जाणून घ्या १८ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

 18 August Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्ती, तसचं निधन वार्ता या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आज आपल्या देशाचे थोर नेता व महान क्रांतिकारक नेताजी सुभाष चंद्र बोस यांची पुण्यतिथी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपले संपूर्ण जीवन हे देशाकरिता अर्पण केलं होत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८८७ साली ओरिसा राज्यातील कटक या ठिकाणी झाला होता. नेताजी लहानपणापासूनचं खूप बंडखोर वृत्तीचे होते. त्यांना आठ भावंडे होते त्यातील सुभाषचंद्र बोस हे नवव्या क्रमांकाचे होत. नेताजींना गुरु करून घेण्याची इच्छा होती, त्याकरिता त्यांनी हिमालयाच्या दिशेने प्रस्थान केलं. परंतु, त्यांना गुरुदर्शन झालं नाही. नेताजींनी स्वामी विवेकानंद यांचे साहित्य वाचून त्यांना आपले गुरु बनविले.

नेताजींनी इंग्लंड मध्ये जाऊन भारतीय प्रशासकीय अधिकारी पदाची परीक्षा दिली त्या परीक्षेत त्यांचा चौथा क्रमांक आला. परंतु, त्यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी नेताजींनी ही नोकरी नाकारली. पुढे नेताजी राष्ट्रीय कॉंग्रेस चे सदस्य झाले. त्यांना अध्यक्ष पद देखील मिळालं होत परंतु, त्यांनी त्या पदाचा स्वीकार केला नाही. त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेस मधून वेगळ होऊन सन १९३९ साली फॉरवर्ड ब्लॉक संघटनेची स्थापना केली. नेताजींना इंग्रज सरकर विरुद्ध करीत असलेल्या आंदोलनामुळे त्यांना अनेक वेळा नजर कैद करण्यात आलं होत.

नेताजी इंग्रजाच्या नजर कैदेतून सुटून सिंगापूरला आले तेथे त्यांनी सन २१ ऑक्टोबर १९४३ साली अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान त्यांनी दिलेला राष्ट्रभक्तीचा जय हिंद हा नारा आज राष्ट्रीय नारा बनला आहे. त्यांनी देशातील लोकांना उद्देशून ‘तुम मुझे खून दो माई तुम्हें आझादी दूंगा’ या स्वरुपाप्त नारे दिले. सन १८ ऑगस्ट १९४५ साली नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात असतांना प्रवासादरम्यान त्यांचे विमान बेपत्ता झाले.त्या दिवसानंतर ते कुणाला दिसले नाहीत. अश्या या महान नेत्याची आज पुण्यतिथी.

जाणून घ्या १८ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 18 August Today Historical Events in Marathi

18 August History Information in Marathi
18 August History Information in Marathi

१८ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 18 August Historical Event

 • इ.स. १८०० साली ब्रिटीश कालीन भारतात कलकत्ता या ठिकाणी (Richard Wellesley) यांनी फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केली.
 • इ.स. १८४१ साली जगात सर्व प्रथम ब्रिटन मध्ये राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना करण्यात आली.
 • सन १९२० साली अमेरिकेच्या संविधानात बदल करून स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
 • सन १९५८ साली बांगलादेशचे जलतरणपटू ब्रोजेन दास हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई व्यक्ती बनले.
 • इ.स. १८६८ साली फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ ज्यूलस जानसेन(Pierre Janssen) यांनी हेलियम वायूचा शोध लावला.
 • सन १९४९ साली हंगेरी राष्ट्राने प्रजासत्ताक राष्ट्राची घटना स्वीकारली.
 • सन १९५१ साली पहिल्या पंचवार्षिक योजणे दरम्यान  पश्चिम बंगाल मधील खडगपूर येथे भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली.

१८ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 18 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १७०० साली मराठा साम्राज्याचे पहिले मराठा पेशवा शासक थोरले बाजीराव पेशवे उर्फ श्रीमंत पेशवा बल्लाळ बाळाजी भट्ट यांचा जन्मदिन.
 • इ.स. १७३४ साली मराठा साम्राज्याचे दहावे पेशवे रघुनाथराव पेशवे यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८७२ साली हिंदुस्तानी शास्त्रीय गायक, संगीतज्ञ, संगीतप्रसारक आणि गंधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनचार्य पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्मदिन.
 • सन १९०० साली भारतीय मुत्सद्दी व राजकारणी तसचं, संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्मदिन.
 • सन १९२३ साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू सदाशिव गणपतराव शिंदे यांचा जन्मदिन.
 • सन १९३४ साली ‘गुलजार’  या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले भारतीय गीतकार, कवी, लेखक, पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक संपूर्ण सिंग कालरा यांचा जन्मदिन.
 • सन १९३६ साली अमेरिकन अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि व्यावसायिक तसचं, सनडान्स फिल्म फेस्टिव्हलचे संस्थापक रॉबर्ट रेडफ़ोर्ड (Robert Redford) यांचा जन्मदिन.
 • सन १९५६ साली माजी भारतीय क्रिकेटपटू, भारतीय राष्ट्रीय वयोगटातील क्रिकेट व्यवस्थापक आणि केनिया राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक संदीप मधुसूदन पाटील यांचा जन्मदिन.
 • सन १९६७ साली प्रसिद्ध पंजाबी व हिंदी गायक दलेर मेहंदी यांचा जन्मदिन.

१८ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 18 August Death / Punyatithi /Smrutidin

 • इ.स. १२२७ साली मंगोल साम्राज्याचे संस्थापक व महान क्रूर शासक सम्राट चंगेज खान यांचे निधन.
 • सन १९४० साली अमेरिकन ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचे कार्यकारी आणि क्रिसलर कॉर्पोरेशनचे संस्थापक वॉल्टर क्रिस्लर(Walter Chrysler) यांचे निधन.
 • सन १९४५ साली महान भारतीय स्वातंत्र्य सेनानी व क्रांतिकारक,  तसचं, राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्य व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे निधन.
 • सन १९९० साली प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार, प्रचारक व सरस्वती पत्रिकेचे संपादक तथा पत्रकार श्री नारायण चतुर्वेदी यांचे निधन.
 • सन १९९८ साली भारतीय मॉडेल, अभिनेत्री आणि लेखिका पर्सिस खंबाट्टा यांचे निधन.
 • सन २००८ साली महाराष्ट्रीयन मराठी भाषेचे लेखक, रहस्यकथाकार व नाटककार नारायण धरप यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top