टेस्टी आणि पौष्टिक पनीर पराठे रेसिपी

Paneer Paratha Recipe

पनीर पराठयास सजवायची गरज पडत नाही हे पराठे फारच चवदार व आरोग्यदायी असतात. लहान मूलांना हे पराठे नक्कीच आवडतात.

टेस्टी आणि पौष्टिक पनीर पराठे रेसिपी – Paneer Paratha Recipe in Marathi

Paneer Paratha Recipe in Marathi

पनीर पराठे लागणारी सामग्री- Ingredients of Paneer Paratha

  • ५०० ग्रॅम कणीक
  • १०० ग्रॅम किसलेले पनीर
  • ५० ग्रॅम घट्ट दही
  • गरजेनुसार पाणी
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • अर्धा चमचा जिरे पुड
  • १ ते २ हिरव्या मिरच्यांची पेस्ट
  • स्वादानुसार मिठ
  • पुदिन्याची २-३ पानं
  • कापलेली हिरवी कोथींबीर
  • २ चमचे तेल
  • अर्धा चमचा हळद

पनीर पराठे बनविण्याचा विधी – Paneer Paratha Recipe

सर्वप्रथम एका कोपरात कणीक घेऊन त्यात हळद, मिठ, मिरची पेस्ट, पुदीन्याची बारीक केलेली पानं, कोथींबीर, गरम मसाला, दही व किसलेले पनीर मिसळुन त्यात १ कप पाणी घालुन त्याचा चांगला घट्ट गोळा बनवा.

त्यात थोडे तेल घाला व  अर्ध्या तासाकरता फ्रिजमधे ठेवा नंतर बाहेर काढुन त्याचे पराठयाकरता गोल गोळे बनवा आणि पराठयांच्या आकारात लाटा.

तव्यावर तेल घेऊन पराठयांना चांगले भाजुन घ्यावे. जास्त काळपट होऊ देऊ नका. तेलाने त्यास खरपुस भाजा. या पराठयांना आंबट गोड चटण्यांसोबत गरमागरम खायला द्या.

टिप –

  1. पराठयांना नरम ठेवण्यासाठी त्यांना हॉट्सपॉट मध्ये ठेवावे.
  2. पराठयांना मंद आचेवर शेकु नका असे केल्यास ते कडक होतात.
  3. जर दही टाकायचे नसेल तर कणकेस फ्रिजमध्ये तासाकरता ठेवावे.

तयार आहेत तुमचे स्वादिष्ट पनीर चे पराठे, तुम्हाला हा लेख आवडला असेल, आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करून त्यांना हि पनीर पराठ्याविषयी माहिती द्या.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top