Sunday, October 1, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

पाहायचा दृष्टीकोन कसा यावर बरेचश्या गोष्टी अवलंबून असतात. अशीच एक मजेदार गोष्ट

Value Based Story in Marathi

बरेचश्या गोष्टी दृष्टिकोनावर अवलंबून असतात, आपला एखाद्या विशिष्ट गोष्टीविषयी दृष्टिकोन कसा ठेवतो, हे महत्वाचे आहे कारण आयुष्यात बऱ्याच परिस्थिती अश्याही येतात ज्यामध्ये आपण काय करायला हवे किंवा काय करू नये, याविषयी आपल्याला निर्णय घ्यायचा असतो तेव्हा त्यावेळी आपण कसा दृष्टीकोन ठेवतो ते महत्वाचे. तर आजच्या लेखात आपण दृष्टिकोनाविषयी एक छोटीशी स्टोरी पाहणार आहोत, जी आपल्याला आयुष्यात आपला दृष्टीकोन कसा असायला हवा ह्याविषयी समजावून सांगू शकेल. आशा करतो आपल्याला ही स्टोरी आवडणार आणि जीवनात पुढे जाण्यास मदत करणार. तर चला पाहूया एक छान स्टोरी.

पाहायचा दृष्टीकोन बदला जग बदलेल मराठी गोष्ट – “Change Your Thinking Change Your Life” Value-Based Story in Marathi

Value Based Story in Marathi
Value-Based Story in Marathi

लीना नावाची एक महिला मुंबईच्या एका कॉर्पोरेट ऑफिस मध्ये कामाला असते, तिचा स्वभाव असा असतो की तिला तिने केलेले काम नेहमी उत्तम वाटते आणि दुसऱ्यांच्या कामात नेहमी काही ना काही चूक काढत असते. जर सोबतच्या एखाद्या व्यक्तीने काही चांगले कार्य केले तर त्या कामात काही तरी कमतरता काढणे लीना ला चांगल्या प्रकारे जमतं. या लीना च्या ऑफिस समोर एक मोठी इमारत असते आणि समोर बरेचश्या बाल्कनी असतात. पण एक दिवस लीना ची नजर त्या बाल्कनी मध्ये कपडे वाळू घालणाऱ्या एका स्त्री कडे जाते. आणि तिला दिसते की एक स्त्री खराब कपडे वाळू घालत सोबतच ती स्त्री सुध्दा मळके कपडे घातलेली आहे आणि तिची बिल्डिंग सुध्दा धुळेने खराब झालेली आहे.

या गोष्टींना पाहत ती आपल्या सोबत काम करणाऱ्या एका सहकाऱ्याला म्हणते की बघ समोरच्या बिल्डिंग मध्ये एक स्त्री मळके कपडे वाळू घालत आहे, सोबतच तीने सुध्दा मळके कपडे घातले आहेत, आणि मळक्याच बिल्डिंग मध्ये सुध्दा राहत आहे, हे सोबत काम करणारा सहकारी ऐकतो आणि लीना च्या हो मध्ये हो मिळवतो, आणि आपल्या कामाला लागून जातो.

आता लीना दररोज ऑफिस मध्ये आल्यावर त्या बिल्डिंग कडे पाहतो आणि त्या महिलेला दररोज दोष देत कोणा ना कोणाजवळ सांगत राहते, असे बरेच दिवस होत जातं. आता लीना त्या महिलेमधील कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमतरता पाहते आणि रोज तिला दोष देते, असे बरेच दिवस चालत राहतं.

एक दिवस लीना त्या महिलेकडे टक पाहत असते तोच लीना च्या डेस्क जवळ तिचा टीम लीडर येऊन उभा रहातो आणि तिला पाहतो तर ती काम करत नसते आणि समोरच्या बिल्डिंग कडे पाहत असते. तिला एवढं पण भान राहत नाही की आपला बॉस आपल्या डेस्क जवळ येऊन उभा राहिला आहे. शेवटी तिचा बॉस तिला आवाज देत म्हणतो लीना काय सुरू आहे? कामात लक्ष का नाही? तेव्हा लीना दचकून पाहते तर समोर बॉस उभा असतो. ती लगेच आपल्या खुर्ची वरून उभी राहते आणि बॉस ला म्हणते, सर पहा ना लोक किती निष्काळजी बाळगतात.

