जाणून घ्या स्पेशल पनीर मसाला रेसिपी

Paneer Masala Recipe

भारतात वेगवेगळया जातीधर्माचे लोक राहतात त्यामुळे त्यांच्या खाण्याच्या सवयीही वेगवेगळया आहेत. आम्ही तुमच्यासाठी स्पेशल पनीर वेज भाजी घेउन आलो आहोत.

चला तर माहिती करून घेऊया स्पेशल पनीर मसाला कशी बनवायची.

टेस्टीपनीर मसाला रेसिपी – Paneer Masala Recipe in Marathi

Paneer Masala Recipe in Marathi

पनीर वेज मसाला लागणारी सामग्री – Ingredients of Paneer Veg Masala

 • २०० ग्रॅम पनीर
 • ५० ग्रॅम काजु आणि ५० मगज बिया (टरबुजबिया)
 • २ कांदयाची पेस्ट, १ कांदा कापलेला
 • २ टोमॅटोची पेस्ट
 • ५० ग्रॅम अद्रक लसुण पेस्ट
 • चिमुटभर हळद
 • पनीर किसुन ५० ग्रॅम
 • ५० ग्रॅम खवा
 • १ चमचा क्रिम
 • ५०  ग्रॅम कोथिंबीर (कापुन)
 • धणेपुड १ चमचा
 • जिरेपुड १ चमचा
 • मिठ चविनुसार
 • तेल गरजेनुसार
 • २५० ग्रॅम विविध भाज्या (शेंगा, गाजर, पत्ता व फुलकोबी, शिमला मिरची, वटाणा दाणे, बेबिकोर्न, मशरूम)

पनीर वेज मसाला विधी – Paneer Veg Masala Recipe

घेतलेल्या काजु आणि टरबुज बिया यांची पेस्ट बनवा, पनीरचे चैकोनी तुकडे कापा. सर्वभाज्या कापून घ्याव्यात व उकडुन घ्याव्यात. त्यानंतर भांडयात तेल घ्या १ कापलेला कांदा त्यात घाला, त्यात अद्रक लसुण पेस्ट घाला, पाच मिनीटे उच्च आचेवर होउ द्या त्यात टोमॅटो पेस्ट घाला परत पाच मिनीटे होऊ द्या. त्यात मिठ, हळद, मिरची पावडर, धणे व जिरे पावडर घाला व २ मिनीटे होऊ द्या.

त्यात सर्व शिजवलेल्या भाज्या घाल्या. हलक्या आचेवर पॅन ठेवा त्यात तेल घाला. त्यात शिल्लक अद्रक लसुण पेस्ट टाका.

दोन मिनीटे होऊ द्या. त्यात काजु व टरबुज बियांची पेस्ट घाला. सोबतच किसलेले पनिर व खवा टाका. चवीनुसार मिठ घाला.

५-१० मिनीटे खव्यास तेल सुटेपर्यंत होऊ द्या. गॅस मंद आचेवर ठेवा, ५ मिनिटांनी गॅस बंद करा.  आता आपल्या दोन्ही प्रकारच्या भाज्या तयार आहेत. वाढतांना प्लेटमधे पहीले लाल भाजी वाढुन त्यावर काजु पनीरची भाजी घाला वरून थोडं क्रिमही ठेवा त्यावर किसलेले थोडे पनीरही घालावे त्यानंतर गरमागरम खायला द्या.

तर हि होती आजची स्पेशल रेसिपी आपल्याला आवडली असेल तर या रेसिपीला शेयर करायला विसरू नका.

Read More:

लक्ष्य दया: Paneer Masala – पनीर मसाला रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका. आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here