जाणून घ्या १९ मे रोजी येणारे दिनविशेष

19  May Dinvishes 

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. तसचं काही महत्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिन, निधन आणि त्यांच्या शोध कार्यांबद्द्ल माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १९ मे रोजी येणारे दिनविशेष – 19  May Today Historical Events in Marathi

19 May History Information in Marathi
19 May History Information in Marathi

१९ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 19 May  Historical Event

  • इ.स. १८४८ साली एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला लहान दुकानांच्या स्वरूपात पॅरिसमध्ये बॉन मार्च नावाचे प्रथम डिपार्टमेंटल स्टोअर उघडण्यात आले.
  • सन १९६३ साली अमेरिकन संशोधक डॉ. मार्टिन लूथर किंग जूनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील असतांना लिहिलेले पत्र अमेरिकन मासिक द न्यूयॉर्क पोस्ट संडे मध्ये प्रकाशित करण्यात आले.
  • १९७१ साली भारतीय नौदलाचे पहिले पाणबुडी निर्माण स्थळ विशाखापट्टणम या ठिकाणी सुरु करण्यात आले.
  • सन १९९९ साली मूळ भारतीय वंशीय नागरिक महेंद्र चौधरी यांची फिजी देशाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती करण्यात आली.

१९ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 19 May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १९०८ साली प्रसिद्ध भारतीय बंगाली भाषिक साहित्यकार, लेखक, व कादंबरीकार माणिक बंडोपाध्याय यांचा जन्मदिन.
  • १९१० साली भारतीय सनातनी धर्माचे सदस्य व हिंदू धर्माचे समर्थक नथुराम गोडसे यांचा जन्मदिन.
  • सन १९१३ साली ब्रिटीश कालीन भारतातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी व स्वातंत्र भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्मदिन.
  • १९२५ साली अमेरिकेतील कृष्ण वर्णीय लोकांच्या हक्कांसाठी लढा देणारे अमेरिकन मुस्लिम मंत्री आणि मानवाधिकार कार्यकर्ते अल-हज मलिक अल-शाबाज उर्फ मालकॉम एक्स यांचा जन्मदिन.
  • सन १९२८ साली इंग्रजी डिझाइन अभियंता, शोधकर्ता आणि ऑटोमोटिव्ह उद्योगाचे उद्योजक आणि लोटस या स्पोर्ट्स कार्सचे संस्थापक अँथनी कॉलिन ब्रुस चॅपमन यांचा जन्मदिन.
  • १९३४ साली पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित ब्रिटीश वंशीय भारतीय इंग्रजी लेखक रस्किन बॉण्ड यांचा जन्मदिन.
  • सन १९३८ साली भारतीय साहित्य क्षेत्रांतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार तसचं, पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता,  दिग्दर्शक, कन्नड भाषिक लेखक व नाटककार गिरीश कर्नाड यांचा जन्मदिन.

१९ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 19  May Death / Punyatithi /Smrutidin

  • सन १९०४ साली जमशेदपूर येथील टाटा स्टील कंपनी व टाटा समूहाचे संस्थापक अग्रणीय भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचे निधन.
  • १९५८ साली मुघल राजघराण्यातील प्रसिद्ध भारतीय इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचे निधन.
  • १९९६ साली प्रसिद्ध भारतीय तमिळ चित्रपट अभिनेत्री आणि तामिळनाडू च्या भूतपूर्व मुख्यमंत्री जानकी रामचंद्रन यांचे निधन.
  • सन २००२ साली इंग्लंड देशांतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्तकर्ता ब्रिटीश सैन्यातील भारतीय लष्करी सैनिक भंडारी राम कुलगुरू यांचे निधन.
  • २००३ साली पद्मभूषण व परम विशिष्ट सेवा मेडल सन्मानित भारतीय सेना अधिकारी लेफ्टनंट जनरल कुन्हिरामन पलट कॅन्डथ यांचे निधन.
  • सन २००८ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट अभिनेता, नाटककार तसचं, चित्रपट व दूरदर्शन पठकथालेखक आणि साहित्यिक निबंध लेखक व राजकीय पत्रकार विजय धोंडोपंत तेंडुलकर यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top