जाणून घ्या 14 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष

14 November Dinvishes

सर्व वाचक रसिकांना माझी मराठी परिवारातर्फे दीपावलीच्या अनंत हार्दिक शुभेच्छा, ही दिवाळी आपणा सर्वांना साठी आरोग्यदायी व सुखदायी असो व तिमिरातून तेजाकडे आपली यशस्वी वाटचाल अविरत सुरु राहो … १४ नोव्हेंबर म्हणजेच आजच्याच दिवशी देश विदेशांत अनेक घटना घडल्या होत्या त्याच बरोबर अनेक प्रसिध्द व्यक्तींचे आज वाढदिवस (जयंती दिवस) सुध्दा आहेत, सोबतच काही व्यक्ती आजच्याच दिवशी आपल्यातून निघून सुध्दा गेले होते म्हणजेच त्यांचे निधन झाले होते अश्याच महत्वपूर्ण बाबींचा आजच्या दिनविशेष मध्ये आपण आढावा घेणार आहोत, चला तर मग बघूया काय आहे आजचे दिनविशेष.

जाणून घ्या 14 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 14 November Today Historical Events in Marathi

14 November History Information in Marathi
14 November History Information in Marathi

14 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 14 November  Historical Event

 • १६८१ साली आजच्याच दिवशी ईस्ट कंपनीने बंगाल ला वेगळे प्रांत बनविण्याची घोषणा केली होती.
 • १९२२ साली आजच्याच दिवशी बी.बी.सी म्हणजेच ‘ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग काम्युनिकेशन’ या नाभोवानीची ब्रिटेन या देशात सुरुवात करण्यात आली होती . ब्रिटेन मध्ये ही नाभोवानीची प्रथम संस्था होती.
 • १९७३ साली आजच्याच दिवशी ब्रिटेन राजघराण्यातील राजकुमारी ‘ऐन’ ने इतिहासत प्रथमच एका सामान्य व्यक्तीशी विवाह केला होता, तत्पूर्वी असे कधीही घडले न्हवते.
 • तत्कालीन चीनचे राष्ट्रपती जियांग जेमिन यांनी २००२ साली आपल्या राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता.
 • भारत – पाकिस्तान या दोन्ही देशांतील विदेश सचिवांनी आजच्याच दिवशी २००६ साली दिल्ली येथे बैठकीत आतंकवाद विरोधी कार्यपध्दती विकसित करण्याचे धोरण ठरविले.
 • डेन्मार्क या देशाचे पंतप्रधान आंद्रे फाग यांनी २००७ साली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला होता.

14 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 14 November Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा १८८९ साली जन्म झाला होता.
 • हिंदी भाषेचे प्रसिध्द भारतीय साहित्यकार हरिवंशराय बच्चन यांचा १९०७ साली जन्म झाला होता.
 • प्रसिध्द हिंदी साहित्यकार गजानन मुक्तिबोध यांचा १९१७ साली जन्म झाला होता.
 • प्रसिध्द हिंदी कवी बालवीर सिंह यांचा १९१९ साली जन्म झाला होता.
 • अमेरिकेची अभिनेत्री वेरोनिका लेक हिचा आजच्याच दिवशी १९२२ साली जन्म झाला होता.
 • उदारवादी धोरणाचे पुरस्कर्ते व मुक्त आर्थिक व्यवहार नीतीचे खंदे समर्थक पिलू मोदी यांचा १९२६ साली आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
 • ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा प्रसिध्द खेळाडू आडम गिलख्रीस्ट याचा १९७१ साली आजच्याच दिवशी जन्म झाला होता.

14 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 14 November Death / Punyatithi / Smrutidin

 • भारतीय क्रिकेट संघाचे प्रथम कसोटी संघ कर्णधार सी के नायडू यांचा १९६७ साली निधन झाले होते.
 • प्रसिध्द वैष्णव व धर्म -भक्तीप्रचारक भक्तिवेदांत स्वामी प्रभुपद १९७७ साली आजच्याच दिवशी अनंतात विलीन झाले होते.
 • भारताचे प्रसिध्द अर्थशास्त्री लक्ष्मीचंद जैन यांचे २०१० साली आजच्याच दिवशी निधन झाले होते.
 • प्रसिध्द बाल साहित्यकार व संपादक हरिकृष्ण देवसरे यांचा २०१३ साली आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता.

१४ नोव्हेंबर ला येणारे सन उत्सव – Important Events and Festivities of 14 November

जागतिक बाल दिवस (पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती जागतिक बाल दिवस म्हणून साजरी करण्यात येते)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here