Latest News In Marathi
कोरनामुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन असल्याने प्रत्येक नागरिकाला भारत सरकार ने घरात राहण्याचे आवाहान केले आहे, याच लॉक डाऊन मध्ये नागरिक फक्त जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडू शकतात, अश्या वातावरणात दिल्लीतील नोयडा मध्ये असलेल्या ए.डीसीपी रणविजय सिंग यांच्या वागणुकीची सर्व देशात सराहना होत आहे.
लॉकडाऊन मध्ये समोर आले खाकीवर्दीत देवाचे स्वरूप – Police Help like God in Lockdown
संपूर्ण देशात लॉक डाऊन मुळे गेल्या २७ तारखेला तमन्ना खान नावाची महिला गर्भवती अवस्थेत बरेली च्या हॉस्पिटलमध्ये होती, सगळीकडेच लॉक डाऊन ची स्थिती असल्यामुळे तेव्हा तिच्याजवळ तिच्या सासुरवाडीतील कोणीही व्यक्ती उपस्थित नव्हती.
या परिस्थितीत जेव्हा त्या महिलेचे पती अनीश खान नोएडा वरून बरेली ला जायला निघाले तेव्हा त्यांना प्रवासाकरिता कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते, अश्या परिस्थिती मध्ये त्यांनी पोलिसांशी संपर्क करून त्यांची मदत मागितली तेव्हा नोएडा चे ए.डीसीपी. रणविजय सिंग यांनी अनीश खान यांची मदत करत त्यांना हॉस्पिटलपर्यंत सुखरूप पोचवले.
हॉस्पिटलमध्ये पोहचल्या नंतर अनीश खान यांच्या पत्नीने ४५ मिनिटानंतर एका बाळाला जन्म दिला, त्यां परिवाराच असं म्हणणे होते की आज पोलिसांच्या वेशात साक्षात देवाने आमची मदत केली, या गोष्टीवर त्या दाम्पत्याने त्यांच्या मुलाचे नाव रणविजय खान ठेवले आणि त्या देवसारख्या पोलीस कर्मचारी ए.डीसीपी रणविजय सिंग यांचे आभार मानत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला, आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
आणि संपूर्ण देश डीसीपी रणविजय यांची सराहना करत आहे.
अश्याच नवनवीन बातम्यांच्या विश्लेषणासाठी जुळून राहा माझीमराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!