स्वादिष्ट पनीर बटर मसाला रेसिपी

Paneer Butter Masala Recipe

भारतीय पदार्थांमधे पनीर खुप महत्वपुर्ण आणि बरेच पसंत केले जाणारे देखील आहे. पनीर ला कोणत्याही पदार्थात टाकले तर प्रत्येक वेळी नवी डिश तयार होते. अश्याच प्रकारे बनलेली नवी डिश आज आपण बनवणार आहोत जीचे नाव आहे पनीर बटर मसाला. याला तुम्ही पोळी, पराठा, नान, आणि भाता सोबत देखील खाउ शकता.

पुढे दिलेल्या विधी ला वाचुन तुम्ही हॉटेल ला बनवण्यात येणारी पनीर बटर मसाला सेम टू सेम आपल्या घरी देखील बनवु शकता. आजच रात्री पनीर बटर मसाला बनवुन तुम्ही तुमच्या घरच्यांना सरप्राईज देउ शकता. चला तर घरबसल्या स्वादिष्ट पनीर बटर मसाला कसे बनवायचे त्याची विधी पाहुया.

स्वादिष्ट पनीर बटर मसाला रेसिपी – Paneer Butter Masala Recipe in Marathi

Paneer Butter Masala Recipe in Marathi

Ingredients of Paneer Butter Masala
पनीर बटर मसाला साठी लागणारी सामग्री:

 • 1 चमचा तेल
 • 3 मध्यम आकाराचे कापलेले कांदे
 • 3 बारीक कापलेले टोमॅटो
 • मीठ चवीनुसार
 • 10 ते 12 काजु चे तुकडे
 • 1 चमचा धणे पुड
 • 1 चमचा गरम मसाला पावडर
 • 1 ते 2 चमचे कश्मीरी लाल तिखट
 • 1 चमचा साखर
 • दिड चमचा बटर
 • 1 तेजपान
 • 3 हिरव्या इलायची
 • 1 छोटी दालचीनी ची काडी
 • 2-3 लवंगा
 • दिड चमचा अद्रक लसुण पेस्ट किंवा 3 चमचे अद्रक ची पेस्ट
 • 250 ग्रॅम पनीर
 • अर्धा चमचा कसुरी मेथी
 • 3 चमचे क्रिम (रेस्टोरेंट सारखी बनण्याकरता)
 • सजवण्याकरता बारीक चिरलेली कोथींबीर

Paneer Butter Masala Recipe
पनीर बटर मसाला बनविण्याचा विधी:

एका कढईत तेल गरम करा त्यावर कांदा सोनेरी रंग येईपर्यंत तळा. आता टोमॅटो आणि मीठ टाकुन मिश्रण तळा. मिश्रण मुलायम आणि नरम होईपर्यंत तळत राहा. आता त्यात गरम मसाला, धणे पुड, काजु, लाल मिरची पावडर आणि साखर टाका. जोपर्यंत सगळे मिश्रण एकजीव होत नाही तोपर्यंत तळुन घ्या. तळणे झाल्यावर गॅस बंद करा.

मिश्रण थंड झाल्यावर त्यात 1 कप पाणी टाकुन मिक्सर मधुन चांगले बारीक करून घ्या. आता त्याच भांडयात बटर टाका आणि कोरडे होईपर्यंत तळा. बहुदा तुम्हाला 1 ते 2 मिनीटे तळावे लागु शकते.   आता त्यात लाल तिखट टाका गरज पडल्यास अर्धा ते 1 कप पाणी देखील टाकु शकता. टाकल्यानंतर त्याला कमीत कमी 4 मिनीटांपर्यंत शिजवा आणि ग्रेवी मध्ये पनीर टाकण्यापुर्वी पाहुन घ्या की गे्रव्ही तुमच्या ईच्छेनुसार झाली आहे की नाही.

आता त्यात पनीर आणि कसुरी मेथी टाका. टाकल्यानंतर चांगले हलवुन घ्या आणि 3 मिनीटे शिजवा.   ईच्छा असल्यास तुम्ही त्यात क्रीम देखील टाकु शकता.

आता बटर पनीर ला सव्र्ह करायच्या भांडयात घ्या आणि त्याला क्रिम आणि कोथींबीरी ने सजवा.

नोट:- ब.याच जणांना भाजीत कांदा आणि लसुण आवडत नाही. त्यामुळे तुम्ही पनीर बटर मसाला बिना कांदा आणि लसणाचा देखील बनवु शकता.

जर तुम्हाला साखरेची चव आवडत असेल तरच त्यात साखर टाका अथवा नाही टाकल्यास देखील फार फरक पडणार नाही कारण कांदा, काजु आणि टोमॅटो यांच्या स्वादामुळे थोडा गोडवा येतोच.

Read More:

लक्ष्य दया: Paneer Butter Masala – पनीर बटर मसाला रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here