• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Sunday, August 7, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

जाणून घ्या १५ जुलै रोजी येणारे दिनविशेष

 15 July Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. या लेखात आम्ही १५ जुलै या दिवशी घडलेल्या काही निवडक घटनांचे लिखाण केलं आहे.

जाणून घ्या १५ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 15 July Today Historical Events in Marathi

15 July History Information in Marathi
15 July History Information in Marathi

१५ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 15 July Historical Event

  • इ.स. १६६२ साली इंग्लंड मध्ये प्रसिद्ध असलेल्या रॉयल सोसायटीची स्थापना करण्यात आली.
  • इ.स. १६७४ साली मुघल सरदार बहादुरशाह कोकलताश याच्या ताब्यात असलेल्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली.
  • सन १९१६ साली जगभरात विमान, रोटरक्राफ्ट, रॉकेट, उपग्रह, दूरसंचार उपकरणे आणि क्षेपणास्त्रांची रचना आणि विक्री करणारी अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी बोईंग ची स्थापना करण्यात आली.
  • सन १९५५ साली देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • सन १९७९ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
  • सन १९९६ साली स्वाध्याय परिवारची स्थापना करणारे भारतीय कार्यकर्ते तत्वज्ञानी, आध्यात्मिक नेते, सामाजिक क्रांतिकारक आणि धर्म सुधारक पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • सन १९९७ साली महाराष्ट्रीयन पर्यावरणवादी कार्यकर्ता महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
  • सन २०११ साली भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने आपल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन पीएसएलव्हीद्वारे आधुनिक संप्रेषण उपग्रह जीसॅट-१२ अंतराळ कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केला.

१५ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 15 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १६११ साली मुघल साम्राज्याचे ज्येष्ठ सेनापती आणि आमेर राज्याचे राज्यकर्ता महाराजा जयसिंग यांचा जन्मदिन.
  • इ.स. १७८३ साली पर्शियन भारतीय व्यापारी व दानवीर जमशेदजी जीजाभाई यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८४० साली स्कॉटिश इतिहासकार, सांखिकीतज्ञ, संकलक आणि भारतीय नागरी सेवेचा सदस्य विलियम विलसन हन्टर (William Wilson Hunter) यांचा जन्मदिन.
  • सन १९०३ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक आणि अध्यक्ष, स्वातंत्र्यसेनानी तसचं तामिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री के. कामराज यांचा जन्मदिन.
  • सन १९०५ साली पाकिस्तान राष्ट्राचे चौथे पंतप्रधान चौधरी मुहम्मद अली यांचा जन्मदिन.
  • सन १९०९ साली भारतीय स्वतंत्रता सेनानी, मुत्सदी, वकील व आंध्रप्रदेश राज्याच्या पहिल्या महिला राजनेता दुर्गाबाई देशमुख यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली नोबल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ लिओन एम. लेडर मैन (Leon M. Lederman) यांचा जन्मदिन.
  • सन १९३२ साली महाराष्ट्रीयन मराठी भाषा व साहित्याचे समिक्षक आणि समाजचिंतक व लेखक नरहर अंबादास कुरुंदकर यांचा जन्मदिन.
  • सन १९३६ साली भारतीय हिंदी पत्रकारिता, लेखक आणि राजकीय विश्लेषक प्रभास जोशी यांचा जन्मदिन.

१५ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 15 July Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १२९१ साली जर्मन शासक सम्राट रुडॉल्फ( Rudolph)  प्रथम यांचे निधन.
  • इ.स. १५४२ साली इटालियन सुप्रसिद्ध चित्रकार व विश्वातील सर्वात सुंदर चित्र मोनालिसा ची निर्मिती करणारे लियोनार्डो दा विंची (Leonardo da Vinci) उर्फ लिसा डेल जियोकोंडो यांचे निधन.
  • सन १९०४ साली प्रसिद्ध रशियन नाटककार आणि लघुकथा लेखक अँटोन पावलोविच चेखोव (Anton Chekhov)  यांचे निधन.
  • सन १९१९ साली नोबल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ हर्मन एमिल लुई फिशर (Emil Fischer) यांचे निधन.
  • सन १९६७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी गायक व रंगमंच अभिनेता बाल गंधर्व यांचे निधन.
  • सन २००४ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय चिकित्सक वैज्ञानिक तथा परिवार नियोजन विशेषज्ञ बानो जहांगीर कोयाजी यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved