जाणून घ्या खास उपवासाकरिता रेसिपी…. रगडा पॅटिस

Ragda Pattice

भारत देशात फार धार्मिक लोक राहतात यामुळेच भारतात हिंदू धर्मीय लोक आठवडयात किमान उपवास नक्कीच करतात ते साबुदाणा व भगरीचे पदार्थ खावून कंटाळले आहेत.

आज आम्ही तुमच्यासाठी लाल बीट आणि बटाटयाची एक छानशी रेसीपी घेवून आलो आहोत, जी आपण उपवासाकरता ही खाऊ शकता. पाहुया रगडा पॅटीस (Ragda Pattice) कसे बनवायचे.

रगडा पॅटिस बनविण्याची रेसिपी – Ragda Pattice recipe in Marathi

Ragda Pattice recipe in Marathi

रगडा पॅटिस बनविण्याकरता सामग्री – Ingredients of Ragda Pattice

अर्धा किलो बिट व अर्धा किलो बटाट उकडुन घ्यावे.

फिलींग करीता सामग्री

  • ५० ग्रॅम नारळाचा किस
  • १ चमचा तिळ
  • जिरे पावडर १ चमचा
  • १ चमचा साखर
  • लिंबुरस १ चमचा
  • ५ – १० काजु तुकडे
  • १ चमचा किसमिस
  • १ चमचा आरारोट
  • मिठ स्वादानुसार
  • काळे मिरे १० ते १५ दाणे

रगडा पॅटिस बनविण्याचा विधी – Ragda Pattice Recipe

कढईत अर्धा चमचा तेल घेवून त्यात तिळ, जिरे आणि काजु तुकडे टाकून १ मिनिट भाजा. त्यात आरारोट, नारळाचा किस टाकुन भाजा. त्यात हिरव्या मिरच्या, मिठ, काळे मिरे, साखर, लिंबुरस टाकुन चांगले मिसळुन घ्या. ही फिलींग दोन्ही उकडलेल्या भाज्यात भरायची आहे.

प्रथम बटाटयात तयार फिलींग मिसळून त्याचे गोळे तयार करून त्यास पॅटीसच्या आकाराचे बनवावे नंतर बिटाच्या गरात ही फिलींग मिसळुन त्याचे गोळे बनवुन घ्या. दोन्ही गोळे एकमेकांवर ठेवुन मधात थोडी फिलींग भरून घ्यावी व त्याची पुरी लाटून घ्यावी व गरम तेलात तळून घ्यावी. सोनेरी रंगाची होईपर्यंत तळावीत व गरमागरम खायला दयावीत.

तर आपण आज पाहिली रगडा पॅटिस बनविण्याची विधी या रेसिपी ला अनुसरून आपण चांगल्या रित्या पॅटिस बनवू शकता आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here