मशरूम मसाला रेसिपी मराठीमध्ये – Mushroom Masala Recipe in Marathi

Mushroom Masala Recipe in Marathi

शाकाहारी व्यक्तींना बरेचदा असा प्रश्न पडतो की ज्या प्रमाणात मांसाहार करणा.या व्यक्तींकरता पौष्टीक मुल्य असणारे बरेच पर्याय उपलब्ध आहेत तसे शाकाहारी व्यक्तींकरता आहेत का? कारण मांसाहार करणा.यांना अगदी एका जेवणातुन देखील भरपुर प्रथीनांचा लाभ मिळतो तसे शाकाहारात कोणते पदार्थ मोडतात? तर एक चांगला पर्याय म्हणुन मशरूमकडे बघीतल्या जातं. भरपुर पोषण मुल्य असलेल्या मशरूम मधे बनवण्याच्या देखील खुप पध्दती उपलब्ध आहेत. अशीच एक डिश आज आपण पाहणार आहोत “मशरूम मसाला”.

मशरूम मसाला दोन पध्दतींनी बनवता येणारी रेसिपी आहे. आज आपण मशरूम मसाला कोरडी डिश कशी बनवायची हे पाहुया. ही पोळी किंवा फुलक्या सोबत खाता येणारी एक उत्तम डिश आहे.

मशरूम मसाला रेसिपी मराठीमध्ये – Mushroom Masala Recipe in Marathi

Mushroom Masala Recipe in Marathi

Ingredients of Mushroom Masala
मशरूम मसालासाठी लागणारी सामग्री:

  • 2 कांदे
  • 2 टोमॅटो
  • मशरूम चे तुकडे
  • 6 हिरव्या मिरच्या
  • 4 लवंगा
  • 1 छोटा चमचा दालचिनी
  • 1 चमचा लाल तिखट
  • 1 चमचा जीरेपुड
  • अर्धा चमचा हळद पावडर
  • 1 चमचा लसुण पेस्ट
  • 1 कप फोडणीकरता तेल
  • 1 चमचा पेस्ट बनवलेली मेथीची पानं

Mushroom Masala Recipe
मशरूम मसाला बनविण्याचा विधी:

कांदे आणि टोमॅटो चांगले बारीक कापुन घ्या त्यानंतर एका कढईत तेल गरम करून त्यात दालचिनी आणि लवंग टाका. काही मिनीटांतच त्यात कांदा टाका, जेव्हा कांदा सोनेरी रंगावर परतला जाईल त्यात लसणाची पेस्ट, लाल तिखट जीरे आणि हळद टाका आणि चांगले मिक्स करून घ्या मिसळल्यानंतर त्यात थोडे पाणी आणि चवीनुसार मीठ टाका.

मसाला जेव्हा चांगला परतला जाईल आणि तेल वरती दिसायला लागेल तेव्हां त्यात टोमॅटो आणि हिरवी मीरची टाका. मिश्रण चांगले एकजीव होउद्या मग त्यात मशरूम चे तुकडे टाका आणि मंद आचेवर कमीत कमी 10 ते 15 मिनीटे शिजु द्या. आता त्याला मेथी च्या बारीक पानांनी सजवा, यामुळे त्यात एक खास लागेल.

गरम गरम मशरूम मसाला पोळी सोबत सव्र्ह करा आणि जेवणाचा आनंद घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top