Tuesday, May 6, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २४ जुलै रोजी येणारे दिनविशेष

24 July Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा आपल्या देशातील आयकर दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. वित्त मंत्रालयीन माहिती नुसार, इ.स. १८६० सालापासून देशांत आयकर ही प्रथा चालत आलेली आहे. या प्रथेची अंमलबजावणी ही ब्रिटीश कालीन भारतात जेम्स विल्सन (James Wilson)यांनी आजच्या दिवशी म्हणजे सन २४ जुलै १८६० साली केली होती. याचं कारणामुळे देशांत २४ जुलै हा दिवस आयकर दिनाच्या रूपात साजरा करतात.  या वर्षी आपल्या देशांत १६० व आयकर  दिवस साजरा करण्यात येणार आहे. भारताची राजधानी असलेल्या दिल्ली या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाच्या वित्तमंत्री यांच्या हस्ते करण्यात येत असते.

याव्यतिरिक्त, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २४ जुलै रोजी येणारे दिनविशेष –24 July Today Historical Events in Marathi

24 July History Information in Marathi
24 July History Information in Marathi

२४ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 24 July Historical Event

  • इ.स. १८२३ साली चिली देशांतील गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली.
  • इ.स. १८७० साली अमेरिकेमध्ये देशांतर्गत रेल्वे सेवा सुरु करण्यात आली.
  • सन १९३२ साली रामकृष्ण मिशन मठाची स्थापना करण्यात आली.
  • सन १९६९ साली चंद्र मोहिमेनंतर अमेरिकन चंद्रयान अपोलो ११ पृथ्वीवर सुखरूप उतरले.
  • सन १९९१ साली भारताचे तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा महत्वपूर्ण अर्थसंकल्प संसदेत सदर केला.
  • सन १९९७ साली भारताचे माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वतंत्रता सैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • सन १९९७ साली प्रसिद्ध भारतीय बंगाली लेखिका महाश्र्वेता देवी यांना पत्रकारिता, साहित्य व कला या क्षेत्रांतील उत्कुष्ट कामगिरीसाठी ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.
  • सन १९९८ साली परकीय चलन नियमन कायदा (FERA) च्या जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्याचा महत्व्पून निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाने घेतला.
  • सन २००० साली अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळपटू सुब्बरमन विजयलक्ष्मी या आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर व महिला ग्रँडमास्टरची फीड पदवी मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बनल्या.
  • सन २००४ साली इटली देशाने भारतीय पर्यटकांसाठी सात नवीन वीजा कॉल सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला.

२४ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 24 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८०२ साली फ्रेंच लेखक अलेक्झांड्रे ड्युमास(Alexandre Dumas) यांचा जन्मदिन.
  • सन १९११ साली भारतीय बासरीवादक आणि संगीतकार तसचं, “भारतीय शास्त्रीय संगीतातील वाद्य बासरीचे जनक” व उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचे शिष्य पन्नालाल घोष यांचा जन्मदिन.
  • सन १९११ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित हैदराबाद मुक्तीसंग्राम चळवळीचे पुढारी व स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्मदिन.
  • सन १९२४ साली प्रसिद्ध भारतीय गजल गायक व उर्दू शायर(कवी) नाज़िश प्रतापगढ़ी यांचा जन्मदिन.
  • सन १९२८ साली गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचा जन्मदिन.
  • सन १९३७ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक मनोज कुमार यांचा जन्मदिन.
  • सन १९४५ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे सम्राट म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय दानशूर उद्योगपती,  गुंतवणूकदार, अभियंता आणि परोपकारी तसचं, विप्रो लिमिटेडचे अध्यक्ष अझीम हशिम प्रेमजी यांचा जन्मदिन.
  • सन १९४७ साली पाकिस्तान देशाचे माजी क्रिकेटपटू व उत्कृष्ट फलंदाज जहीर अब्बास यांचा जन्मदिन.
  • सन १९८५ साली पद्मश्री, पद्मभूषण, राजीव गांधी खेलरत्न, पुरस्कार विजेता उत्कृष्ट भारतीय बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळाडू पंकज अडवाणी यांचा जन्मदिन.

२४ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 24 July Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९७४ साली नोबल पुरस्कार वेजेता प्रसिद्ध ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ सर जेम्स चाडविक (James Chadwick) यांचा जन्मदिन. अणूतील न्युट्रॉनच्या कणांचा शोध लावला.
  • सन १९८० साली प्रसिद्ध भारतीय बंगाली व हिंदी भाषिक चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि गायक उत्तम कुमार यांचे निधन.
  • सन १९८० साली इंग्लंड देशांतील प्रसिद्ध इंग्रजी चित्रपट अभिनेता, विनोदकार आणि गायक पीटर सेलर्स (Peter Sellers) यांचे निधन.
  • सन २०१२ साली प्रसिद्ध अमेरिकन शरीरशास्त्र व जीवशास्त्रशास्त्र विषयाचे प्राध्यापक व  सिटीस्कॅन यंत्राचे जनक रॉबर्ट स्टीव्हन लेडले (Robert Steven Ledley)  यांचे निधन.
  • सन २०१८ साली माजी ब्रिटीश अष्टपैलू क्रिकेटपटू जॉन मुरै (John Murray) यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved