Travel Tips and Tricks
बरेचदा प्रवासाला जात असताना आपण गोंधळून जातो कि आपल्याला प्रवास करताना काय सोबत घ्यायचे आणि काय सोबत घेऊ नये,
या गोंधळात आपण बऱ्याचशा आवश्यक गोष्टी घरी विसरून जातो आणि प्रवासाला गेल्यावर ती गोष्ट आपल्या लक्षात येते कि आपण हि गोष्ट तर घरी विसरलो आहे,
चिंता नको तुम्हीच नाही तर जगातील अधिकांश लोक विसरभोळेच आहेत. ते काही गोष्टी आठवण ठेवताना विसरतातच,
पण काळजी करू नका आम्ही या लेखात प्रवास करताना आपल्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल आणि कोणत्या नाही त्याविषयी सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊया त्या महत्वाच्या गोष्टी.
आपला प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी १० महत्वाच्या टिप्स ! – Travel Tips and Tricks in Marathi
१) आपण प्रवासाला कुठे जात आहोत त्या ठिकाणाविषयी माहिती असावे.
हि गोष्ट तर तुम्हाला माहितच असेल कि ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावर उभे राहून दुसऱ्या व्यक्तीला विचारत असतो हा रस्ता कुठे जातो, तो रस्ता कुठे जातो,
आणि दुसरा व्यक्ती त्याला सांगतोही कि कोणता रस्ता कुठे जातो. पण दुसरा व्यक्ती जेव्हा पहिल्या व्यक्तीला विचारतो कि, पण तुम्हाला जायचे कुठे आहे ! आणि तो व्यक्ती म्हणतो ते तर मला माहितच नाही.
या गोष्टीमधून आपण एवढ घेऊ शकतो कि आपल्याला जायचे कुठे आहे, हे नक्की पाहिजे तेव्हाच आपण आपला प्रवास सुरु करू शकतो.
त्याच प्रमाणे प्रवासाला जाताना त्या ठिकाणाविषयी पुरेपूर माहिती असावी. सोबतच झाले तर आपण त्या ठिकाणाचा नकाशा सोबत ठेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला कुठे फिरायचे आणि कुठे नाही हे लक्षात येऊन जाईल.
त्याठिकाणी कोठे हॉटेल्स,रेस्टोरेंट, आहेत ह्या विषयी सुद्धा माहिती ठेवू शकता जेणेकरून तुमच्या रहायची आणि जेवणाची व्यवस्था होईल.
२) दागिने किंवा महागडे वस्तू घेऊन प्रवास करू नये.
बऱ्याच लोकांना सवय असते कि कुठे बाहेर फिरायला जाताना आकर्षक दिसण्यासाठी ते त्यांच्या सोबत दागिने तसेच महागड्या वस्तू घेऊन जातात.
पण प्रवासात कोणत्याही महागड्या वस्तू तसेच दागिने घेऊन प्रवास करू नये कारण बरेचदा ते दागिने किंवा त्या वस्तू चोरीला जाण्याची दाट शक्यता असते.
आपण सोबत गळ्यातील चैन, दागिने, महागडे घड्याळ इत्यादी सगळ्या गोष्टी प्रवासाला निघण्यापूर्वी घरी सुव्यवस्थित ठेवून नंतर च प्रवासाला सुरुवात करावी.
३) आवश्यक कागदपत्रे जवळ जपून ठेवावे.
आपल्याला प्रवासात कामात येतील अशी सगळी कागदपत्रे आपण सोबत घ्यावी जेणेकरून जेव्हा आपल्याला त्या कागदपत्रांची गरज असेल तेव्हा आपण त्यांचा वापर करू शकू.
आणि काम झाल्यावर ती सगळी कागदपत्रे आपल्या जवळ जपून ठेवावी, (उदा. ड्रायविंग लायसन्स, गाडीची कागदपत्रे, आपले आधार कार्ड,ओळखपत्र, इत्यादी)
४) आवश्यक वस्तू जवळ जपून ठेवाव्या.
प्रवास म्हटलं कि आपल्यालाच कळते कि आपल्याला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ज्या आपल्याला प्रवासात कामात पडू शकतात. जसे आपण खूप सारे पैसे घेऊन प्रवास करू शकत नाही. त्याचसाठी आपण आपल्या ATM ला सोबत ठेवू शकतो.
ज्यामुळे आपल्याला पाहिजे तेव्हा पैसे काढण्यास सोपे जाईल, आणि मोठी रक्कम सोबत घेऊन फिरायची गरज हि भासणार नाही. तसेच प्रवासात बरेचदा आपल्याला काही सुंदर ठिकाणे दिसतात ज्यामुळे आपली तिथे फोटो काढण्याची इच्छा होते,
त्यासाठी आपण आपल्या सोबत एक DSLR कॅमेरा ठेवू शकतो जेणेकरून प्रवासातील बरेच सुंदर ठिकाणे आपण आपल्या आठवणीत जागे ठेवू शकू.
