जाणून घ्या २४ मार्च रोजी येणारे दिनविशेष

24 March Dinvishes

आजचा दिवस विशेष करून ओळखला जातो ते जागतिक क्षयरोग दिन म्हणून. सन १८८२ साली सर्वप्रथम या रोगाची ओळख झाली. संसर्गजन्य असलेल्या क्षयरोगाची लस शोधून काढण्याची महत्वपूर्ण यशस्वी कामगिरी फ्रेंच देशाचे बॅक्टेरियॉलॉजिस्ट अल्बर्ट कॅलमेट आणि कॅमिल गुओरीन यांनी केली.

याकरिता त्यांना नोबल पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं होत. या घटनेच्या स्मृतीप्रीत्यर्थ २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा (24 March Today Historical Events in Marathi) करण्यात येतो.

जाणून घ्या २४ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 24 March Today Historical Events in Marathi

24 March History Information in Marathi

२४ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 24 March Historical Event

 • इ.स. १३०७ साली मघल सम्राट औरंगजेब यांचे सेनापती मलिक काफुर यांनी देवगिरी येथील वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यांना कैद करून दिल्लीला नेले.
 • सन १६७७ साली दक्षिणेवरील विजयी मोहिमे प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केलं होत.
 • इ.स. १८३७ साली कॅनडा देशातील अश्वेत नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला.
 • सन १८५५ साली ब्रिटीश सरकारचे कॅबिनेट मिशन भारतात दाखल झाले.
 • इ.स. १८५५ साली स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात सर्वप्रथम आग्रा आणि कलकत्ता या दोन शहरांदरम्यान तारसेवा सुरु करण्यात आली होती.
 • सन १८८२ साली टीबी (क्षयरोग) या संसर्गजन्य प्राणघातक रोगाची ओळख झाली. फ्रेंच बॅक्टेरियॉलॉजिस्ट अल्बर्ट कॅलमेट आणि कॅमिल गुओरीन यांनी टीबी(क्षयरोग) ची लास शोधून काढल्यामुळे त्यांना नोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • इ.स. १८८३ साली शिकागो व न्यूयार्क या दोन शहरादरम्यान सर्वप्रथम दूरध्वनीवर बोलचाल करण्यात आली.
 • सन १८९६ साली रशियन भौतिकशास्त्रज्ञ अलेक्झांडर स्टेपानोविच पोपोव्ह यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडीओ सिग्नलचे प्रसारण केले.
 • इ.स. १९२३ साली ग्रीस राष्ट्र प्रजासत्ताक बनले.
 • सन १९७७ साली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात पहिल्यांदाच काँग्रेसची सरकार आले नाही व मोरारजी देसाई हे जनता दल पक्षातर्फे पंतप्रधान पदावर विराजमान झाले.
 • इ.स. १९९३ साली शूमाकर-लेव्ही-९ या धुमकेतूचा शोध शोध लागला. हा धुमकेतू जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आढळला.
 • सन १९९८ साली हॉलीवूड चित्रपट टायटॅनिक याला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.

२४ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 24 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • सन १७७५ साली दक्षिण भारतीय कवी, गायक आणि वीणा वादक तसेच, कर्नाटकी शास्त्रीय संगीतकार मुथुस्वामी दीक्षित यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८४१ साली ब्रिटीश भारतातील मुस्लीम राजनेता व भारतीय मुस्लीम लीगचे संस्थापक नवाब विकार-उल-मुल्क कबोह यांचा जन्मदिन. यांचे मुळ नाव मुश्ताक हुसेन झुबेरी असून त्यांना नवाब विकार-उल-मुल्क मौलवी या नावाने देखील ओळखले जाते.
 • सन १८६३ साली ब्रिटीश भारतातील एक प्रख्यात वकील आणि राजकारणी सत्येंद्र प्रसन्न सिन्हा यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९२ साली भारतीय राजनेता आणि भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता हरिभाऊ उपाध्याय यांचा जन्मदिन. सन १९५२-५६ साली त्यांनी अजमेर राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविले होते.
 • सन १९२२ साली भारतीय कर्नाटिक संगीतकार तसेच तमिळ चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक थोगुलुवा मीनाची अयंगर सौन्दराराजन उर्फ टीएमस यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९५१ साली अमेरिकन फॅशन डिझायनर टॉमी हिल्फिगर यांचा जन्मदिन.
 • सन १९६५ साली अमेरिकन प्रोफेशनल रेसलर व सध्या डब्ल्यूडब्ल्यूई रेसलिग स्पर्धेत कार्यरत असलेले अंडरटेकर या नावाने ओळखले जाणारे मार्क विल्यम कॅलवे यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९६६ साली भारतीय राजकारणी व उद्योगपती जयदेव गल्ला यांचा जन्मदिन.
 • सन १९७९ साली हिंदी चित्रपट अभिनेता इमरान हाशमी यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९८४ साली भारतीय हॉकी खेळाडू एड्रियन डिसूजा यांचा जन्मदिन.

२४ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –  24 March Death / Punyatithi /Smrutidin

 • इ.स. १६०३ साली इंग्लडच्या राणी पहिली एलिझाबेथ यांचे निधन.
 • सन २००७ साली मराठी कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन.

आज जागतिक क्षयरोग दिन, भारतात दरवर्षी जवळपास २० लाख लोकांना क्षयरोगाची लागण होते. यातील ५ लाख माणसे दरवर्षी मरण पावतात.

पूर्वीच्या तुलनेने आज क्षयरोग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आणला गेला आहे. लहान मुलांना याची लस टोचली पाहिजे.

तसेच, क्षय रोगाची लागण रोखण्यासाठी आपण दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यायला पाहिजे.

आपल्या आसपासचा परिसर नेहमीच स्वच्छ ठेवला पाहिजे.

धन्यवाद..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here