जाणून घ्या मुगाच्या दाळीचे खुरखुरीत वडे बनविण्याची रेसिपी

Moong Dal Vada Recipe in Marathi

सकाळच्या वेळी चहासोबत काही चवदार असल्यास संपुर्ण दिवस चांगला जातो. मुगदाळीचे वडे एक स्वयंपुर्ण नाश्ता मानल्या जातो त्यामुळे भारतात बरेच ठिकाणी मुग डाळीचे वडे नाश्त्यात खाल्ले जातात. सोबत हिरव्या मिरच्यांची चटणी असल्यास खायची मजा दुप्पट होऊन जाते.

जाणून घ्या मुगाच्या दाळीचे खुरखुरीत वडे बनविण्याची रेसिपी – Moong Dal Vada Recipe in Marathi

Moong Dal Vada

मुगडाळीच्या वडयांसाठी लागणारी सामग्री –

 • ३०० ग्रॅम मुगडाळ (रात्रभर भिजवुन ठेवलेली).
 • २५ ग्रॅम कापलेली कोथींबीर.
 • ५ ग्रॅम जिरे.
 • १ चमचा शोप.
 • ८-९ कापलेल्या मिरच्या.
 • १ कापलेला कांदा.
 • स्वादानुसार मिठ.
 • तळायला तेल.

मुग डाळ वडा बनविण्याचा विधी – Moong Dal Vada Recipe

 • सर्वप्रथम मुगडाळ पाण्याने धुवून घ्या व मिक्सर मध्ये जास्त बारीक करू नका.
 • त्यात कांदा बारीक कापलेला जिरं, शोप, ८-९ कापलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर कापलेली व चविनुसार मिठ घाला. सोबत थोडं कढईत गरम केलेलं तेल घाला यामुळे वडे कुरकुरीत होतील.
 • मिश्रणास चांगले मिक्स करा व त्याचे कच्चे वडे बनवा. कढईत तेल गरम झाल्यावर त्यात चांगले सोनेरी होईपर्यंत तळुन घ्या.
 • आणि गरमागरम हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत खायला घ्या.!

तर हि होती मुगाच्या डाळीचे वडे बनविण्याची सोपी रेसिपी अश्याच नवीन रेसिपी साठी माझी मराठी सोबत जुळलेले रहा.

धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here