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच
- चोरावर मोर
- कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी
- गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली
- कोल्हा काकडीला राजी क्ष्रुद्र
- कामापुरता मामा
- कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही
- कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
- खाण तशी माती
- खर्याला मरण नाही
- खाऊ जाणे ते पचवू जाणे
- घोडामैदानजवळ असणे
- खाऊन माजवे टाकून माजू नये
- खोट्याच्या कपाळी गोटा
- गरजवंताला अक्कल नसते
- गर्वाचे घर खाली
- घर पहावे बांधून लग्न पहावे करून
- गरज सरो नि वैध मरो
- गर्जेल तो पडेल
- गाढवाला गुळाची चव काय?
- खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
- गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ
- गाव करी ते राव ना करी श्रीमंत
- कर नाही त्याला डर कशाला
- गाढवाच्या पाठीवर गोणी
- ओळखीचा चोर जीवे न सोडी
- गुळाचा गणपती
- गोगलगाय नि पोटात पाय
- अर्धी टाकून सगळीकडे धावू नये.
- गोरागोमटा कपाळ
- घर ना दार देवळी बिर्हाड
- गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बारा होता
- जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे दुसर्याच्या स्थितीत
- घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे
- तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले
- घरोघरी मातीच्याच चुली
- चढेल तो पडेल
- चालत्या गाडीला खीळ
- घोडे खाई भाडे
- चमत्काराशिवाय नमस्कार नाही,
- चिंती परा येई घरा
- चोराच्या उलटया बोंबा
- घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते
- चोराच्या मनात चांदणे
- जळत्या घराचा पोळता वासा
- घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात
- जलात राहुन माशांशी वैर करू नये
- जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला
- जळत घर भाड्याने कोण घेणार
- गुरुची विद्या गुरूला फळली
- गाड्याबरोबर नळ्याची यात्रा
- ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी
- ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट जो
- जशी देणावळ तशी धुणावळ
- ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे
- जी खोड बाळ ती जन्मकळा
- ज्याच्या हाती ससा तो पारधी
- जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
- चोर सोडून सान्याशाला फाशी
- जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी
- झाकली मूठ सव्वा लाखाची
- टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
- टिटवी देखील समुद्र आटविते
- डोळ्यात केर आणि कानात फुंकर
- डोंगर पोखरून उंदीर काढणे
- तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला
- तळे राखील तो पाणी चाखील
- ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला वाईट
- ताकापुरते रामायण
- तोंड दाबून बुक्यांचा मार
- कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे
- गाता गळा, शिंपता मळा
- असे साहेब किती, सांमटीत हिंडे राती.
- अर्थी दान महापुण्य
- अन्नाचा येतो वास, कोरीच घेते घास.
- उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक
- देखल्या देवा दंडवत
Mhani in Marathi with Meaning
- अडला हरी गाढवाचे पाय धरी
गरज पडल्यास कोणत्याही व्यक्तीकडे मागणे. - असतील शिते तर नाचतील भुते.
पैसा असलेल्या व्यक्तीकडे वेळ काढुन सगळेच येतात. - अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
मूर्ख व्यक्ती कोणत्याही प्रकारचे विचित्र वर्तन करू शकतो. - अति तेथे माती.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास काम बिघडते. - अंधारात केले तरी उजेडात आले:
लपून केलेली गोष्ट कधीतरी सर्वान समोर येतेच. - अडाण्याची गोळी भल्यास गिळी.
अशिक्षीत व्यक्ती कोणालाही अडचणीत आणू शकतो. - अंगाचा तीळ पापड होणे.
खूप राग येणे. - अंथरूण पाहून पाय पसरावे.
जेवढी आपली आवक असेल तेवढेच पैसे खर्च करावे. - अतिपरीचयेत अवज्ञा:
जास्त घनीष्ट सबंध हानिकारक ठरू शकतात. - अनुभवल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही.
एखाद्या गोष्ट करायची असल्यास त्यात सहभाग घेतल्याशिवाय ती गोष्ट साध्य होत नाही. - अति राग भीक माग.
रागामुळे मुळे कोणतीच गोष्ट साध्य करता येत नाही. - अडली गाय अन फटके खाय:
अडचणीत सापडलेल्या एखाद्या व्यक्तीस जास्त त्रास देणे. - अति शहाणा त्याचा बैल रिकामा:
अति शहाण्या व्यक्तीच काम कधीच पूर्ण होत नाही. - अपयश ही यशाची पहिली पायरी आहे:
यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतांना सुरवातीला अपयश येऊ शकते. - अडली गाय खाते काय.
गरजू व्यक्ती कोणतही काम स्वीकारतो. - अन्नछ्त्रात मिरपूड मागू नये.
