PM Modi Latest Announcement
जगातील कोरोना चे संकट पाहाता संपूर्ण देशांमध्ये जवळ जवळ लॉक डाऊन ची स्थिती निर्माण झाली आहे. जगभरात १० लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे, आणि ५० हजारांपेक्षा कोरोना मूळे लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माननीय नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक ३ एप्रिल ला एक व्हिडिओ संदेश शेयर करत जनतेला संबोधन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ संदेश कोविड-१९ साठी – PM Narendra Modi’s video message on Covid-19
त्यांनी त्या व्हिडिओ मध्ये सर्व जनतेचे अभिवादन करत त्यांच्या घेतलेल्या निर्णयाचे पालन करत असलेल्या जनतेचे आभार व्यक्त करत त्यांनी देशातील १३० करोड जनतेला येणाऱ्या ५ एप्रिल रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून प्रत्येकाने आपल्या घराच्या बाहेर किंवा बाल्कनी मध्ये येऊन दिवे, मेणबत्ती किंवा मोबाईल ची फ्लॅशलाईट लावावी आणि कोणीही घराबाहेर पडून एकत्र येऊ नये ही गोष्ट सुद्धा नरेंद्र मोदी यांनी आपल्या व्हिडिओ संदेशातून सांगितली आणि समोर बोलताना सांगितले की त्या ९ मिनिटांमध्ये आपण कोरोनाला लढण्याची शक्तीचे निर्माण करू शकतो आपल्या डोळ्यांसमोर १३० करोड देशवासीयांचे चित्र समोर ठेवत त्या परमेश्वराला आपण शक्ती मागूया.