आवश्यकता असल्यास सन ग्लासेसहि जवळ ठेऊ शकता,
५) प्रवासासाठी व्यवस्थित बॅग निवडावी.
प्रवास म्हटल कि सामान आलेच, आणि ते सामान घेऊन जाण्यासाठी एका चांगल्या बॅगची आवश्यकता असते.
प्रवासाला जाताना अशी बॅग निवडावी जेणेकरून त्यामध्ये आपले समान सुरक्षित आणि व्यवस्थित राहील. बॅग हि वजनाने हलकी असावी जेणेकरून आपण त्या बॅगेला सोप्या पद्धतीने कुठेही ने-आण करू शकू.
६) आवश्यक असणारे संपर्क(Contact) जवळ ठेवावे.
आपण सगळे भारतीय आहोत आणि आपल्याला माहित आहे कि आपल्या देशामध्ये आपत्कालीन नंबर ११२ आणि पोलिसांची मदत लागली तर १०० ह्या नंबर वर मदत मिळते. आणि जेव्हा आपल्याला गरज भासेल तेव्हा आपण ह्या नंबर बर संपर्क करू शकतो.
सोबतच आपण आपल्या परिवाराच्या काही सदस्यांचे नंबरहि जवळ ठेवू शकता. जेणेकरून तुम्हाला संकट काळी काही मदत लागली तर ते त्यांच्या परिस्थिती नुसार तुम्हाला मदत करू शकतात.
७) लोकल व्यक्तींची मदत घ्या.
प्रवासात बरेचदा आपल्याला नकाशात दाखवल्याप्रमाणे काही ठिकाणे मिळत नाही आणि आपण गोंधळून जातो, अश्या परिस्थितीत गोंधळून न जाता तेथील लोकल व्यक्तींना त्या ठिकाणाविषयी माहिती विचारावी. कारण तेथील लोक त्या ठिकाणांविषयी पूर्णपणे जाणून असतात. ते आपल्याला सांगू शकतात कोणत्या क्षेत्रात आपण सुरक्षित आहोत आणि कोणत्या नाही. त्यासाठी प्रवास करताना नेहमी लोकल व्यक्तींची मदत घ्यावी.
८) प्रवासाला जाण्याच्या अगोदर घरच्यांना त्या विषयी सांगून जा !
जेव्हा हि कुठे बाहेर फिरायला जाणार असाल तर तुमच्या घरच्यांना त्याविषयी सांगून जा. कारण प्रत्येकाच्या जीवनात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे स्वतःचा परिवार आणि जेव्हाही आपण आपल्या परिवाराला सोडून काही दिवस बाहेर जात असाल तर तुमच्या घरच्यांना त्याविषयी सांगून जाणे योग्य ठरेल.
९) जेवण आणि पाणी.
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे प्रवासात आपण आपल्या आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्याला पचन होतील अश्या गोष्टी च आपण प्रवासात खायला घेतल्या पाहिजे. जेणेकरून त्याचा त्रास आपल्या पोटावर होणार नाही, शक्यतोवर आपण घरूनच आपला आहार सोबत घेऊन जाणे योग्य ठरेल,
पाण्याचा जर विचार केला तर बऱ्याच ठिकाणी पाण्यामध्ये बदल होतो आणि त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येण्याची संभावना जास्त असते, प्रवासाला जाताना आपण आपल्या सोबत स्वतःचे पाणी घेऊन जाऊ शकतो, त्यासाठी मार्केट मध्ये थर्मास सारख्या वस्तू उपलब्ध आहेत.
१०) प्रथमोपचार पेटी (First Aid Box)
तुम्ही बस मधून प्रवास करताना बरेचदा लक्ष देऊन बघितले असेल तर तुम्हाला जाणवले असेल कि बस मध्ये एका बाजूला हा बॉक्स ठेवलेला असतो. जर प्रवासात तुम्हाला काही दुखापत झाली तर त्या ठिकाणी हा बॉक्स तुमच्या डॉक्टरांचे काम करेल.
म्हणून प्रवासाला निघताना सोबत प्रथमोपचार पेटी म्हणजेच “First Aid” बॉक्स घेऊन प्रवास करावा कारण प्रवासात कधी आणि कुठे त्याची मदत भासेल आपण सांगू शकत नाही.
तर आजच्या लेखात आपण जाणून घेतल्या अश्या महत्वाच्या काही टिप्स ज्या तुम्ही प्रवासाला जाण्याच्या अगोदर वाचू शकता आणि ह्या टिप्स मुळे तुमचा भविष्यातील प्रवास हा सुखकर होईल. कारण म्हणतात ना “Prevention Is Better than Cure” म्हणजेच इलाज करण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतलेली कधीही बरी
प्रवासाला जातांना वरील टिप्स फॉलो करा आणि प्रवासात आपली काळजी घ्या आणि अश्याच नवीन लेखांसाठी आमच्याशी कनेक्ट रहा,
आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !