मावा बर्फी बनविण्याची विधी

Mawa Barfi Recipe

आपल्या भागात धार्मीक लोक मोठया प्रमाणात असल्याने त्यांचे व्रत, उपवास देखील असतात आणि उपवास करतांना तेच तेच पदार्थ असल्याने खाणारी माणसं एकतर कंटाळा करतात आणि खाण्यावर देखील मर्यादा येतात.

उपवासाचे वेगवेगळे पदार्थ जर आपल्याला बनवता आले तर खायला देखील मजा येईल आणि आपल्या घरी येणाऱ्या लोकांमधे देखील आपले कौतुक होईल. आणि म्हणुन आज आम्ही तुम्हाला मावा बर्फी कशी बनवायची ते सांगणार आहोत.

मावा बर्फी बनविण्याची विधी – Mawa Barfi Recipe in Marathi

Mawa Barfi Recipe in Marathi

मावा बर्फी बनवण्याकरता लागणारी सामग्री – Ingredients of Mawa Barfi

केसर लेयर करता – Saffron layer 

 • १ कप काजु पावडर
 • अर्धा कप साखर
 •  २ टिस्पुन केसर
 • सिल्वर वर्क

काजु लेयर करता – Kaju layer 

 •  १ कप काजु पावडर
 • अर्धा कप साखर
 • १ टिस्पुन इलायची पावडर

ड्रायफ्रूटस् लेयर करता – Dry fruits layer

 • दिड कप मिक्स ड्रायफ्रूटस् (पिस्ता, बादाम, अक्रोड, किसमिस) बारीक कापलेले.
 •  ४० ग्रॅम मावा.
 • अर्धा कप काजु पावडर.
 •  १ टिस्पुन इलायची पावडर.
 •  १ टिस्पुन मध.

मावा बर्फी बनविण्याचा विधी – Mawa Barfi Recipe

अर्धा कप साखरेत पाणी टाकुन एकतारी पाक तयार करून घ्या. यात १ कप काजु पावडर आणि केसर मिसळा. छोटा गोळा बनवुन दोन प्लास्टिक पेपर मधे ठेवुन जाड पोळी सारखे लाटुन एका बाजुला ठेवुन द्या. काजु केसर लेयर तयार आहे.

आता पुन्हा एकदा साखरेचा पाक बनवुन त्यात इलायची आणि काजु पावडर मिसळा दोन प्लास्टिक पेपर च्या मधे ठेवुन लाटुन घ्या. काजुची लेयर तयार आहे. तिसरी लेयर तयार करण्याकरता एका कढईत मावा टाकुन मंद आंचेवर परता.

यात ड्रायफू्रटस्, काजु पावडर, इलायची आणि मध टाकुन गोळा बनवुन घ्या आणि प्लास्टिक पेपर मध्ये ठेवुन पोळी सारखे लाटुन घ्या. आता आधी काजुची लेयर घ्या त्यावर ड्रायफू्रटस् ची लेयर आणि शेवटी काजु केशर ची लेयर ठेवा. वरती सिल्वर वर्क लावुन तुकडयांमध्ये कापुन घ्या.

तयार आहे आपली चवदार मावा बर्फी तर हि होती मावा बर्फी बनवण्याची विधी, आशा करतो आपल्याला आवडली असेल अश्याच नवनवीन रेसिपी साठी माझी मराठी शी जुळलेले रहा.

धन्यवाद !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top