16 November Dinvishes
१६ नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देशविदेशांत काही महत्वाच्या घटना घडल्या होत्या , तसेच काही प्रसिध्द व्यक्तीचे जन्म व मृत्यू ह्या दिवशी झालेले आहेत. त्या सर्व बाबींचा आढावा आपण आजच्या दिनविशेष मध्ये घेणार आहोत, चला तर मग बघूया काय आहे आजच्या तारखेला विशेष
जाणून घ्या 16 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 16 November Today Historical Events in Marathi
16 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 16 November Historical Event
- मेक्सिको या देशाला १८२१ साली स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली होती.
- ओकलाहोमा १८७० साली आजच्याच दिवशी अमेरिकेचे ४६ वे प्रांत बनले होते.
- पापुआ न्यू गिनी या देशाने १९७५ साली ऑस्ट्रेलिया या देशापासून स्वातंत्र्य मिळविले होते.
- पूर्व पाकिस्तानी नेता बेनजीर भुत्तो यांनी १९८८ साली ११ वर्षानंतर झालेली सामान्य निवडणूक जिंकली होती.
- कनाडा या देशात १९९८ साली नागरिकता कायदा आणखी कडक करण्यात आला होता.
- पाकिस्तान ने २००६ साली मध्यम अंतराच्या गोरी- व्ही क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले होते.
- इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेने २०१४ साली सिरीया येथील कुर्दिश योद्ध्यांच्या विरुध्द युद्धास सुरुवात केली होती.
- भीषण चक्रीवादळ ‘सीडर’ ने बंगालच्या खाडीतून उगम पावून २००७ साली बांगलादेशात भीषण अतोनात नुकसान केले होते.
- भारतीय वंशाचे वासुदेव पांडे त्रिनिनाद व टोबैगो या देशाचे १९९५ साली आजच्याच दिवशी पंतप्रधान बनले होते.
- वाल्ट डिस्नी वर्ल्ड ची १९६५ साली पहिल्यांदा सार्वजनिक रित्या घोषणा करण्यात आली होती.
16 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 16 November Birthday / Jayanti / Birth Anniversary
- उर्दूचे प्रसिध्द शायर अकबर इलाहाबादी यांचा १८४६ साली जन्म झाला होता.
- ब्रिटीश लेखक , कवी तसेच नाटककार अल्फ्रेड नॉयस यांचा १८८० साली जन्म झाला होता.
- पाकिस्तान ची मागणी सर्वप्रथम करणाऱ्या समर्थक रहमत अली चौधरीचा १८९७ साली जन्म झाला होता.
- अमेरिका येथील प्रसिध्द व्यंगचित्रकार सैनमन यांचा १९२० साली जन्म झाला होता.
- अमेरिकेचे मानव वंश शास्त्रज्ञ सिडनी मिन्त्झ यांचा १९२२ साली जन्म झाला होता.
- पोर्तुगाल येथील प्रसिध्द नोबेल पुरस्कार विजेते लेखक जोसे सरामैगो यांचा १९२२ साली जन्म झाला होता.
- विएतनाम या देशाचे राजनेते व प्रसिध्द राजनीतिज्ञ होंग मिन्ह चिन्ह यांचा १९२२ साली जन्म झाला होता.
- प्रसिध्द भारतीय लांब पल्ल्याचे जलतरणपटू मिहीर सेन यांचा १९३० साली जन्म झाला होता.
- भारतीय क्रिकेट पंच आर रामचंद्र राव यांचा १९३१ साली जन्म झाला होता.
- प्रसिध्द बैटमिन्टनपटू पुलेला गोपीचंद यांचा १९७३ साली जन्म झाला होता.
16 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 16 November Death / Punyatithi / Smrutidin
- पासी जातीची वीरांगना उदा देवी यांचा १८५७ साली मृत्यू झाला होता.
- भारतीय क्रांतिकारी कर्तारसिंह सराभा यांचे १९१५ साली निधन झाले होते.