Strange Things in the World
जगात बऱ्याच गोष्टी अश्या असतात ज्यांच्या विषयी आपल्याला माहिती नसतं,आपण त्या प्रकारच्या गोष्टी जीवनात ऐकलेल्या सुध्दा नसतात. काही विचित्र असतात तर काही आपल्याला अचंबित करणाऱ्या आणि आम्ही नेहमी प्रमाणे माझी मराठी च्या वाचकांसाठी काही तरी नवीन घेऊन येत असतो आजही अश्याच जगातील काही गोष्टीं विषयी पुढे वाचणार आहोत. आशा करतो आपल्याला लिहिलेल्या काही गोष्टी आवडतील. तर चला पाहूया. आगळ्या वेगळ्या गोष्टी.
जगातील आगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती नसतील – Most Interesting Fact in the World in Marathi Language

१) सगळ्यात जुने शार्क मासे – Oldest Shark Fish
शार्क मास्याला आपण ओळखतच असणार. जो कुठल्याही प्राण्याला खाण्यासाठी मिनिटांची सुध्दा वाट पाहत नाही. असेच जगातील सर्वात जुने शार्क आपल्याला ग्रीनलँड मध्ये पाहायला मिळतात. येथील शोधकार लोकांनी कार्बन डेटिंग च्या साहाय्याने या शार्क ची वय काढली असता हे पृथ्वीवरील सर्वात जुन्या शार्क माश्यांपैकी एक होते. ते जवळजवळ ३९२ वर्ष जुने होते आणि या शार्क चे वय कमीतकमी ५१२ वर्षांपर्यंत असू शकते असे बोलल्या जात आहे. तर ग्रीनलँड ला आहेत या जगातील सर्वात जुने शार्क मासे.
२) गर्भवती वराह साठी कानून – Rules for Pregnent Boar
जगात अनेक न्यायालयाचे बरेच नियम आपण पाहिले असतील. पण या एका देशात एक वेगळा नियम आपल्याला पाहायला मिळतो, आणि हाया नियम फ्लोरिडा येथे लागू झालेला आहे, येथे गर्भवती वराह ला पिंजऱ्यात बंद ठेवता येत नाही. असे न केल्यास तेथील नागरिकांना याचा दंड ठोठावल्या जातो.
३) बेंडकांना रस्ता पार करण्यास मदत – Help the Frogs Cross the Road
आपण ऐकले असेल की एखाद्या वृध्द व्यक्तीला सहारा देऊन एखाद्याने रस्ता पार करण्यात मदत केली. पण कधी बेडकांना रस्ता पार करण्यासाठी मदत केल्याचे ऐकले नसेल. आपल्याला हे ऐकून आश्चर्य होणार की जर्मनीतील लोक चक्क बेडकांना रस्ता पार करण्यासाठी मदत करतात. जेणेकरून गाडी खाली येऊन त्यांचा मृत्यू होऊ नये.
सोबतच तेथील रोडवेज च्या कंपन्यांनी बेडकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर काही गोष्टींची रचना केलेली आहे. ज्यामुळे बेडकांच्या जीवाची हानी होऊ नये.
४) कधीही न मरणारा जीव – Animals Never Dies
जो जन्माला येतो तो मरतोच अस म्हटल्या जात. पण एक असाही जीव आहे, ज्याला कोणी कापले किंवा तोडले तरी सुध्दा तो मरण पावत नाही. आणि पृथ्वीवर तो जीव आहे, जेलिफिश.
ज्याला कापले तरी सुध्दा तो दोन भागात वेगळा होऊन आपले जीवन जगतो. म्हणजेच दोन वेगवेगळे जेलिफिश निर्माण होतात.
५) परमाणु बॉम्ब चा कोणताच फरक या व्यक्तीवर झाला नाही – The Atomic Bomb made no Difference to this Person
सर्वांना परमाणु बॉम्ब विषयी माहिती आहे, की किती भयानक प्रकारे या बॉम्ब चा परिणाम लोकांवर होतो. जेव्हा हिरोशिमा आणि नागासाकी मध्ये दोन परमाणु हमले झाले होते तेव्हा त्या परमाणु बॉम्ब च्या हमल्यातून सुध्दा तो व्यक्ती वाचला होता.
आणि त्या व्यक्तीचे नाव होते सूतोमु यामागूची.
ही व्यक्ती दोन्ही हमल्यातून वाचल्या नंतर ९३ वर्षाचे जीवन व्यतीत करून त्यांनी २०१० ला कँसर मुळे आपले प्राण सोडले होते.
परमाणु हमल्यातून वाचणे खूप कठीण असते, पण ही व्यक्ती त्यातून वाचली होती.
वरील लेखात काही गमतीदार आणि आश्चर्य चकित करून सोडणाऱ्या काही घटना वाचल्या,
तर अशा करतो आपल्याला आवडल्या असतील आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!