Friday, June 2, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २० जुलै रोजी येणारे दिनविशेष

20 July Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे, आजच्या दिवशी जन्मदिन असणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत. तसचं, निधन वार्ता आणि दिनविशेष बद्दल थोडक्यात महिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेली सर्वात मोठी घटना म्हणजे आजच्या दिवशी सन १९६९ साली अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांनी चांद्रवर पाऊल ठेवले होते. चंद्रावर जाणारे ते पहिले अंतराळवीर ठरले. अपोलो-११ या मानव रहित यानाच्या साह्याने ते चंद्रावर गेले होते. चार दिवसाच्या अंतराळ प्रवासानंतर ते चांद्रवर पोहचले. हे यान २१ तास २१ मिनिटापर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर राहिले होते. जगाच्या इतिहासतील ही सर्वात मोठी घटना आहे. यानंतर अनेक देशाच्या अंतराळ यानांनी चांद्रवर जाण्याचा प्रयत्न केला. त्यात काही देश यशस्वी सुद्धा झाले.

जाणून घ्या २० जुलै रोजी येणारे दिनविशेष – 20 July Today Historical Events in Marathi

20 July History Information in Marathi
20 July History Information in Marathi

२० जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 20 July Historical Event

  • इ.स. १२९६ साली खिलजी घराण्याचे शासक अल्लाउद्दीन खिलजी यांनी स्वत:ला दिल्ली चा राजा म्हणून घोषित केलं.
  • इ.स. १७६१ साली माधवराव पेशवे यांनी स्वत:ला मराठा साम्राज्याचे पेशवा म्हणून घोषित केलं.
  • सन १९०५ साली ब्रिटीश कालीन भारतातील बंगाल प्रांताचे वाइसराय लॉर्ड कर्झन (Viceroy Lord Curzon) यांच्या द्वारा करण्यात आलेल्या बंगालच्या फाळणीस भारताच्या सचिवाने देखील मंजुरी दिली.
  • सन १९६० साली श्रीलंका देशांतील पंतप्रधान पदी विराजमान होणाऱ्या सिरिमावो भंडारनायके या जगातील पहिल्या महिला ठरल्या.
  • सन १९६९ साली अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग(Neil Armstrong) हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले. त्यानंतर लगेच दुसरे अमेरिकन अंतराळवीर बाज एल्ड्रीन उर्फ एडविन एल्ड्रीन (Edwin Aldrin) हे चंद्रावर उतरणारे दुसरे मानव ठरले.
  • सन १९७६ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने पाठविलेले व्हायकिंग-१ हे मानवरहित मंगळयान मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर यशस्वी उतरले.

२० जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 20 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. पूर्व ३५६ साली मॅसेडोनिया प्रांतातील प्राचीन ग्रीक देशाचे सम्राट व आर्जेड राजघराण्याचे सदस्य राजा अलेक्झांडर द ग्रेट(Alexander the Great) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८२२ साली आधुनिक अनुवांशिक विज्ञानाचे जनक म्हणून प्रसिद्ध असणारे जर्मन वंशीय ऑस्ट्रीया देशांतील रसायनशास्त्रज्ञ व सेंट थॉमस अ‍ॅबे (St. Thomas Abbey) चर्च चे धर्मगुरू व मठाधीश ग्रेगर जॉन मेंडेल यांचा जन्मदिन.
  •  इ.स. १८३६ साली क्लिनिकल थर्मामीटरचा शोध लावणारे प्रसिद्ध ब्रिटीश चिकित्सक व ब्रिटीश मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सर थॉमस क्लिफर्ड अल्बट(Thomas Clifford Albot)  यांचा जन्मदिन.
  • सन १९१९ साली भारतीय नेपाली गिर्यारोहक तेनसिंग नॉर्गे (Tenzing Norgay) यांच्या सोबत माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे न्यूझीलंड देशाचे पर्वतारोहणकार सर एडमंड हिलरी(Edmund Hillary) यांचा जन्मदिन.
  • सन १९२१ साली भारतीय बनारस घराण्यातील प्रसिद्ध भारतीय तबलावादक पंडित समता पंडित सामताप्रसाद यांचा जन्मदिन.
  •  सन १९२९ साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवातीच्या दशकातील  ‘जुबली स्टार’ आणि ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून आपली ओळख निर्माण करणारे अभिनेते राजेंद कुमाल यांचा जन्मदिन.
  • सन १९४९ साली भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता हिंदी चित्रपट अभिनेते व रंगमंच कलाकार नसीरुद्दीन शाह यांचा जन्मदिन.

२० जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 20 July Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८६६ साली प्रख्यात जर्मन गणितज्ञ बर्नार्ड रीमैन(Bernhard Riemann) यांचे निधन.
  • सन १९३७ साली रेडिओ(आकाशवाणी) ट्रान्समिशन यंत्राचा शोध लावणारे प्रख्यात इटालियन संशोधक व इलेक्ट्रिकल अभियंता गुल्येल्मो मार्कोनी(Guglielmo Marconi) यांचे निधन.
  • सन १९४३ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक, कादंबरीकार, साहित्य समिक्षक व तत्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन.
  • सन १९५१ साली जोर्डन देशाचे राजा अब्दुल्ला पहिला यांचे निधन.
  • सन १९६५ साली भारतीय स्वातंत्र्यसैनिक व थोर क्रांतिकारक तसचं, भगत सिंह यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांचे निधन.
  • सन १९७२ साली प्रख्यात भारतीय हिंदी व बंगाली चित्रपट पार्श्वगायिका आणि भारतीय शास्त्रीय गायिका गीता दत्त यांचे निधन.
  • सन १९९६ साली भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश व भारतातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी विराजमान होणाऱ्या पहिल्या ब्रिटीश महिला अन्ना चांडी(Anna Chandy) यांचे निधन.
Previous Post

लग्न सोहळ्या प्रसंगी वधू वराला देण्यासाठी अस्सल मराठमोळ्या शुभेच्छा

Next Post

२४० पेक्षा जास्त वर्षांपासून असलेली एक गुप्त संघटना इलुमिनाती. काय रहस्य आहे या संघटनेचं

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Illuminat The Secret Society

२४० पेक्षा जास्त वर्षांपासून असलेली एक गुप्त संघटना इलुमिनाती. काय रहस्य आहे या संघटनेचं

21 July History Information in Marathi

जाणून घ्या २१ जुलै रोजी येणारे दिनविशेष

Muammar Gaddafi

असाही एक तानाशाह ज्याने जनतेला घर, वीज, तसेच बऱ्याच गोष्टी दिल्या होत्या फुकट

Eklingeshwar Mahadev Temple Jaipur

एक रहस्यमय मंदिर ज्या मंदिराचे दरवाजे फक्त महाशिवरात्री ला उघडले जातात

22 July History Information in Marathi

जाणून घ्या २२ जुलै रोजी येणारे दिनविशेष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved