Saturday, June 10, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १९ मार्च रोजी येणारे दिनविशेष

19 March Dinvishes

देश विदेशात आजच्या दिवशी इतिहासात अनेक घटना घडून गेल्या आहेत, परंतु आपणास त्या ज्ञात नाहीत. प्रत्येक दिवसाचा काहीना काही इतिहास असतोच, महान व्यक्तींचे जन्म, निधन, त्यांनी केलेली महत्वपूर्ण कामगिरी अश्या अनेक प्रकारच्या घटना इतिहासजाम झालेल्या आहेत. त्या संपूर्ण घटनांची माहिती (19 March Today Historical Events in Marathi), आम्ही आपणास या ठिकाणी देणार आहोत.

जाणून घ्या १९ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 19 March Today Historical Events in Marathi

19 March Today Historical Events in Marathi

१९ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 19 March Historical Event

  • इ.स. १८३१ साली अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरात स्थित असलेल्या सिटी बँकेत सर्वप्रथम चोरीची घटना घडली होती. या जोरीमध्ये जवळपास २४५,००० डॉलर चोरीला गेले होते.
  • सन १८४२ साली गोपाल हरि देशमुख उर्फ लोकहितवादी यांची ‘शतपत्रे’  प्रभाकर वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध होण्यास सरूवात झाली.
  • इ.स. १९३१ साली अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगार खेळण्यास कायदेशीर मान्यता मिळाली होती.
  • सन १९३२ साली सिडनी येथील हार्बर ब्रिज सुरु करण्यात आला.
  • इ.स. १९६२ साली पुण्यामधील राजा केळकर संग्रहालय सर लोकांसाठी उघडे करण्यात आले.
  • सन १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने पूर्वोत्तर भारतात राष्ट्रीय ध्वज फडकाविला होता.
  • इ.स. १९७२ साली भारत आणि बांगलादेश यांच्यात मित्रता करार झाला.
  • सन १९९८ साली भारतीय जनता पार्टीचे सदस्य अटल बिहारी वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले होते.
  • इ.स. २००१ साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले होते
  • सन २००५ साली पाकिस्तान देशाने “शाहीन-२” क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.

१९ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 19 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८२१ साली ब्रिटीश संशोधक, गुप्तचर, भाषाशास्त्रज्ञ, कवी, मुत्सद्दी सर रिचर्ड बर्टन यांचा जन्मदिन.
  • सन १८९७ साली भारतीय चित्रपट संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९०० साली फ्रेंच पदार्थवैज्ञानिक नोबल पारितोषिक पुरस्कार विजेते जीन फ्रेडरिक जोलिओट यांचा जन्मदिन. यांनी मुलद्रव्याच्या समस्थानिकांचा शोध लावला.
  • सन १९३८ साली भारतीय चित्रपट दिग्दर्शिका आणि पटकथा लेखक सई परांजपे यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९३९ साली हिंदी चित्रपट क्षेत्रांतील हास्य कलाकार जगदीप यांचा जन्मदिन.
  • सन १९५४ साली भारतीय शिक्षणतज्ञ इंदू सहानी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९८२ साली ब्राझिलचे उद्योजक आणि गुंतवणूकदार तसेच फेसबुक चे सह-संस्थापक एडुआर्डो लुईझ सेव्हरीन यांचा जन्मदिन.

१९ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 19 March Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे निधन झाले.
  • सन १७५४ साली इंदूरच्या होळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचे एकमेव पुत्र खंडेराव होळकर यांचे निधन.
  • इ.स.१८८४ साली आद्द्य गणिततज्ञ केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचे निधन.
  • सन १८९० साली स्वामी दयानंद सरस्वती यांचे शिष्य तसेच, आर्य समाजाचे प्रमुख नेत्यांपैकी एक पंडित गुरुदत्त यांचे निधन.
  • इ.स. १९८२ साली भारतीय राजकारणी तसचं, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आचर्य कृपलानी तथा जीवात्रम भगवानदास कृपलानी यांचे निधन.
  • सन २००२ साली भारतीय क्रिकेट संघाचे यष्टीरक्षक व फलंदाज नरेन ताम्हाणे यांचे निधन.

वरील संपूर्ण माहितीचे लिखाण स्पर्धा परीक्षेच्या हेतूने केले आहे. तरी आपण ही माहिती वाचून आपण आपले सामन्य ज्ञान वाढवू शकता. धन्यवाद..

Previous Post

नंदुरबार जिल्ह्याची संपूर्ण माहिती

Next Post

प्रबोधनकार ठाकरे यांचे जीवनचरित्र

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Prabodhankar Thackeray in Marathi

प्रबोधनकार ठाकरे यांचे जीवनचरित्र

Malai Paneer Tikka Recipe

स्वादिष्ट पनीर मलाई टिक्का बनवण्याची रेसिपी - Tasty Malai Paneer Tikka recipe in Marathi

20 March Today Historical Events in Marathi

जाणून घ्या २० मार्च रोजी येणारे दिनविशेष

Hot and Sour Soup Recipe in Marathi

वेज हॉट एण्ड सॉर सूप रेसिपी

Charles Darwin Information in Marathi

चार्ल्स डार्विन यांच्या जीवनाविषयीची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved