घरच्या घरी झटपट मसाला डोसा बनविण्याची विधी

Masala Dosa Recipe

मसाला डोसा एक पातळ पापडा प्रमाणे असतो त्यात बटाटयाची चटणी व मसाला भरून नारळाची चटणी व सांबार सोबत खायला दिली जाते. ही डीश भारतात मुख्यतः दक्षिण भागात जास्त पसंत केली जाते. तर मग चला घरबसल्या मसाला डोसा कसा बनवायचा जे पाहुया.

घरच्या घरी झटपट मसाला डोसा बनविण्याची विधी – Masala Dosa Recipe in Marathi

Masala Dosa Recipe in Marathi

Ingredients of Masala Dosa
मसाला डोसासाठी लागणारी सामग्री:

डोस्याकरता:

  1. दिड कप तांदुळ
  2. अर्धा कप उडीद डाळ
  3. मिठ स्वादानुसार
  4. तेल 2 चमचे

डोसा मसाल्याकरता साहित्य:

  1. 2 मोठे बटाटे (उकडुन गर एकजीव केलेला)
  2. 1 मध्यम आकाराचा कांदा (बारीक कापुन)
  3. अर्धा चमचा मोहरी
  4. 1 चमचा हिरवे वाटाणे
  5. अर्धा चमचा हळद
  6. 1 ते 2 हिरव्या मिरच्या (बारीक कापुन)
  7. स्वादानुसार मीठ
  8. 1 मोठा चमचा तेल
  9. कोथींबीर

Masala Dosa Recipe
मसाला डोसा बनविण्याचा विधी:

सर्वप्रथम तांदुळ उडीद डाळ यांना रात्रभर पाण्यात भिजवुन ठेवा सकाळी दोन्हीची पेस्ट मिक्सरमध्ये फिरवुन तयार करावी. दोघांच्या मिश्रणास 1 ते 2 तास फ्रिजमध्ये ठेवावे, नंतर काढुन त्यात गरजेनुसार मिठ व अर्धा टिस्पुन तेल मिसळावे.

गॅसवर भांडे ठेवुन त्यात तेल गरम होउ दया त्यात मोहरीचे दाणे, कांदा, बारीक कापुन, मिरची कापुन 2 ते 5 मिनीटे होउ द्या त्यात वटाण्याचे दाणे घाला, अर्धा चमचा हळद, मिठ चवीनुसार घालुन बटाटयाचा गर मिसळावा.

सर्व मिश्रण एकजीव करण्यासाठी 5 मिनीटे होउ द्या. डोस्याचा मसाला तयार आहे. आता गॅसवर डोसापॅन ठेवा व त्यात 1 चमचा तेल घाला. तांदळाचे मिश्रण जास्त घट्ट नको व चांगले फेटून पॅनमध्ये टाकुन त्यास कपाने किंवा चमच्याने पसरवा, आपल्याला पातळ थर हवाय यासाठी गॅस कमी करून डोस्याचे सारण व्यवस्थीत पसरवा नंतर गॅसची आस मंद करा.

डोसा एका बाजुने झाल्यावर त्यास पलटू नका त्यात बटाटयाचा मसाला मध्यभागी ठेवुन डोस्यात दोन्ही बाजूने गुंडाळून घ्या. गरमागरम खायला द्या. यासोबत तुरीच्या डाळीचे सांबर व नारळाची चटणी खायला द्या.

टिप –

  1. तांदळाचे व उडदाचे मिश्रण कमीत कमी 5 ते 6 तास दमट ठिकाणी ठेवावे त्यामुळे डोसा नरम व खुसखुशीत होतो.
  2. सांबारसाठी मुग किंवा उडीद डाळही वापरल्यास चालेल.

Read More:

लक्ष्य दया: Masala Dosa – मसाला डोसा रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top