घरी स्वादिष्ट पनीर भुर्जी कशी बनवाल

Paneer Bhurji Recipe in Marathi

भारतातील सगळया राज्यांमध्ये पनीर भुर्जी ला खुप पसंत केल्या जातं कारण ही एक सोपी, स्वादिष्ट डीश आहे जीला तुम्ही मोठया चवीने आणि पराठा किंवा पोळी सोबत देखील खाउ शकता. भारतातील दक्षीणेत पनीर भुर्जी चा उपयोग कधी कधी पनीर डोसा सोबत देखील केला जातो.

पनीर भुर्जी पनीर पासुन बनणारी एक स्वादिष्ट डिश आहे. याला तुम्ही अगदी सहज काही वेळातच आपल्या घरी बनवु शकता. भुर्जीत तुम्ही टोमॅटो ग्रेव्ही चा देखील उपयोग करू शकता. पनीर भुर्जी ला पोळी, पराठा, किंवा ब्रेड सोबत खाण्यात तर आणखीन मजा येते. चला तर माहीती करून घेउया पनीर भुर्जी कशी बनवायची ते.

घरी स्वादिष्ट पनीर भुर्जी कशी बनवाल – Paneer Bhurji Recipe in Marathi

Paneer Bhurji Recipe in Marathi

Ingredients of Paneer Bhurji
पनीर भुर्जीसाठी लागणारी सामग्री:

 • 1 कप स्मॅश केलेले पनीर
 • 2 चमचे तेल
 • 1 चमचा जीरे
 • अर्धा कप बारीक चिरलेला कांदा
 • अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो
 • अर्धा चमचा पाव भाजी मसाला
 • अर्धा चमचा हळद
 • अर्धा चमचा तीखट
 • 1 चमचा कापलेली हिरवी मिर्ची
 • 1 चमचा बारीक चिरलेली कोथींबीर
 • चवीनुसार मीठ

Paneer Bhurji Recipe
पनीर भुर्जी बनविण्याचा विधी:

गॅसवर एका पॅन मधे तेल गरम करा आणि गरम झाल्यानंतर त्यात जीरं टाका. जीरे तडतडल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकुन मंद आचेवर 1 ते 2 मिनीटे चांगले शिजवा. आता त्यात चिरलेला टोमॅटो, 2 चमचे पाणी टाकुन चांगले मिसळा आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनीटे शिजवा.

लक्षात ठेवा शिजत असतांना मिश्रण सारखे हलवत राहा. आता त्यात पावभाजी मसाला, हळद, हिरवी मीरची, स्मॅश केलेले पनीर आणि 1 चमचा पाणी टाकुन चांगल्या त.हेने मिसळा आणि मंद आंचेवर जवळपास 5 ते 10 मिनीटांपर्यंत शिजु द्या आणि सारखे हलवत राहा.

गरमागरम पनीर भुर्जी पोळी किंवा पराठयासोबत सव्र्ह करा.

नोट:

1)  भुर्जी बनवतांना गॅस मंद असावा.

2)  जर तुम्ही पनीर भुर्जी चा उपयोग डोसा मधे भरण्याकरता करत असाल तर त्यात जास्त पाणी टाकु नका कारण भरतांना पनीर भुर्जी कोरडी असायला हवी.

3)  पनीर भुर्जी बनवतांना शक्यतो फ़्रेश पनीर घ्या. त्यामुळे चव चांगली येईल.

Read More:

लक्ष्य दया: Paneer Bhurji – पनीर भुर्जी रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here