गरजू व्यक्तीला पर्याय नसतो. - असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगा:
भरपूर पैसे असल्यावर खर्च करून मजा करायची नाहीतर गप्प बसायचे. - आशेची माय निराशा:
निराशा येईल म्हणून आशा कधीही सोडू नये. - आवळा देऊन कोहळा काढणे:
छोटी लालूच दाखवून मोठे काम करून घेणे. - आग सोमेश्वरी नि बंब रामेश्वरी:
ज्या व्यक्तीला गरज आहे त्याला मदत न करता गरज नसलेल्या माणसाला मदत करणे. - आपल्याच पोळीवर तूप ओढून घ्यायचे.
इतरांचा विचार न करता आपलाच स्वार्थ साधणे. - आधीच आम्हाला हौस, त्यात पडला पाऊस.
एखाद्या ठरलेल्या गोष्टीत अचानक बाधा उत्पन्न होणे. - आपली पाठ आपणास दिसून येत नाही:
आपले दोष आपल्याला कधीच दिसत नाहीत. - आपण सुखी तर जग सुखी:
आपण आनंदात असलो कि सर्व जग सुखी वाटणे. - आली चाळीशी, करा एकादशी:
परिस्थिती प्रमाणे आपल्या सवयी बदलवणे. - आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन :
अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे. - आगीतून निघून फुफाट्यात पडणे:
एका संकटातून निघून दुसर्या संकटात सापडणे. - आजा मेला नि नातू झाला.
एकीकडे फायदा तर दुसरीकडे तोटा होणे. - आपण शेण खायचं अन दुसऱ्याच तोंड हुंगायच.
स्वतः वाईट काम करायचे अन दुसऱ्यावर संशय घ्यायचा. - आलिया भोगासी असावे सादर.
आलेल्या संकटास कुरकुर न करता तोंड देणे भाग असते. - आपलेच दात अन आपलेच ओठ:
आपल्या माणसांनी आपल्याच माणसाना त्रास देणे. - आठ हात काकडी नउ हात बी:
एखाद्या गोष्टीची फारच स्तुती करणे. - आईची माया न पोर जाई वाया:
अति लाडाने लहान मुल बिघडतात. - आचार भ्रष्ट नि सदा कष्ट.
आचाराने न वागणारा माणूस नेहमी दु:खी असतो. - आरोग्य हेच ऐश्वर्य.
चांगले आरोग्य हेच सगळ्यात मोठ धन आहे. - आंधळीपेक्षा तिरळी बरी:
एखादी गोष्ट अगदीच वाईट स्वीकारण्यापेक्षा थोडी दोष असलेली गोष्ट स्वीकारणे कधीही चांगले. - आपल ते लेकरू दुसऱ्याच ते कारटं.
स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या चुकांविषयी बोलणे. - आसू ना मासू, कुत्र्याची सासू.
जिव्हाळा नसताना वरवर कळवळा दाखविणे. - इकडे आड तर तिकडे विहीर.
दोन्ही बाजूनी संकटात सापडणे. - उतावळा नवरा अन गुडघ्याला बाशिंग.
एखाद्या गोष्टीसाठी अति घाई करणे. - उचलली जीभ लावली टाळुला.
कोणताच विचार न करता बोलणे. - उठता लाथ बसता बुक्की.
कायम धाकात ठेवणे. - उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.
एखाद्या गोष्ट आवडल्यास ती नष्ट होईल एव्हढा उपभोग घेऊ नये. - उथळ पाण्याला खळखळाट फार.
अर्धवट ज्ञान असणारा व्यक्ती उगाच ज्ञानप्रदर्शन करतो. - एका कानाचे दुसऱ्या कानाला कळत नाही:
अत्यंत गुप्तपणे आपले काम करणे. - एकदा नाव कानफाट्या पडले की पडलेच.
समाजात एकदा व्यक्तीची बदनामी झाली की लोकं याच्याकडे त्याच दृष्टीने पाहतात. - एकी हेच बळ:
एकत्र येऊन काम केल्यास जिंकन निश्चित असते. - एकाच दगडात दोन पक्षी मारणे.
एकाच कामात दोन काम करणे. - ऐकावे जनाचे करावे मनाचे.
सर्वांचे विचार एकूण आपला स्वतःचाच निर्णय घ्यावा. - एका माळेचे मनी.
सर्वजण येथून तेथून सारखे. - एका कानाने एकावे दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.
ऐकलेल्या सगळ्याच गोष्टींचा विचार करणे व्यर्थ आहे. - ओठात एक नि पोटात एक.
प्रकट करताना विचार वेगळे अन मनात काही वेगळेच विचार.