13 March Dinvishesh
भारतात त्याच प्रमाणे संपूर्ण विश्वात आजच्या दिनी घडलेल्या संपूर्ण गोष्टींचा आढावा आपण या लेखातून घेऊन आपले ज्ञान वाढवू शकता. आजच्या दिवसाला घडलेल्या घटना केवळ इतिहासाच्या पानांवर जमा झाल्या आहेत. या लेखाद्वारे आम्ही आपणास त्या सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत ते खालील प्रमाणे.
जाणून घ्या १३ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 13 March Today Historical Events in Marathi
१३ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 13 March Historical Event
- सन १७८१ साली जर्मन शास्त्रज्ञ विल्यम हर्षेल यांनी युरेनस ग्रहाचा शोध लावला.
- सन १९१० साली भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पॅरिस वरून लंडनला येताच अटक करण्यात आले होते.
- सन १९३० साली क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग यांनी प्लुटो ग्रहाचा शोध लावल्याचे हावर्ड विद्यापीठातील वेधशाळेला कळवले.
- सन १९४० साली अमृतसर येथील जालियानवाला बाग हत्याकांडाला समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळ्या घालून हत्या केली.
- सन १९९७ साली इंडियन मिशनरीज ऑफ चैरिटीच्या पुढारी मदर टेरेसा यांचे वारसदार म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली.
१३ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 13 March Birthday/ Jayanti/ Birth Anniversary
- सन १७३३ साली इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ व ऑक्सिजन या मूलद्रव्याचा शोध लावणारे शास्त्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचा जन्मदिन.
- सन १८९३ साली प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत विद्वान, महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी यांचा जन्मदिन.
- सन १८९९ साली हैदराबाद राज्याचे पहिले मुख्यमंत्री डॉ. बर्गुला रामकृष्ण राव यांचा जन्मदिवस.
- सन १९२६ साली मराठी भाषिक ललित लेखक रवींद्र पिंगे यांचा जन्मदिन.
- सन १९७१ साली हिंदी भाषिक कवी आत्मा रंजन यांचा जन्मदिन.
- सन १९८० साली भारतीय राजकारणी नेता, भारतीय लोकसभा सदस्य आणि संजय गांधी यांचे पुत्र वरून गांधी यांचा जन्मदिवस.
१३ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 13 March Death/ Punyatithi/ Smrutidin
- सन १८०० साली पुण्यामधील पेशवाई घराण्यातील मराठा साम्राज्याचे प्रभावी मंत्री आणि राजकारणी नानासाहेब फडणीस यांचे निधन.
- सन १८९९ साली महाराष्ट्रीयन कवी दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचे निधन.
- सन १९०१ साली अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन यांचे निधन.
- सन १९६९ साली भारतीय गणितीयशास्त्रज्ञ रॅग्लर मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रेय यांचे निधन.
- सन १९९४ साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व ‘सिटू’ या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते श्रीपाद यशवंत कोल्हटकर यांचे निधन.
- सन १९९७ साली राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू व संघटक शीला इराणी यांचे निधन.
- सन २००२ साली भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, आणि पटकथा लेखक मोहम्मद नासिर हुसेन खान यांचे निधन.
- सन २००४ साली प्रख्यात भारतीय सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचे निधन.
आजच्या दिवसाला इतिहासात जमा झालेल्या संपूर्ण गोष्टीची माहिती आम्ही आपल्या पर्यंत आणण्याचा पर्यंत केला. तरी, आपणास ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर्स करा.