जाणून घ्या २३ मे रोजी येणारे दिनविशेष

23  May Dinvishes 

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी जन्मदिन तसचं पुण्यतिथी असणाऱ्या काही महान व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत, तसचं, आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत.

आजच्या दिवशी सन २००८ साली आपल्या देशाच्या लष्करी दलाने स्वदेश निर्मित पृथ्वी-२ या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. आपला देश देखील क्षेपणास्त्राच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

जाणून घ्या २३ मे रोजी येणारे दिनविशेष – 23 May Today Historical Events in Marathi

23 May History Information in Marathi
23 May History Information in Marathi

२३ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 May  Historical Event

  • इ.स. १७३७ साली मराठ्यांनी अर्नाळा हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकल्यानंतर त्या किल्ल्याचा पुन्हा जीर्णोद्धार केला.
  • सन १९४९ साली पश्चिम युरोप मधील फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी म्हणजेच पश्चिम जर्मनी देशाची स्थापना करण्यात आली.
  • सन १९५६ साली भारतीय आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण करण्यासंबंधीचे विध्येयकास मंजुरी प्राप्त झाली.
  • सन १९९५ साली संगणकीय प्रोग्रामिंग भाषा जावा ची पहिली आवृत्ती प्रकाशित केली गेली.
  • सन २००८ साली भारतीय लष्कर दलाच्या सैन्यांनी जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पुर्थ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
  • सन २०१६ साली भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था इस्रो ने आंध्रप्रदेश मधील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून संपूर्ण भारतीय बनावटीचे अंतराळ शटल आरएलव्ही-टीडी ची स्थापना केली.

२३ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 23 May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७०७ साली स्वीडिश वनस्पतिशास्त्रज्ञ, प्राणीशास्त्रज्ञ आणि शरीरशास्त्रज्ञ तसचं, “आधुनिक वर्गीकरणाचे जनक” कार्ल लीनियस यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९६ साली भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार आणि समालोचक तसचं, नाट्य-मन्वंतर या नाट्यसंस्थेचे ते संस्थापक केशवराव भोळे यांचा जन्मदिन.
  • सन १९०६ साली भारतीय लष्करी दलाचे माजी सेना प्रमुख लेफ्टनंट जनरल प्राणनाथ थापर यांचा जन्मदिन.
  • सन १९१९ साली भारतातील जयपूर घराण्यातील महाराजा सवाई मान सिंह द्वितीय यांच्या तिसऱ्या पत्नी महाराणी गायत्री देवी यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली प्रख्यात भारतीय उपखंडातील इतिहासकार रणजीत गुहा यांचा जन्मदिन.
  • सन १९४३ साली सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक तसचं, कृषि चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, व पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय चर्म रोग विशेषज्ञ, वन्यजीव संरक्षक आणि मद्रास स्नेक(साप) पार्क, अंदमान आणि निकोबार पर्यावरण ट्रस्ट आणि मद्रास मगर बँक ट्रस्टचे संस्थापक रोमुलस अर्ल व्हाइटकर यांचा जन्मदिन.
  • सन १९४८ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित माजी सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आणि भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विनोद राय यांचा जन्मदिन.
  • सन १९६५ साली माजी भारतीय क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट संघाचे विद्यमान प्रशिक्षक वॉरकेरी वेंकट रमण यांचा जन्मदिन.

२३ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 23  May Death / Punyatithi /Smrutidin

  • सन १९३० साली प्रख्यात भारतीय पुरातत्व व संग्रहालय तज्ञ तसचं, बनारस हिंदू विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे प्राध्यापक राखालदास बंडोपाध्याय उर्फ जे. आर. डी. बनर्जी यांचे निधन.
  • सन १९७५ साली ब्रिटीश सैन्य दलातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉंस सन्मानित माजी भारतीय लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल पी. एस. बापट यांचे निधन.
  • सन २०१० साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक व भारतीय नक्षलवादी आंदोलनाचे जनक कानू सन्याल यांचे निधन.
  • सन २०१० साली राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय तेलगु भाषिक चित्रपट गायिका वेतुरी सुंदरम्मा मूर्ती यांचे निधन.
  • सन २०१४ साली प्रसिद्ध भारतीय मराठी चित्रपट आणि रंगभूमी संगीतकार व संगीत दिग्दर्शक आनंद मोडक यांचे निधन.
  • सन २०१४ साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू माधव कृष्णाजी मंत्री यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top