अश्या प्रकारे घरीच बनवा व्हेज स्प्रिंग रोल्स

Vegetable Spring Rolls 

आपल्याकडे चायनीज खुप आवडीने खाल्ल्या जातं पण या चायनिज रेसीपी बनवतात कश्या हे आपण आज बघु आज आपण व्हेज स्प्रिंग रोल बनवुया याची सामग्री आणि विधी अश्याप्रकारे आहे

वेज स्प्रिंग रोल बनवण्याची रेसिपी  – Vegetable Spring Roll Recipe in Marathi

Veg Spring Roll Recipe in Marathi

वेज स्प्रिंग रोल बनवण्याकरता सामग्री – Ingredients of Vegetable Spring Roll 

पॅनकेक करता

 • १ कप कॉर्नफ्लॉवर
 • अर्धा कप मैदा
 • १ अंडे
 • आवश्यकतेनुसार पाणी

सीजनींग करता

 • अर्धा टिस्पुन मीठ
 • २ चिमुट अजीनोमोटो
 • साखर आणि काळीमीर्च पावडर
 • दिड टिस्पुन बारीक केलेला लसुण
 • १ टेबलस्पुन कापलेली सेलरी
 • २ टेबलस्पुन कापलेली हिरवी कांदयाची पात
 • कापलेला अर्धा कांदा
 • २ कप पातळ कतरलेली पत्ताकोबी
 • अर्धे बारीक कतरलेले गाजर
 • अर्धी पातळ स्लाईस मध्ये कापलेली शिमला मिरची
 • अर्धा कप बीन स्प्राउट्स्
 • १ टेबलस्पुन सोयासॉस
 • १ अंडे पांढरे
 • तळण्याकरता तेल

व्हेज स्प्रिंग रोल बनविण्याचा रेसिपी – Vegetable Spring Roll Recipe

पॅनकेक करता:

एका बाउल मधे पॅनकेक ची सर्व सामग्री मिसळुन घ्या. एका नॉन स्टिक पैन मधे थोडेसे तेल लावून या घोळाला पसरवा. दोन्ही बाजुनी हलके ब्राउन होईपर्यंत शेका. चिकटपणा हटवण्याकरता थोडे कॉर्नफ्लॉवर भुरका.

स्टफिंग करता:

एका नॉनस्टिक पॅन मध्ये तेल गरम करून कापलेला लसुण आणि सेलरी टाकुन मोठया आचेवर परतुन घ्या, कापलेला कांदा, शिमला मिरची, पत्ता कोबी, गाजर आणि बिन स्प्राउट्स् मिसळुन १ मिनीटापर्यंत शिजवा. साखर, मीठ, अजिनोमोटो आणि काळीमीर्च पावडर टाकुन परता. थोडे पाणी आणि डार्क सोया सॉस शिंपडुन मोठया गॅसवर मिक्स करा. हिरव्या कांदयाची पात टाकुन उतरवुन घ्या आणि थंड होण्याकरता ठेवा. स्टफिंग नरम असायला हवी, नाहीतर थोडे आणखीन पाणी टाकुन शिजवा.

रोल करता:

पॅनकेक च्या दोन्ही किना-यावर स्टफिंग टाकुन रोल करून घ्या. अंडयाच्या पांढरेपणाने किंवा कॉर्नफ्लॉवर च्या पेस्ट ने बंद करून रोल ला मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत डीप फ्राय करा.

तर हि होती आपली आजची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.

धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here