Pineapple Cake
मित्रहो आपणा सर्वानाच केक खायला फार आवडतात त्यामुळे आपण बाहेरून केक आणतो. आज आम्ही तुम्हाला घरी बसल्या बसल्या पायनॅपल केक बनविणे शिकवणार आहोत.
पायनॅपल केक… रेसिपी – Pineapple Cake Recipe in Marathi
पायनॅपल केक बनवण्याकरता सामग्री – Ingredients of Pineapple Cake
- मैदा १०० ग्रॅम
- साखर १०० ग्रॅम
- २ अंडी
- बेकींग सोडा १ चमचा
- १ चमचा कलमी पावडर
- १ चमचा मिठ
- ५० ग्रॅम बटर
- अननस फोडी १०० ग्रॅम
- वॅनिला इसेंस १ चमचा
- एका लिंबाची ताजी साल बारीक करून
- दुधक्रिम ५० ग्रॅम
- किसलेल्या अननसाचा गर
पायनॅपल केक बनवण्याची विधी – Pineapple Cake Recipe
सर्वप्रथम आपल्या ओव्हनला ३५० डिग्रीवर गरम करा. ९ इंच नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेवा त्यात ५० ग्रॅम बटर घ्या त्यात कापलेल्या अननसाच्या गराचे तुकडे घाला.
५-१० मिनीटे होऊ दया. एका भांडयात मैदा घ्या, बेकिंग पावडर, कलमी पावडर, व मिठ मिसळा, एका भांडयात अंडयांना तोडा व त्यांना चांगले फेटा, त्यात बटर, साखर, लिंबाची बारीक साल व व्हॅनिला इसेंस घाला. यास पाच मिनीटे फेटा.
आता मैदयाच्या आटयास चांगले फेटा. तयार अननस गर व बटरचे मिश्रण त्यात घाला. अंडयाचे मिश्रणही यात घालुन एकत्र करून केकच्या भांडयात ओता. भांडयास आतुन बटर लावा.
भांडे ओव्हनमध्ये २५-३० मिनिटे होउ दया नंतर भांडे काढुन त्यास चांगले सजवा. वरून क्रिम व अननस गर टाकुन सजवा.
तर हि होती पायनॅपल केक बनविण्याची पद्धत अश्याच नवनवीन रेसिपी तसेच लेखांसाठी जुळलेले रहा माझीमराठी सोबत.
धन्यवाद!