झटपट गाजराचे लोणचे बनवायचे, तर मग इथे पहा रेसिपी

Carrot Pickle Recipe

आपल्या जिभेची देखील खुप गंमत आहे हे तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. आपण तीला इतक्या पदार्थांची चव चाखवली आहे की ती सुध्दा खुप लाडावली आहे असे देखील गमतीने आपल्याला म्हणता येईल. चटक मटक आणि मसालेदार पदार्थाची तर इतकी आवड आपल्या जीभेला आहे की विचारू नका आणि आपल्या खाण्यापीण्यात देखील आपण चटपटीत खाण्याला खुप महत्व देतो. आणि जर लोणच्याचा विषय काढला तर मग विचारायलाच नको! ताबडतोब जिभेला पाणी सुटणार हे नक्की.

लोणच्याचे नाव काढताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. आज आपण चव घेणार आहोत मिक्स गाजराच्या लोणच्याची. गाजराचे लोणचे लहानांपासुन तर मोठयांपर्यंत सर्वांनाच फार आवडते. तसेही लहान मुलं भाज्या खाण्याचा कंटाळा करतात म्हणुन जर आपण त्याच भाज्यांचे काही चटपटीत पदार्थ त्यांना बनवुन दिले तर त्यांना ते नक्की आवडतील आणि त्यांचे पोषण देखील उत्तम रितीने होईल. जेवण करतांना जर लोणचं सोबतीला असेल तर आपण आवडीने खातो. चला तर पाहुया कसे बनवायचे मिक्स गाजराचे लोणचे

मिक्स गाजराचे लोणचे – Quick Carrot Pickle Recipe

Quick Carrot Pickle Recipe
Quick Carrot Pickle Recipe

गाजराचे लोणचे बनवण्याकरता लागणारी सामग्री – Ingredients for Carrot Pickle Recipe

  • १ किलो गाजर
  • २५० ग्रॅम मोहरीचे तेल
  • २ टेबलस्पुन अद्रक आणि बारीक कापलेले लसुण
  • अर्धा कप गरम मसाला
  • अर्धा कप लाल तिखट
  • ४ कप बारीक केलेला गुळ आणि व्हिनेगर
  • अर्धा कप मोहरीची डाळ
  • १ कप मीठ

गाजर लोणचे बनविण्याची विधी – Quick Carrot Pickle Recipe

गाजर धुवुन बारीक चिरून घ्यावे. एक भांडे घ्यावे त्याला स्वच्छ पुसुन घ्यावे जेणेकरून त्यात पाणी राहाणार नाही. आता तेल गरम करा त्यात लसुण आणि अद्रक टाका, सोनेरी रंग आल्यानंतर चिरलेले गाजर, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, मोहरीची डाळ, आणि बारीक केलेला गुळ आणि 2 चमचे व्हिनेगर टाकावा. थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवावे. लोणचे पुर्णतः तेलात बुडालेले असावे याची काळजी घ्या अन्यथा लोणचे लवकर खराब होण्याची शक्यता असते.

तर आपण आज पाहिली झटपट गाजराचे लोणचे बनविण्याची विधी या रेसिपी ला अनुसरून आपण चांगल्या रित्या गाजराचे लोणचे बनवू शकता, आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top