जाणून घ्या २८ मार्च रोजी येणारे दिनविशेष

 28 March Dinvishesh

ऐतिहासिक घटनांच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे, कारण आजच्या दिवशी इतिहासामध्ये घडलेल्या घटना ज्याप्रमाणे जन्म, मृत्यू, लढाई, शोध आदी घटनांची सर्व माहिती (28 March Today Historical Events in Marathi) आपण याठिकाणी पाहणार आहोत.

जाणून घ्या २८ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 28  March Today Historical Events in Marathi

28 March History Information in Marathi

२८ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 28  March Historical Event

 • इ.स. १७३७ साली थोरले बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर स्वारी करून मुघलांचा पराभव करून मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केलं.
 • सन १९१० साली फ्रेंच देशाचे वैमानिक व संशोधक हेन्री फॅब्रे यांनी फॅब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.
 • इ.स. १९३० साली तुर्कस्तानमधील अंगारा आणि कॉन्स्टँटिनोपल या शहराची नावे बदलून अंकारा आणि इस्तंबुल ठेवण्यात आले.
 • सन १९४१ साली नेताजी सुभाष चंद्रबोस इंग्रज शासनाच्या नजर कैदी पासून स्वत:चा बचाव करून बर्लिन येथे पोहचले.
 • इ.स. १९४२ साली रास बिहारी बोस यांनी जापानची राजधानी टोकियो येथे ‘इंडियन इंडिपेन्डन्स लीग’ ची स्थापना केली.
 • सन १९७९ साली अमेरिकेतील हॅरिसबर्गजवळील पेनसिल्व्हेनिया येथील डॉफिन काउंटीमध्ये स्थित असलेल्या थ्री माईल बेट अणुउत्पादक स्टेशनच्या अणुभट्टीतील थ्री माईल आयलँडचा अपघात होऊन अणुभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती होऊ लागली.
 • इ.स. १९९८ साली ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्‌ड कॉम्प्यूटिंग‘ कंपनीने विकसित केलेला आपला ‘परम-१००००’ हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला.

२८ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 28  March Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८६८ साली रशियन लेखक, समाजवादी वास्तववाद साहित्यिक पद्धतिचे संस्थापक आणि राजकीय कार्यकर्ते मॅक्सिम गॉर्की यांचा जन्मदिन.
 • सन १८९६ साली भारतीय गणितज्ञ, हिंदी विश्वकोशाचे संपादक तसचं, हिंदी भाषेतील वैज्ञानिक साहित्याचे प्रख्यात लेखक गोरख प्रसाद यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९२५ साली भारतीय हिंदी-मराठी भाषिक चित्रपट व नाट्य अभिनेते राजा गोसावी यांचा जन्मदिन.
 • सन १९२७ साली महिला अभ्यासात अभ्यासपूर्ण संशोधनासह कृतीशीलतेची जोड देणाऱ्या पहिल्या महिला शिक्षणतज्ञ डॉ. विना मजुमदार यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९२८ साली  भारतीय कवी आणि मल्याळम भाषेचे गीतकार वायलर रामवर्म यांचा जन्मदिन.
 • सन १९५४ साली भारतीय कम्युनिस्ट, लेखक आणि क्रांतिकारक नेत्या तसचं, बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्रातील संस्थापक सदस्या अनुराधा घंडी यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९५६ साली भारतीय वैज्ञानिक व उद्योगपती तसचं, पिरामल एंटरप्रायजेस लिमिटेडच्या उपाध्यक्ष स्वाती पिरमल यांचा जन्मदिन.
 • सन १९६८ साली इंग्लिश क्रिकेटपटू नासिर हुसैन यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९८६ साली अमेरिकन गायिका, गीतकार आणि अभिनेत्री लेडी गागा यांचा जन्मदिन.

२८ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 28  March Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १५५२ साली शिख धर्मीय बांधवांचे दुसरे गुरु,  गुरु अंगद देव यांचे निधन.
 • सन १९४१ साली पहिले भारतीय मुंबई पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा विभागाचे प्रभारी तसचं, गुप्तचर संघटनेतील प्रसिद्ध अधिकारी खान बहादूर कावसजी जमशेदजी पेटीगारा यांचे निधन.
 • इ.स. १९४३ साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता आणि राजकारणी एस सत्यमूर्ती यांचे निधन.
 • सन १९५९ साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता व राजकारणी तसचं, आंध्रप्रदेश राज्याचे माजी महसूलमंत्री व अर्थमंत्री कला वेंकट राव यांचे निधन.
 • इ.स. २००६ साली भारतीय आध्यात्मिक नेते, जागतिक शांतता कार्यकर्ते, वैज्ञानिक, तत्वज्ञ, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीक अभ्यासक तसचं, चेन्नई मधील जागतिक समुदाय सेवा केंद्राचे संस्थापक योगीराज श्री वेठाथीरी महर्षी यांचे निधन.
 • सन १९६९ साली अमेरिकन माजी सैन्य जनरल आणि राजकारणी तसचं, अमिरीकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी आयसनहॉवर यांचे निधन.
 • इ.स. १९९२ साली जैन धर्मीय बांधवांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू तसेच राष्ट्र संतांची उपाधी प्राप्त आचर्य सम्राट आनंद ऋषीजी यांचे निधन.
 • सन २००० साली नामवंत अर्थतज्ञ आणि लेखक शांताराम द्वारकानाथ देशमुख उर्फ राम द्वारकानाथ देशमुख यांचे निधन.

वरील लेखाच्या माध्यमातून आपणास इतिहासात जमा असलेल्या संपूर्ण घटनांची सविस्तर माहिती मिळते. धन्यवाद..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top