Latest Coronavirus Update
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहता सगळीकडे बंद ची परिस्थिती निर्माण झाली आहे येणाऱ्या ३० एप्रिल पर्यंत संपूर्ण लॉक डाऊन ठेवण्याचे आदेश सरकार ने दिले आहेत, हृदय विकार, मधुमेह, ब्लड प्रेशर ह्या समस्या असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लागण लवकर होत आहे,
आणि कोरोना बांधितांच्या संख्येत जास्तीत जास्त रुग्ण हे मधुमेह असणारे आणि हृदयाचे आजार असणारे व्यक्ती दिसून येत आहेत, परंतु त्यापैकी काही व्यक्ती असे आहेत जे त्यांना हे आजार असूनही काही गोष्टींमुळे ते कोरोनावर सुध्दा मात करत आहेत,
तर पुढे आपण पाहणार आहोत असा व्यक्ती ज्याला मधुमेह असताना सुद्धा त्याने कोरोनावर मात केली.
मधुमेह असलेल्या व्यक्तीने अशाप्रकारे केली कोरोना वर मात – This Person with Diabetes Overcomes Corona
आपण ज्या व्यक्तीविषयी बोलत आहे ते आहेत पश्चिम बंगाल येथील कोलकत्ता शहराचे ५१ वर्षीय गोपीकृष्ण अग्रवाल ज्यांना मधुमेह असूनही त्यांनी त्यावर मात करत स्वतःला कोरोनापासून वाचवलं.
गोपीकृष्ण अग्रवाल यांचात जेव्हा डॉक्टरांनी कोरोना चे लक्षण पाहिले असता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून काही दिवसांसाठी त्यांचं विलगिकरण करण्यात आलं होतं,
त्यांनंतर त्यांना मधुमेह असल्याचं सुध्दा समजलं, यावर उपाय करत डॉक्टरांनी त्यांना मलेरियाच्या औषधांनी उपचार करत काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून घेतले, आणि काही दिवसांनंतर त्यांच्यात कोरोनाचे लक्षण संपुष्टात आल्याचे समोर आलं,
त्यांनंतर डॉक्टरांनी त्यांना घरी जायची परवानगी दिली, गोपीकृष्ण सांगतात की मला मधुमेह होता हे माहीत झालं पण मी न घाबरता सकारात्मक तेणे या आजाराला सामोरे गेलो आणि त्यानंतर मी बरा होऊन बाहेर आलो.
जर आपल्यालाही मधुमेहाचा त्रास असेल तरही घाबरण्याचे काहीही कारण नाही सकारात्मक तेणे या आजाराला सामोरे जाता येऊ शकते, आणि संपूर्ण जग या आजारावर औषध शोधण्याचं कार्य करत आहे,
आशा आहे लवकरचं या आजारावर काही तरी औषध निघेल आणि सर्वांना कोरोनाच्या भीती पासून मुक्त करेल.
अश्याच नवनवीन बातम्यांच्या विश्लेषणासाठीही जुळून राहा माझी मराठी सोबत,आपलं अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.