आता आपल्या ऑफिस च्या समोरील बिल्डिंग कडे पहा ती स्त्री रोज आपल्या घरातील मळके कपडे वाळू घालते सोबतच तिचे कपडे सुध्दा किती मळके आहेत, आणि तिची बिल्डिंग सुध्दा, या गोष्टीला ऐकून तिचा बॉस लीना ला म्हणतो अच्छा बिल्डिंग कडे पाहणे चालू होते का? बरं उद्या ऑफिस ला आल्यानंतर मला परत हा प्रकार दाखवायला विसरू नको आपण उद्या या गोष्टीवर बोलू आणि एवढं बोलून तिचा बॉस तेथून निघून जातो.

त्यांनंतर लीना दुसऱ्या दिवशी ऑफिस ला येते आणि आज पाहते तर काय समोरील बिल्डिंग एकदम स्वच्छ आणि तेथील ती महिला सुध्दा स्वच्छ कपडे वाळू घालत होती, सोबतच तिचे कपडे सुध्दा स्वच्छ होते, तिला कळेनासे झाले हा चमत्कार कसा झाला तर, आणि ती बॉस च्या कॅबिन मध्ये जाऊन बॉस ला हा सर्व प्रकार सांगितला तेव्हा बॉस ने तिला तिच्या डेस्क जवळ नेऊन समजावले की, यात काहीही बदल झालेला नाही, ना त्या बिल्डिंग ला पेंट केल्या गेलं आणि नाही त्या महिलेने आज स्वच्छ कपडे धुतले ती तर रोज स्वच्छ कपडे धुवत होती पण आपल्या बिल्डिंग च्या काचावर बरेच दिवस झाले धूळ बसली होती म्हणून तुला सर्व मळके दिसत होते आणि ती धूळ काल मी साफ करायला सांगितली आणि आज आपल्यासमोर असे दिसत आहे.

यावर बॉस लीना ला समजावून सांगत होता की बरेचश्या गोष्टी आपल्या पाहण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतात, कारण कधी कधी आपला दृष्टिकोन त्या गोष्टीविषयी योग्य नसतो आणि आपण त्या गोष्टीलाच वाईट समजून बसतो. म्हणून आपल्या जीवनात दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे. यानंतर लीना ला स्वतःची चूक समजली होती आणि चांगल्या प्रकारे लक्षात सुध्दा आली होती.

तसेच आपल्या जीवनात सुध्दा वाईट गोष्टींकडे आपला दृष्टिकोन एक प्रकारे वाईटच असतो पण वाईट गोष्टींमध्ये सुध्दा चांगली गोष्ट पाहणे आवश्यक आहे. म्हणून जीवनात वाईट परिस्थितीला संधी म्हणून पहा आणि त्यावर मात करा. यश नक्कीच आपल्याला मिळेल. तर आशा करतो आपल्याला लिहिलेली ही छोटीशी स्टोरी आपल्याला आवडली असेल आपल्याला लिहिलेली ही छोटीशी स्टोरी आवडल्यास या स्टोरी ला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Previous Post

वैज्ञानिकांना ब्रह्मांडात सापडला पृथ्वीसारखा दुसरा ग्रह! संपूर्ण माहिती जाणून घ्या या लेखाद्वारे

Next Post

जाणून घ्या ६ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Marathi Story on Life
Marathi Stories

जीवनातील दुःख बाजूला सारून नवीन रित्या जीवन जगण्याची उमेद जागवणारी कथा

Marathi Story on Life आयुष्यात अनेक वाईट प्रसंग नेहमी समोर येतात, आणि आपल्याला त्यांचा सामना सुध्दा करावा लागतो, पण या...

by Vaibhav Bharambe
August 1, 2020
Marathi Story on Stress Management
Marathi Stories

तणावापासून मुक्त करेल ही छोटीशी स्टोरी! एकदा वाचूनच पहाच…

Marathi Story on Stress Management देशात आज बरेच लोक तणावाचे शिकार होऊन स्वतःचा जीव सुध्दा देण्यास मागे पुढे पाहत नाहीत,...

by Editorial team
July 31, 2020
Next Post
6 August History Information in Marathi

जाणून घ्या ६ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

Shiva Mahimna Stotram

शिव महिमा स्तोत्र

Vishnu Aarti Om Jai Jagdish Hare

विष्णू देवाची आरती

Navnag stotra

नवनाग स्तोत्र

Aarti Dnyanraja

संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved