अश्या ५ गोष्टी ज्या बऱ्याच लोकांना माहिती नाहीत

Rochak Tathya in Marathi

आपण प्रत्येक वेळी जगातील काही रोचक तसेच मजेदार गोष्टी पाहत असतो, ज्या बऱ्याच लोकांना माहिती नसतात.

नेहमीप्रमाणे या लेखात सुद्धा आपण अश्याच काही गोष्टी पाहणार आहोत ज्या विषयी आपण जाणून आश्चर्य चकित होणार.

तर आशा करतो आपल्याला हा लिहिलेला लेख आवडणार, तर चला पाहूया काही मजेदार गोष्टी.

५ अश्या गोष्टी ज्या बऱ्याच लोकांना माहिती नाहीत – 5 Rochak Tathya Most People Don’t Know 

Rochak Tathya
Rochak Tathya

१) मध राहते हजारो वर्षे जसेच्या तसे – Honey Lasts for Thousands of  Years

हो आपण बरोबर वाचले मधमाश्यांनी एका पोळ्यात जमा केलेले मध हजारो वर्षे जसेच्या तसे राहते. जगातला खायचा कोणताही पदार्थ जवळपास ३ दिवस किंवा ५ दिवस चांगला राहतो, पण त्यांनंतर तो पदार्थ खराब व्हायला सुरुवात होते. आणि एका विशिष्ट वेळेनंतर एक तर त्याला वास सुटतो किंवा जिवाणू त्याला नष्ट करतात. पण जगातील मध हा एकच पदार्थ असा आहे जो हजारो वर्षे सुरक्षित राहतो. काही वैज्ञानिकांना गुंफांमध्ये हजारो वर्षे जुने मध सापडले,

आणि ते अजूनही जसेच्या तसेच आहे.

२) सगळ्यात मोठे अंडे – Largest Egg

दैनंदिन जीवनात आपण कोंबडीचे अंडे पाहत असतो. जे आकाराने लहान असते, पण आपल्याला माहिती आहे का कि सर्वात मोठे अंडे कोण देत? शहामृग.

हो शहामृग देतो सर्वात मोठे अंडे आणि या अंड्याचे आकारमान कमीतकमी १८ सेमी असते.

म्हणजे आपण विचार करू शकता की हे अंडे किती मोठे असेल.

३) एक्सपायरी डेट – Expiry Date

आपण प्रवास करताना बरेचदा पाण्याची बाटली विकत घेऊन पाणी पितो. त्या पाण्याच्या बाटलीवर आपल्याला एक्सपायरी डेट सुध्दा लिहिलेली दिसते, ही एक्सपायरी डेट बाटलीतील पाण्याची नसून पाणी ज्या बाटलीत पाणी पॅक केलेलं आहे त्या बाटलीची असते.

कारण पाण्याची कुठलीही एक्सपायरी डेट नसते.

४) देवमास्याचे वजन – Weight of the Fish

आपल्याला माहिती आहे, जगातील सगळ्यात मोठा मासा हा देवमासा आहे. आणि या देवमाश्याचे वजन शेकडो किलो असते, आपण जर देवमाश्याचे वजन केले तर ते जवळजवळ १४०० किलो असतं. म्हणून जगातील सर्वात मोठा प्राणी देवमाश्याला म्हटलं जातं. पण आपण हे जाणून थक्क व्हाल की ज्या देवमाश्याचे वजन १४०० किलो असतं त्या देवमाश्याचे हृदय हे १८१ किलो इतके असतं.

५) चीनला कुंफु ची शिकवण देणारा व्यक्ती भारतीय – The Person who Taught Kumfu to China is Indian

आज कुंग-फु कलेत चीन सर्वात श्रेष्ठ असला तरी सुध्दा त्या चीनला सर्वात आधी कुंफु ची शिक्षा देणारे भारतीय होते. आणि त्यांचे नाव होते बोधिधर्म. त्यांना बोधिधर्मन म्हणून सुध्दा ओळखले जाते. जे बौद्ध धर्माचा प्रसार करत चीन मध्ये गेले होते आणि तेथे त्यांनी बऱ्याच लोकांना आपले शिष्य बनविले होते. आणि त्यांना प्राचीन युध्द कला, कलरी पट्टू या गोष्टी शिकविल्या होत्या. भविष्यात तेथील स्थानिक लोकांच्या भाषेसोबत त्याला कुंग-फु म्हणू लागले आणि तेव्हापासून या कलेला कुंग-फु नाव पडले.

तर ह्या होत्या आजच्या लेखातील काही विशेष गोष्टी. आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top