Saturday, June 3, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २३ जून रोजी येणारे दिनविशेष

23 June Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटना तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन, निधन, असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कार्यबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आज आंतरराष्ट्रीय विधवा दिन हा दिवस “अनेक देशांतील कोट्यवधी विधवा आणि त्यांच्या अवलंबितांना भेडसावणारा दारिद्र्य आणि अन्याय” या विषयावर उपाय म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने कृती करण्याचा दिवस मंजूर केला आहे. तसचं, आंतरराष्ट्रीय विधवा दिन हा दरवर्षी  23 जून रोजी साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे, भारतीय वर्धापन दिनाचे प्रतीक असलेला २३ जून हा दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन म्हणून घोषित केला होता. त्यामुळे आज संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन देखील आहे.

जाणून घ्या २३ जून रोजी येणारे दिनविशेष – 23 June Today Historical Events in Marathi

23 June History Information in Marathi
23 June History Information in Marathi

२३ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 June Historical Event

  • इ.स. १७५७ साली प्लासी या ठिकाणी झालेल्या लढाईत रोबर्ट क्लाइव्ह(Robert Clive) यांच्या नेतृत्वात ब्रिटीश सरकारच्या ३००० सैन्यांनी मोठ्या फितुरीने बंगाल मुघल शासक सिराज उदौला यांच्या ५०,००० सैन्यांचा पराभव केला.
  • इ.स. १८९४ साली पॅरिसमध्ये पियरे दी कुबर्टीन आणि डेमेट्रिओस विकेलास यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केली.
  • सन १९६० साली अमेरिका आणि जापान देशांमध्ये सुरक्षा संबंधी समझोता करण्यात आला.
  • सन १९७९ साली क्रिकेटची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या इंग्लंड देशांतील लॉर्ड च्या मैदानावर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्या झालेल्या विश्व चषकाच्या अंतिम सामन्यात वेस्टइंडीजच्या संघाने ९२ धावांनी इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा पराभव केला.
  • सन १९८० साली भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचं विमान दुर्घनेत निधन झालं.
  • सन १९८५ साली दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोइंग ७४७ विमानात स्फोट होऊन, ३२९ नागरिक ठार झाले होते.
  • सन १९९६ साली बांगलादेश मधील अवामी लीगच्या सदस्या शेख हसीना वाजेद यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या बांगलादेशच्या पंतप्रधान पदी विराजमान होणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या.

२३ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 23 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १९१२ साली इंग्रजी गणितज्ञ, संगणक शास्त्रज्ञ, तर्कशास्त्रज्ञ, तत्ववेत्ता आणि सैद्धांतिक जीवशास्त्रज्ञ एलेन ट्यूरिंग(Alan Turing) यांचा जन्मदिन.
  • सन १९२९ साली  पाच वेळेच्या ग्रॅमी पुरस्कार विजेता अमेरिकन गायिका, गीतकार, अभिनेत्री, नर्तक, विनोदकार आणि लेखिका जून कार्टर (June Carter Cash) यांचा जन्मदिन.
  • सन १९३४ साली राष्ट्रीय एकात्मतासाठी इंदिरा गांधी पुरस्कार, गांधी पीस पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय गांधीवादी पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते तसचं,  दशोली ग्राम स्वराज्य संघाचे संस्थापक चंडीप्रसाद भट्ट यांचा जन्मदिन.
  • सन १९३४ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी, व हिमाचल प्रदेशाचे माजी (४थे) मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १९३६ साली अर्जुन पुरस्कार विजेता माजी सर्वोत्कृष्ट भारतीय फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षक प्रदीप कुमार बॅनर्जी यांचा जन्मदिन.
  • सन १९७२ साली प्रख्यात फ्रेंच माजी व्यावसायिक फुटबॉल खेळाडू व ला लीगा क्लब रियल माद्रिदचे विद्यमान व्यवस्थापक झिनेदिन झिदेन(Zinedine Zidane) यांचा जन्मदिन.

२३ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 23 June Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १७६१ साली मराठा पेशवा साम्राज्याचे शासक बाजीराव यांचे पहिले चिरंजीव व दुसरे मराठा साम्राज्याचे पेशवा शासक बालाजी बाजीराव पेशवे यांचे यांचे निधन.
  • सन १९१४ साली ब्रिटीश कालीन भारतातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उत्तरप्रदेश प्रांतातील सदस्य, राजनेता व समाजसुधारक गंगाप्रसाद वर्मा यांचे निधन.
  • सन १९३९ साली देशांत मॉन्टेसरी शिक्षण पद्धती आणण्यास मदत करणारे, गुजराती भाषिक लेखक व महान शिक्षणतज्ञ गिजुभाई बधेका यांचे निधन.
  • सन १९५३ साली भारतीय जनसंघाचे संस्थापक, अध्यक्ष, शिक्षणतज्ञ व राजकारणी तसचं, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील उद्योग व पुरवठा मंत्री श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे निधन.
  • सन १९७५ साली माजी भारतीय लष्कर सेना प्रमुख जनरल प्राणनाथ थापर यांचे निधन.
  • सन १९८० साली प्रख्यात माजी भारतीय राजकारणी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे निधन.
  • सन १९९५ साली प्रसिद्ध अमेरिकन चिकित्सक, वैद्यकीय संशोधक आणि विषाणूविज्ञ तसचं, पोलिओ लसीचे शोधकर्ता जोनास साल्क (Jonas Salk) यांचे निधन.
Previous Post

उंटाच्या दुधाचा वापर करून दोघांनी उभा केला नवीन स्टार्टअप. आज कंपनी चा टर्नओव्हर करोडो रुपये आहे

Next Post

जगातील सर्वात काळा पदार्थ कोणता? नक्की वाचा

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Vantablack Darkest Material in the World

जगातील सर्वात काळा पदार्थ कोणता? नक्की वाचा

Your Space Startup Success Story

बाहेरगावी राहणाऱ्या विधार्थ्यांसाठी सुरू केला स्टार्टअप! आज करोडोमध्ये होतेय उलाढाल.

24 June History Information in Marathi

जाणून घ्या २४ जून रोजी येणारे दिनविशेष

Moral Story in Marathi

निस्वार्थ केलेल्या कामाचे फळ अवश्य मिळते.अशीच एक बोधकथा

Saffron Most Expensive Spice in the World

जगातील सर्वात महाग मसाल्याचा पदार्थ कोणता? किंमत जाणून होणार थक्क!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved